उत्तर प्रदेशातील नगीना लोकसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे चार वर्षांपूर्वी स्थापन झालेला आझाद समाज पक्ष आहे, कारण त्या पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद पहिल्यांदाच या जागेवरून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. नगीना लोकसभा मतदारसंघातील नेळोवाडी गाववडी गावातील रविदास मंदिर आणि बी. आर. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शनिवार ६ एप्रिल रोजी आझाद समाज पक्षाच्या समर्थनार्थ एका छोट्या सभेसाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. जमावातील बरेच जण जाटव दलित समाजातील होते. मायावतींच्या कट्टर समर्थकांचेही आझाद यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. तेसुद्धा जाटव दलित समाजाचे प्रतिनिधित्व करतात. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून मायावतीही भाजपाच्या विरोधात मौन धारण करून आहेत. तसेच निवडणुकीतील बसपाच्या हालचालीही मंदावलेल्या आहेत. गेल्या काही आठवड्यापूर्वी रामपूरमध्ये एका दलित तरुणाचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला होता. तेव्हा चंद्रशेखर आझाद त्यांच्या कुटुंबीयांना भेट देण्यासाठी गेले होते. परंतु मायावती आणि त्यांचा राजकीय वारसदार असलेला आकाश आनंद तिथे फिरकलाही नाही. ते व्हीआयपी नेते झाले असल्याची टीकाही नगीनामधील रविदास मानव सेवा संघाचे अध्यक्ष कमलजीत सिंग रवी यांनी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा