खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ची सध्या देशभरात चर्चा आहे. काँग्रेसच्या या यात्रेला चांगला प्रतिसाद लाभत आहेत. या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल, असा कयास बांधला जात असून यात्रेचा येत्या ३० जानेवारी रोजी समारोप होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा फडकावल्यानंतर ही यात्रा संपणार आहे. दरम्यान, आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) विचारधारेवर विश्वास नाही. लाल चौकावर तिरंगा फडकवणे हा संघाचा अजेंडा आहे. त्यामुळे आम्ही तिथे तिरंगा फडकावणार नाही, अशी माहिती जम्मू-काश्मीर काँग्रेसचे प्रभारी खासदार रजनी पाटील यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Pune Bypoll Election : पिंपरी चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणुकीची तारीख जाहीर! लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे जागा रिक्त

काँग्रेस लाल चौकावर तिरंगा फडकावणार नाही

भारत जोडो यात्रेच्या समारोपादरम्यान राहुल गांधी कोणत्या ठिकाणी तिरंगा फडकावणार असे विचारले जात होते. त्यासाठी अनेक कयास लावले जात होते. यावरच रजनी पाटील यांनी सविस्तर भाष्य केले आहे. राहुल गांधी लाल चौकात तिरंगा फडकावणार नाहीत, अशी माहिती रजनी पाटील यांनी दिली आहे. “लाल चौकावर तिरंगा फडकावण्याच्या संघाचा अजेंडा आहे. आमचा संघाच्या विचारधारेवर विश्वास नाही,” असे रजनी पाटील म्हणाल्या. यात्रेच्या समारोपाचा मुख्य कार्यक्रम शेर ए काश्मीर इंटरनॅशनल कॉन्व्हेन्शन सेंटर येथे होणार आहे. तर काँग्रेसच्या श्रीनगरमधील कार्यालयावर तिरंगा फडकावण्यात येईल. भारत जोडो यात्रा १९ जानेवारी रोजी जम्मूमध्ये प्रवेश करेल.

हेही वाचा >>> Assembly Election 2023 : त्रिपुरा, नागालँड, मेघालयमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर, १६ आणि २७ फेब्रुवारीला मतदान!

दरम्यान, काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो यात्रेसाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. यात्रेच्या समारोपादरम्यान काँग्रेसकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी काँग्रेसने भाजपाविरोधी विचारधारा असलेल्या २१ राजकीय पक्षांना निमंत्रण दिले आहे. समारोप कार्यक्रमाच्या माध्यमातून काँग्रेसकडून विरोधकांची मोट बांधण्याचाही प्रयत्न केला जातोय.