बिहारमधील भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केला. मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाने मद्य माफियांकडून दहा हजार कोटींची लाच घेतली असल्याचे ते म्हणाले. २०१६ साली जेव्हा दारूबंदी लागू केली, तेव्हापासून हा घोटाळा होत असल्याचेही ते म्हणाले. ते म्हणाले की, बिहारमध्ये मद्य घरपोच केले जात आहे. मद्य माफियाने नितीश कुमार आणि जेडीयू पक्षाला या बदल्यात दहा हजार कोटी दिले. सरकार आणि मद्य माफियांचे संगनमत झाले असून राज्याचा हा अवमान आहे, अशी टीका सम्राट चौधरी यांनी केली.

सम्राट चौधरी यांचे आरोप जेडीयूने फेटाळून लावले. “सम्राट चौधरी यांचे वक्तव्य हे दारूबंदीच्या विरोधात असल्याचे दिसते. तसेच त्यांनी आमच्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे आणि धादांत खोटे आहेत. आम्ही त्यांना खुले आव्हान देतो की, त्यांनी या आरोपाबद्दलचे पुरावे द्यावेत. जर सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका केली नाही तर त्यांच्याकडे माध्यमे तरी कशाला लक्ष देतील?” अशी टीका जेडीयूचे नेते अभिषेक कुमार झा यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
demand for ransom of Rs 2 crore case filed against three including Valmik Karad in kej
दोन कोटींच्या खंडणीची मागणी; वाल्मीक कराडांसह तिघांवर केजमध्ये गुन्हा
Mehkars Circuit youth detained for providing false information about emergency alert system
‘मंदिरावर हल्ला झाला’! ‘त्या’ क्रमांकावर संदेश आल्याने पोलिसांची धावपळ, प्रत्यक्षात…
operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Mumbai, gold, silver , Accused arrested with gold,
मुंबई : १९ कोटींच्या सोन्या, चांदीसह आरोपीला अटक
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?

हे वाचा >> ‘बिहार में का बा?’ नेहा राठोडच्या नव्या गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा, नितीशकुमारांवर टीका करताना म्हणाली…

सम्राट चौधरी पुढे म्हणाले की, आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा पुन्हा एकदा बिहारमध्ये एकहाती विजय मिळवेल. तसेच २०२५ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतदेखील भाजपाचेच सरकार राज्यात येईल. आम्ही विश्वास देऊ इच्छितो की, पक्षाचा एखादा सामान्य कार्यकर्तादेखील राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो आणि नितीश कुमार यांच्यापेक्षा चांगला पर्याय ठरू शकतो. यापुढे भाजपा दुसऱ्या पक्षातील नेत्यांना मुख्यमंत्री बनवून राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी मदत करणार नाही, असेही चौधरी यांनी या वेळी जाहीर केले.

२०२२ मध्ये, जेडीयूने भाजपासोबतची आघाडी तोडून तेजस्वी यादव यांच्या आरजेडी पक्षासोबत आघाडी करून पुन्हा नवे सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये आरजेडीसोबतच काँग्रेस, सीपीआय-एमएल, एचएएम-एस, सीपीआय आणि सीपीएमसारखे पक्षदेखील सहभागी आहेत. बिहार विधानसभेत २४२ जागा आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी १२२ जागांची आवश्यकता असते.

Story img Loader