उत्तर प्रदेशातील नगीना लोकसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे चार वर्षांपूर्वी स्थापन झालेला आझाद समाज पक्ष आहे, कारण त्या पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद पहिल्यांदाच या जागेवरून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. नगीना लोकसभा मतदारसंघातील नेळोवाडी गाववडी गावातील रविदास मंदिर आणि बी. आर. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शनिवार ६ एप्रिल रोजी आझाद समाज पक्षाच्या समर्थनार्थ एका छोट्या सभेसाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. जमावातील बरेच जण जाटव दलित समाजातील होते. मायावतींच्या कट्टर समर्थकांचेही आझाद यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. तेसुद्धा जाटव दलित समाजाचे प्रतिनिधित्व करतात. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून मायावतीही भाजपाच्या विरोधात मौन धारण करून आहेत. तसेच निवडणुकीतील बसपाच्या हालचालीही मंदावलेल्या आहेत. गेल्या काही आठवड्यापूर्वी रामपूरमध्ये एका दलित तरुणाचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला होता. तेव्हा चंद्रशेखर आझाद त्यांच्या कुटुंबीयांना भेट देण्यासाठी गेले होते. परंतु मायावती आणि त्यांचा राजकीय वारसदार असलेला आकाश आनंद तिथे फिरकलाही नाही. ते व्हीआयपी नेते झाले असल्याची टीकाही नगीनामधील रविदास मानव सेवा संघाचे अध्यक्ष कमलजीत सिंग रवी यांनी केली आहे.

चंद्रशेखर आझाद दलितांमधील तरुण नेतृत्व

फक्त दलितच नव्हे, तर मुस्लिम समाजही आझाद यांना पाठिंबा देईल. नगीना मतदारसंघात मुस्लिम मोठ्या संख्येनं राहतात. जिथे १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. मुस्लिमांच्या खालोखाल तिथे दलितांची लोकसंख्या जास्त आहे. चंद्रशेखर आझाद दलितांमधील तरुण नेतृत्व असून, ते दलित अन् मुस्लिमांच्या हक्कासाठी बोलत आहेत. त्यांच्या हक्कासाठी ते रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासही तयार आहेत. भलेही आझाद आंटा विजय होणार नाही,पण ते बसपा आणि समाजवादी पार्टीला मजबूत टक्कर देतील. कारण विजय भाजपा किंवा इतर पक्षांचा होईल, असंही रवी म्हणतात. नेळोवाडी गाववडी गावात दलितांचे प्राबल्य आहे, त्यांची संख्या ६०० च्या जवळपास आहे, तर उर्वरित ३०० सैनी समाजाचे आहे. ते ओबीसी नेते असलेल्या भाजपा उमेदवार ओम कुमार यांचे समर्थक आहेत. सपाची उमेदवारी हे सेवानिवृत्त झालेले अतिरिक्त न्यायाधीश मनोज कुमार यांना मिळाली आहे, तर बसपाची उमेदवारी सुरेंद्र पाल सिंग यांना देण्यात आली आहे.

Maharashtra assembly election 2024
लालकिल्ला: शेवटच्या आठवड्यातील प्रचाराने लाभ कोणाला?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
nitin Gadkari constitution of India
Nitin Gadkari: भाजप राज्यघटना कधीच बदलणार नाही, कोणाला बदलूही देणार नाही – नितीन गडकरी
maaharashtra assembly election 2024 jayshree shelkes equal challenge to sanjay gaikwad in buldhana vidhan sabha constituency
बुलढाण्यात संजय गायकवाड यांच्यासमक्ष जयश्री शेळकेंचे तुल्यबळ आव्हान; कोण बाजी मारणार?
Maharashtra assembly elections 2024 independent candidate getting support from mahayuti maha vikas aghadi Unsatisfied leader in bhandara Vidhan sabha
भंडारा विधानसभेत अपक्ष उमेदवारांचा बोलबाला? युती-आघाडीतील असंतुष्ट अपक्षांच्या पाठिशी!
Who will be Chief minister if Mahayuti wins
महायुतीचा विजय झाल्यास मुख्यमंत्री कोण होणार? भाजपाकडून मिळालेले ‘हे’ संकेत महत्त्वाचे
Dhule City Polarization of votes beneficial to any candidate print politics news
लक्षवेधी लढत: धुळे शहर : मतांचे ध्रुवीकरण कोणाला फायदेशीर?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सपा आणि बसपाची युती

