संतोष प्रधान
शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर राज्यात विरोधी पक्षाची जागा घेण्याची काँग्रेसला संधी चालून आली आहे. फक्त आपापसात वाद घालणारे काँग्रेस नेते या संधीचा कसा लाभ उठवितात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राज्यात काँग्रेसची पाळेमुळे एककाळी घट्ट बांधली गेली होती. पण २०१४च्या विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेसची पिछेहाट झाली. २०१४ मध्ये स्वबळावर लढताना ४२ आमदार निवडून आले. २०१९च्या निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर आघाडी असताना ४४ आमदार निवडून आले होते. परिणामी काँग्रेस चौथ्या क्रमांकावर मागे पडला होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची तेवढी छाप पडू शकली नव्हती.
हेही वाचा… अदिती तटकरे यांच्या मंत्रिपदामुळे रायगडमधील शिंदे गटाच्या तिन्ही आमदारांची कोंडी
गेल्या वर्षी शिवसेनेत फूट पडली. आता राष्ट्रवादीत अजित पवार यांनी बंड केले. या बंडामुळे शिवसेना व राष्ट्रवादीची ताकद पूर्वीप्रमाणे राहिलेली नाही. यामुळेच विरोधी पक्षाची जागा घेण्याची काँग्रेसला संधी चालून आली आहे. लोकांमध्ये जाऊन शिंदे सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका काँग्रेस नेत्यांना घ्यावी लागेल. कर्नाटकातील विजयानंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांचा उत्साह वाढला आहे. अशातच अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीची ताकद निश्चितच कमी होणार आहे.
हेही वाचा… आरोप केलेले बहुसंख्य नेते भाजपबरोबर आल्याने किरीट सोमय्या यांची पंचाईत
राज्य काँग्रेसमध्ये गटबाजीने कळस गाठला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेतला जातो. विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर नाशिक पदवीधर निवडणूक योग्यपणे हाताळली नाही म्हणून पक्षाने नाराजी व्यक्त केली होती. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे आपले महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सर्व नेत्यांनी एकत्र बसून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
हेही वाचा… राज्यातील विधानसभा व लोकसभेची एकत्र निवडणूक?
लोकसभा व विधानसभा निवडणुकांना अद्यापही अवकाश आहे. या वर्षभरात पक्षांची व्यवस्थित बांधणी करून लोकांमध्ये गेल्यास काँग्रेसचा फायदा होऊ शकतो. अर्थात त्यासाठी लोकांचे प्रश्व हातात घेऊन आक्रमक भूमिका घ्यावी लागेल.