अनिकेत साठे

नाशिक : राष्ट्रवादीतील फुटीनंतर अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यांमध्ये संघर्षाचा नवा अध्याय सुरू झाला असताना दुसरीकडे याच पक्षाचे नेते छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्यात परस्पर सामंजस्याने राजकीय मशागतीचे प्रयोग होत आहेत. राष्ट्रवादी स्थापनेपासून राज्यस्तरीय अधिवेशनाचे भव्यदिव्य स्वरुपात आयोजन करण्यात माजी खासदार समीर भुजबळांचे योगदान असल्याचे प्रशस्तीपत्रक काकांनी राष्ट्रवादी फुटीनंतर एमईटीत झालेल्या मेळाव्यात दिले. अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्याच्या तयारीला त्यांना अतिशय कमी वेळ मिळाला. मैदानाच्या तुलनेत ही जागा अपुरी आहे. त्यामुळे गर्दीत उपस्थितांना काही अडचण होऊ शकते, अशा दिलगिरीवजा सूरात भुजबळांनी अल्पावधीत केलेल्या जय्यत तयारीचे श्रेय पुतण्याच्या पदरात टाकले.

information about RSS, RSS,
प्रचारक… संघाचा कणा!
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
readers comments on Loksatta editorial
लोकमानस : सरकारला सर्वच आंदोलनांची भीती वाटते
Chief Minister Eknath Shinde testimony regarding Irshalwadi displaced houses
इरशाळवाडी विस्थापितांना हक्काची घरे मिळणार; निवडणूक आचारसहिंता लागण्यापूर्वी घरांचा ताबा देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
rohit pawar criticized devendra fadnavis
Rohit Pawar : “गृहमंत्री धृतराष्ट्राप्रमाणे सत्तेच्या मोहात आंधळे होऊन…”; पुण्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरून रोहित पवारांचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र!
jayant patil latest news
कार्यकर्त्यांनी घोषणा देताच संतापले जयंत पाटील; म्हणाले, “असा पोरकटपणा करणार असाल तर…”
Babasaheb Ambedkar, Shyam Manav,
आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक पुत्र आणि ते…
controversy over distribution of burkha by shinde group
शिंदे गटाकडून बुरखावाटप केल्याने वाद

मुंबईतील एमईटी संस्थेत झालेला अजितदादा गटाचा मेळावा छगन भुजबळ यांच्या राजकीय भूमिकेत ३६० अंशाच्या कोनात झालेले बदल दर्शविणारा ठरला. भुजबळ यांचे हे दुसरे राजकीय बंड. १९९१ मध्ये शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिवसैनिकांच्या धाकाने ते लगेच फारसे बोलू शकले नव्हते. पण, राष्ट्रवादीत बंडाचा झेंडा रोवताना त्यांनी ही कसर भरून काढली. वाकचातुर्याच्या बळावर बदललेली भूमिका सहजतेने, बंडखोरीच्या इतिहासाचे दाखले देत त्यांनी शरद पवार यांना थेट आव्हान दिले. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी अकस्मात मंत्रिपदाची शपथ घेतली नाही. पक्षावर ताबा मिळविण्यासाठी कायदेशीर बाजू तपासून सर्वकाही करण्यात आले. कायदेशीर अभ्यास आणि विचारांती हे नियोजन झाल्याचा उलगडा खुद्द भुजबळ यांनी केला.

हेही वाचा… राष्ट्रवादीतल्या फुटीचे परभणी जिल्ह्यात पडसाद

शिवसेनेतून काँँग्रेसमध्ये दाखल झाल्यापासून भुजबळ यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवला होता. पवारांनी ओबीसींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या नेत्याला कुठलीही तोशिष भासू दिली नव्हती. पक्षातील मराठा नेत्यांच्या दादागिरीला शह देण्यात भुजबळांना नेतृत्वाशी निकटचे संबंध कामी आले होते. त्यामुळे १९९९ मध्ये काँग्रेस आघाडी सरकारमध्ये दादांना डावलून भुजबळांना उपमुख्यमंत्रिपदाची पहिली संधी मिळाल्याचा इतिहास आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉंडरिंग प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये पक्षीय विरोध बाजूला ठेवत पवारांनी त्यांना मंत्रिपद बहाल केले होते. राष्ट्रवादीत अजितदादा आणि भुजबळ यांच्यात फारसे सख्य नसल्याची चर्चा वारंवार होत असे. पवारांच्या मदतीने त्यांना दादांवर मात करणे शक्य होते, असे बोलले जायचे. आता त्याच दादांसमवेत भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन शरद पवार यांनाच धक्का दिला. एमईटीतील मेळाव्यात भुजबळांनी अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नव्या दमाने वाटचाल करणार असल्याचे म्हटले आहे. म्हणजे काकांचे नेतृत्व सोडून भुजबळांनी पुतण्याचे नेतृत्व मान्य केले आहे.

हेही वाचा… शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची सारखीच अवस्था !

पुतण्याच्या पुनर्वसनासाठी पायाभरणी

राष्ट्रवादीवर ताबा मिळविवण्यावरून पवार काका-पुतण्यात राजकीय, कायदेशीर वादाला तोंड फुटले असताना दुसरीकडे भुजबळ काका-पुतणे अतिशय समन्वयाने काम करीत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले. महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्यांमध्ये मतभेद, वाद झालेली अनेक कुटूंब आहेत. परंतु, भुजबळ काका-पुतण्यात कधीही तसा प्रकार झाल्याचे घडलेले नाही. आजवर पक्षाचे राजस्तरीय अधिवेशन असो, मेळावे असो, ते भव्यदिव्य स्वरुपात आयोजनात भुजबळांना पुतणे समीर यांचे सक्रिय सहाय्य लाभले आहे. एमईटीतील अजितदादा समर्थक राष्ट्रवादीच्या मेळाव्यात त्याची पुनरावृत्ती झाली. मेळाव्याच्या तयारीला केवळ दोन दिवस मिळाले. पावसाळ्यात मैदानावर मेळावा घेणे अवघड होते. अल्पावधीत समीर भुजबळांनी ही तयारी केल्याचा दाखला काकांनी दिला. पक्षाच्या स्थापनेपासून मेळावे, अधिवेशनाची नियोजनबध्द तयारी पुतण्या समीर, मुलगा पंकज आणि त्यांचे सहकारी करीत असल्याकडे भुजबळांनी लक्ष वेधले. नाशिकमध्ये २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन पार पडले होते. त्या आयोजनाबद्दल शरद पवार यांनी समीर यांचे कौतुक केले होते. लगोलग त्यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळून ते निवडून आले होते. त्यानंतर पुढील काळात हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या हातातून निसटला. बदलत्या समीकरणात काकांनी पुतण्या समीर यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.