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा सपा आणि बसपाची युती होती, तेव्हा बसपाचे नेते गिरीश चंद्र यांनी नगीना जागा जिंकली होती आणि भाजपाच्या यशवंत सिंह यांचा १.६ लाख मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत नगीना जागेवरील पाच विधानसभा क्षेत्रांपैकी सपाने नजीबाबाद, नगीना आणि नुरपूर विधानसभा मतदारसंघ जिंकले होते, तर भाजपाला धामपूर आणि नेहतौर हे दोन मतदारसंघ मिळाले होते. कमलजीत सिंगसारखे तरुण आझाद यांच्यापासून प्रभावित झाले आहेत, ज्यांच्या भीम आर्मीला तरुण दलितांमध्ये सातत्याने पाठिंबा मिळाला आहे, तर वृद्धदेखील आता ३६ वर्षांच्या आझादांकडे आशेने पाहत आहेत. ६० वर्षीय तुलाराम यांनी मोदी सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना आणि मोफत रेशन यांसारख्या योजनांचा फायदा झाल्याचे मान्य केले. भाजपा सरकार चांगले आहे, त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारली आहे. आता मुस्लिम इथे दलितांशी गैरवर्तन करत नाहीत,” असंही ते म्हणालेत. परंतु अजूनही उच्चवर्णीय हिंदूंद्वारे अस्पृश्यता पाळली जाते, असंही तुलाराम म्हणतात. आम्हाला राष्ट्रीय स्तरावर आमचा आवाज नेण्यासाठी आमच्या समुदायातील नेत्याची गरज आहे. दलित आणि मुस्लीम एकत्र आल्यास आझाद सहज विजय मिळवू शकतील, असा त्यांचा विश्वास आहे. मायावती आणि त्यांचा पक्ष त्यांच्या अंताकडे जात आहेत. लोकांना दलितांचे नेतृत्व करण्यासाठी नवीन रक्त हवे आहे,” असेही तुलाराम सांगतात.

तर स्वरूप वाल्मिकी या गावकऱ्यानेही मायावतींनी प्रचार करावा, असा आग्रह धरला आहे. जर मायावती आता लोकांमध्ये फिरू लागल्या तर आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरू, मायावती या देशातील दलितांमधील सर्वात वजनदार नेत्या असल्याचंही ते म्हणालेत. परंतु निवडणुकीच्या काळात बसपाचे अस्तित्वच जाणवत नसून दलित मतदार हा भाजपाकडे वळत असल्याचंही शेजारील हसनलीपूर गावातील कमलेश कुमार यांचं म्हणणं आहे. खरं तर समाज चंद्रशेखर यांना एक संधी देण्यात तयार आहे. मायावतींनीही नेतृत्व बदल स्वीकारला पाहिजे, जसे की, भाजपा समर्थकांनी वाजपेयी आणि अडवाणी यांच्याकडून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यापर्यंतचा बदल स्वीकारला आहे. जाटव आणि सैनींचे वर्चस्व असलेल्या गावातील मेहर सिंग सांगतात की, मायावती इंडिया आघाडीपासूनही दूर आहेत. म्हणजेच त्या भाजपाबरोबर तर नाहीत ना, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

आझाद आणि सपा-काँग्रेस यांच्यातही चर्चा झाली होती. समाजवादी पार्टीने नगीनाची मागणी मान्य करण्यास नकार दिल्याने आणि त्याऐवजी आग्रा किंवा बुलंदशहरची ऑफर दिल्याने त्यांची बोलणी फिस्कटली. आझाद यांनीसुद्धा बसपाशी जुळवून घेण्याचे अनेक प्रयत्न केले, अगदी मायावतींचे कौतुकही केले. मात्र, बसपाने त्यांना कधीच मान्य केले नाही. डिसेंबर २०१९ मध्ये मायावती यांनी ट्विट केले होते की, दलितांना असा विश्वास आहे की, भीम आर्मीचा चंद्रशेखर बसपाच्या मतांचं धुव्रीकरण करण्याचा कट रचत आहे. तो आंदोलनं करतो आणि नंतर मुद्दाम तुरुंगात जात असल्याचीही मायावतींनी टीका केली होती.

