लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे आयोजन करून वातावरणनिर्मितीवर भाजपने भर दिला आहे. यानुसार येत्या रविवारी रोजी पंतप्रधान मोदी जळगावला जाणार असून तेथे ‘लखपती दीदी’ योजनेच्या समारंभास ते उपस्थित राहणार आहेत. तर ३० तारखेला डहाणूजवळील वाढवण बंदराचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Agitation in Azad Maidan to protest the sub categorization of Scheduled Castes print politics news
अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या निषेधार्थ निदर्शने
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
Loksatta karan rajkaran BJP challenge for Congress in Solapur City Madhya constituency of Praniti Shinde in Assembly elections 2024 print politics news |
कारण राजकारण: प्रणिती शिंदे यांच्या ‘सोलापूर शहर मध्य’मध्ये काँग्रेससाठी यंदा डोकेदुखी
Rajiv Kumar on Maharashtra Assembly Election Date Schedule in Marathi
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाच्या आयुक्तांचं मोठं विधान, म्हणाले…
Long term seat to NCP Ajit Pawar demand accepted in Rajya Sabha by election
जास्त मुदत असलेली जागा राष्ट्रवादीला; राज्यसभा पोटनिवडणुकीत अजित पवारांची मागणी मान्य
Abhishek Bachchan reacts on divorce rumors with Aishwarya Rai
ऐश्वर्या रायपासून घटस्फोट घेण्याच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन; म्हणाला…
assam marwari community
Assam Row: आसाममध्ये बदलापूरसारखा उद्रेक; अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणात मारवाडी समाज लक्ष्य
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

वाढवण बंदरासंदर्भात आवश्यक मंजुऱ्या मिळाल्यानंतर भूमिपूजन फेब्रुवारीत करण्याचे नियोजित होते. मात्र त्यावेळी ते होऊ शकले नाही आणि नंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ते झाले नाही. आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी भूमिपूजनाचा कार्यक्रम करण्याचे ठरविण्यात आले आहे. मोदींच्या दौऱ्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी शासकीय आणि भाजपच्या यंत्रणेकडून या दौऱ्यांची तयारी सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधानांच्या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह महायुतीचे ज्येष्ठ नेते आणि काही केंद्रीय मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.