भंडारा : भंडारा-पवनी मतदारसंघाची निर्मिती झाली तेव्हापासून मागील विधानसभा निवडणुकीपर्यंत या मतदारसंघातील मतदारांनी विद्यमान आमदारांना नाकारून नव्या नेत्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्याची परंपरा आहे. मतदारराजा यंदाही आपली परंपरा कायम राखणार का, असा प्रश्न आता चर्चिला जात आहे.

२००९ पर्यंत अड्याळ-पवनी हा वेगळा विधानसभा मतदारसंघ होता. त्यानंतर भंडारा-पवनी विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. २०१४ पासून हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव झाला. याच कारणास्तव २००४ ते २००९ पर्यंत या क्षेत्राचे आमदार राहिलेल्या नाना पंचबुद्धे यांना या भागातून पुन्हा निवडणूक लढवता आली नाही. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर येथील मतदारांनी कोणत्याही आमदाराला पुन्हा संधी दिली नाही. दर पाच वर्षांनी लोकप्रतिनिधी बदलायचे, हे येथील मतदारांचे वैशिष्ट्य आहे.

Wani Umarkhed constituency the concern of Mahavikas Aghadi increased Chowrangi ladhat in two places and direct fight in five constituencies
वणी, उमरखेडमध्ये महाविकास आघाडीची चिंता वाढली, दोन ठिकाणी चौरंगी तर पाच मतदारसंघात थेट लढत
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
maharashtra vidhan sabha election 2024 path of Mahayuti and Mahavikas Aghadi is difficult due to major rebel candidates in akola and vashim
प्रमुख बंडखोरांमुळे महायुती व मविआची वाट बिकट
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
sada sarvankar marathi news (1)
“उद्धव ठाकरेंसारखा माणूस राजकारणात सापडणार नाही”, सदा सरवणकरांच्या नावाने पोस्ट व्हायरल; स्वत: स्पष्टीकरण देत म्हणाले…
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
maharashtra assembly election 2024 focus on five major contests in East Vidarbha
East Vidarbha Assembly Constituency: पूर्व विदर्भातील पाच प्रमुख लढतींकडे राज्याचे लक्ष

आणखी वाचा-अमरावती : बंडखोरीमुळे महायुतीसमोर मतविभाजनाचा धोका कायम

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महाआघाडीचे प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र गडकरी आणि महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांच्यात थेट लढत झाली होती. या निवडणुकीत मतदारांनी भोंडेकर यांना झुकते माप दिले आणि विजयी केले. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार ॲड. रामचंद्र अवसरे आणि बहुजन समाज पक्षाच्या देवांगना गाढवे यांच्यासह त्या वेळीचे भोंडेकर हे सुद्धा शिवसेनेच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी मतदारांनी ॲड. अवसरे यांना कौल देत आमदार म्हणून निवडून दिले आणि विद्यमान आमदार भोंडेकर यांना घराचा रस्ता दाखविला होता.

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भोंडेकर यांनी अपक्ष निवडणूक लढवीत पुन्हा नशीब आजमावले. त्यावेळी मतदारांनी भोंडेकर यांना सर्वाधिक मतांचे दान देत निवडून आणले.२००९ आणि २०१९ मध्ये आमदार झालेले भोंडेकर यावेळी शिवसेनेकडून (शिंदे गट) महायुतीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. मतदार त्यांना पुन्हा निवडून देतात की, यावेळीही नव्या चेहऱ्याला संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा-East Vidarbha Assembly Constituency: पूर्व विदर्भातील पाच प्रमुख लढतींकडे राज्याचे लक्ष

आस्वले राहिले भंडारा-मोहाडीचे सलग तीन वेळा आमदार

भंडारा विधानसभेची निर्मिती होण्यापूर्वी अड्याळ-पवनी अशी या विधानसभा क्षेत्राची ओळख होती. तेव्हा मोहाडी तालुक्यातील काही भाग या क्षेत्रात येत होता. त्यावेळी भाजपचे राम आस्वले हे १९९० ते २००४ असे तब्बल तीन वेळा या क्षेत्राचे आमदार राहिले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना पंचबुद्धे हे आमदार झाले.