बसपालाही आझाद यांचा वाढता प्रभाव स्पष्टपणे जाणवला आहे. BSP चे राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा उत्तर प्रदेशमधील प्रचार सुरू करण्यासाठी नगीनाची निवड केली. आपल्या भाषणात त्यांनी भाजपावर हल्ला चढवला, जे मायावतींनी त्यांना करण्यापासून परावृत्त केले आहे. मूळचे सहारनपूरचे असलेले आझाद हे बाहेरचे म्हणून ओळखले जातात.

हेही वाचाः मुस्लीम गुलाम व्हावेत ही धर्मनिरपेक्ष पक्षांची इच्छा – ओवैसी

आझाद आपली ताकद वाढवण्यासाठी गैर जाटव दलित मतदारांना आकर्षित करण्यावर भर देत आहेत. रविवारी त्यांनी नजीबाबादमधील वाल्मिकी समाजाच्या सामाजिक भाईचारा महासंमेलनाला संबोधित केले, जेथे मुस्लिमदेखील उपस्थित होते. त्यांनी सपा किंवा बसपाचा उल्लेख न करता केवळ भाजपावर निशाणा साधला. मुस्लिमही आझाद यांना संधी द्यायला तयार आहेत, कारण ते भाजपाशी लढणारे एकमेव नेते आहेत. याउलट अनेकांना असे वाटते की, सपाने त्यांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. धामपूरमधील कार हार्डवेअर मेकॅनिक असलेले मोहम्मद उस्मान हेसुद्धा अखिलेश यादव यांच्यावर टीका करतात. अखिलेश फक्त तुरुंगात असलेल्या आझम खान यांना भेटायला गेले होते, जे त्यांचे दिवंगत वडील मुलायमसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी खूप प्रभावशाली होते. यानंतर रामपूर आणि मुरादाबाद लोकसभेच्या जागांसाठी नामनिर्देशनांवरून हाणामारी झाली, जिथे आझम आणि अखिलेश यांच्या निवडींमध्ये संघर्ष झाला, असंही उस्मान सांगतात. समाजवादीचा इथे प्रचार नाही. त्यांचा उमेदवार अज्ञात चेहरा आहे. दुसरीकडे चंद्रशेखर वंचित घटकांसाठी लढतात. भाजपाच्या विरोधात त्यांनाच संधी आहे, असे वाटत असल्याने मी त्यांनाच मत देणार आहे, असंही उस्मान सांगतात.

नगीनामधून भाजपा जिंकेल, असा तिथल्या लोकांना विश्वास

विशेष म्हणजे नगीनामधून भाजपा जिंकेल, असा विश्वास असल्याचंही अकील अहमद सांगतात. कारण आझाद सपाची मुस्लिम मते आणि बसपाची दलित मते खातील. केंद्राच्या अनेक योजनांना इथल्या लोकांना फायदा झालाय. भाजपा सबका साथ आणि सबका विकास करीत आहे. कल्याणकारी योजनांमध्ये कोणताही भेदभाव केला जात असल्याचंही अहमद म्हणतात. सपा अनुसूचित जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल भारती यांनी आझाद यांचे आव्हान असल्याचे नाकारले, नगीनामध्ये लढत भाजपा आणि सपा-काँग्रेस यांच्यात होईल. आझाद समाजवादी पार्टीचे मते कमी करू शकतात परंतु सपाला भाजपाविरोधी दलित मते मिळतील, असंही ते सांगतात. बसपाही आझाद यांच्यापेक्षा मजबूत असल्याचे भारती म्हणतात. आकाश आनंदच्या शनिवारी झालेल्या रॅलीनंतर चंद्रशेखर यांची अवस्था कमकुवत झाली आहे. सपा उमेदवार मनोज कुमार यांच्या भाषणातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांची अटक आहे. बदला नको, बदला पाहिजे असंही मनोज कुमार म्हणतात.

नगीना शहरातील कपिल सैनी विरोधी नेत्यांच्या अटकेला त्यांच्या लोकप्रियतेचा दुर्बल वर्गातील पुरावा म्हणून पाहतात. पक्षाची बँक खाती गोठवली तर काँग्रेस नेते प्रचार कसा करणार? अशा कृतींमुळेच भाजपाला काही जागांवर पराभवाची भीती वाटते. मी जात, रस्ते, कायदा आणि सुव्यवस्था यांसारख्या घटकांच्या आधारावर निवड करतो, असंही सैनी सांगतात.