कर्नाटक विधान परिषदेत कर्नाटक हिंदू धार्मिक संस्था आणि चॅरिटेबल एंडोमेंट्स (सुधारणा) विधेयक २०२४ पारित न होणे हा सिद्धरामय्या सरकारचा मोठा पराभव मानला जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी विधान परिषदेत हिंदू मंदिरांवर कर लादणारे विधेयक मंजूर न केल्याबद्दल विरोधकांवर विशेषत: भाजपावर गंभीर आरोप केले. या विधेयकाबाबत भाजपा लोकांमध्ये खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. या आठवड्याच्या सुरुवातीला विधानसभेत मंजूर झालेले हे विधेयक शुक्रवारी विधान परिषदेत मंजूर होऊ शकले नाही. विधानसभेत मंजूर होऊनही हिंदू धार्मिक विधेयकाला विधान परिषदेत विरोध झाला. कर्नाटकमधील मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी हे विधेयक विधान परिषदेत मांडले, त्यावरून भाजपा आणि काँग्रेस सदस्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. अखेर उपसभापती प्रणेश यांनी आवाजी मतदानाने मतदान केले. राज्याच्या वरिष्ठ सभागृहात भाजपा आणि जेडीएसचे बहुमत आहे. या विधेयकावर निर्णय घेण्यासाठी आवाजी मतदान घेण्यात आले आणि त्याच्या बाजूने फक्त ७ मते पडली, तर विरोधात १८ मते पडली. कर्नाटक विधान परिषदेत भाजपाचे ३४, काँग्रेसचे २८ आणि जनता दल सेक्युलरचे आठ सदस्य आहेत. २२४ सदस्यीय विधानसभेत भाजपाच्या ६६ आणि जेडीएसच्या १९ विरुद्ध काँग्रेसकडे १३४ आमदारांसह बहुमत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा