काँग्रेस नेते यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेमध्ये कर्नाटकात हत्या झालेल्या पत्रकार गौरी लंकेश यांची आई आणि बहीण या सुद्धा काल सहभागी झाल्या होत्या. गौरी लंकेश यांची आई इंदिरा लंकेश आणि बहीण कविता लंकेश यांनी कर्नाटकमधील मांडय़ा जिल्ह्यात राहुल गांधी यांची भेट घेतली व त्यानंतर त्या राहुल गांधींसोबत काही अंतरापर्यंत पदयात्रेत चालल्या. यावेळी राहुल गांधींनी त्यांच्याशी संवादही साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी राहुल गांधींनी गौरची हत्या नेमकी का झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अशी माहिती इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना इंदिरा लंकेश यांनी दिली. तसेच यावेळी त्यांनी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची देखील आठवण काढली आणि आपण दोघांनाही आपल्या प्रिय व्यक्तीला गमावलं आहे, असं ते म्हणाले असल्याचं इंदिरा लंकेश म्हणाल्या.
राहुल गांधी यांनी इंदिरा लंकेश यांना अलिंगन देऊन त्यांचे यात्रेत स्वागत केले. यानंतर पदयात्रेदरम्यान ते इंदिरा यांचा हात पकडून चालत होते. काँग्रेसने ट्विटरवर यासंबंधी एक छायाचित्र प्रसारित केले आहे.

‘‘भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत दिवंगत पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यां गौरी लंकेश यांचा परिवार. गौरी लंकेश यांचा साहसी आणि निर्भिड आवाज द्वेष आणि हिंसेच्या समर्थकांनी दाबला. ही यात्रा देशात पसरलेल्या द्वेषाविरोधात आहे. आता आम्ही घाबरणार नाही, थांबणार नाही.’’, असेही काँग्रेसने नमूद केले आहे.

राहुल गांधींचे ट्वीट –

याशिवाय राहुल गांधी यांनी ट्वीटही केले आहे. ज्यामध्ये ते म्हणातात, “गौरी सत्याच्या बाजूने उभा होत्या. गौरी हिंमतीने उभा होत्या, गौरी स्वातंत्र्यासाठी उभा होत्या. मी गौरी लंकेश आणि त्यांच्या सारख्या असंख्य अन्य लोकांसाठी उभा आहे. जे भारताच्या खऱ्या भावनेचे प्रतिनिधित्व करतात. भारत जोडो यात्रा त्यांचा आवाज आहे, हा कधीही शांत केला जाऊ शकत नाही.”

सत्य कधी दाबता येणार नाही – जयराम रमेश

काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी देखील ट्वीट करत म्हटले की, “गौरी लंकेश यांची हत्या करणाऱ्या विचारधेरला आपण सर्वचजण जाणतो. राहुल गांधींनी गौरी लंकेश यांच्या आई आणि बहिणीसोबत चालून जगाला दाखवले की द्वेष आणि हिंसने सत्य कधी दाबता येत नाही. भारत जोडो यात्रा आशा, अहिंसा आणि सत्याचे प्रतीक आहे.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat jodo yatra gauri lankeshs mother and sister participate in rahul gandhis padayatra msr
Show comments