महाराष्ट्राप्रमाणेच बिहारच्या राजकारणातही मोठ्या घडामोडी घडत आहेत. तेथे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल (जदयू) पक्षात उभी फूट पडणार आहे, असा दावा भाजपाचे नेते करत आहेत. एकीकडे ही चर्चा सुरू असताना दुसरीकडे नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपाशी युती करणार असल्याची चर्चा रंगली आहे. नितीश कुमार यांनी नुकतीच जदयू पक्षाचे खासदार तथा राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांची पटणा येथे भेट घेतली आहे. नितीश कुमार-हरिवंश यांच्यातील भेटीमुळे वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नितीश कुमार यांनी घेतली राज्यसभेच्या उपसभापतींची भेट

नितीश कुमार आणि हरिवंश यांच्यात पटणा येथे बैठक पार पडली. मात्र हरिवंश यांच्या कार्यालयाने ही एक औपचारिक बैठक असल्याचे सांगितले आहे. कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार ही बैठक फक्त १५ मिनिटांची होती. मात्र राष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ही बैठक साधारण एक ते दीड तास चालली. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडत एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. नंतर जदयू पक्षाने राष्ट्रीय जनता दल अर्थात आरजेडी आणि काँग्रेससोबत युती करत बिहारमध्ये सरकारची स्थापना केली होती. जदयूने भाजपाशी काडीमोड घेतल्यानंतरही जदयू पक्षाचे हरिवंश हे उपसभापतीपदी कायम आहेत. त्यामुळे नितीश कुमार यांनी एनडीएमध्ये पुन्हा सामील होण्यासाठी हरिवंश यांच्या रुपात आपला मार्ग खुला ठेवला आहे, असे म्हटले जात आहे.

जदयू पक्षाच्या आमदार, खासदारांमध्ये नाराजी?

मागील काही दिवसांपासून जदयू पक्षात उभी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जदयू पक्षाच्या नेत्यांना राजद आणि काँग्रेस पक्षाशी युती करणे आवडलेले नाही. या पक्षातील अनेक आमदार आणि खासदारांनी राजद आणि काँग्रेसच्या उमेदवारांना पराभूत केलेले आहे. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राजद आणि काँग्रेसशी युती कायम राहिल्यास आम्हाला तिकीट मिळणार का? असा प्रश्न जदयूच्या खासदारांना तसेच काही नेत्यांना पडलेला आहे. २३ जून रोजी पटणा येथे विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर तर या नाराजीला अधिक बळ मिळाले आहे. जदयू पक्षाच्या अनेक नेत्यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य नाही. त्यामुळे सध्या जदयूमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे.

नितीश कुमार यांच्या आमदार, खासदारांसोबत स्वतंत्र बैठका

जदयू पक्षात नाराजी असल्याची चर्चा सुरू असतानाच नितीश कुमार यांनी हरिवंश यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे नितीश कुमार मागील काही दिवसांपासून आपल्या पक्षातील आमदार आणि खासदारांसोबत स्वतंत्र बैठका घेत आहेत. यामुळेही अनेक चर्चांना उधाण आले आहे.

‘नितीश कुमार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाहीत’

महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्यानंतर बिहामधील जदयू पक्षातही अशीच फूट पडणार असल्याचे भाकित अनेक नेत्यांनी केले आहे. लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी बिहारमध्ये लवकरच मध्यावधी निवडणुका लागणार आहेत. नितीश कुमार त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाहीत, असा दावा त्यांनी केला आहे. तर जदयू पक्षातील आही आमदार माझ्या संपर्कात आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत जदयू पक्ष १० जागांवरही विजय मिळवू शकणार नाही, असेही पासवान म्हणाले आहेत.

‘जदयू पक्षात बंडखोरी होण्याची शक्यता’

भाजपा पक्षाचे नेते सुशील मोदी यांनीदेखील लवकरच जदयू पक्षात फूट पडणार असल्याचा दावा केलाय. जदयू पक्षाचे खासदार राहुल गांधी आणि राजद पक्षाचे नेते तेजस्वी यादव या दोन्ही नेत्यांना स्वीकारणार नाहीत. याच कारणामुळे जदयू पक्षात बंडखोरी होण्याची शक्यता आहे, असा दावा सुशील मोदी यांनी केला.

नितीश कुमार यांच्यासाठी दरवाजा बंद?

दरम्यान, नितीश कुमार भाजपासोबत युती करण्याची शक्यता पडताळून पाहात असल्याचे म्हटले जात असतानाच सुशील मोदी यांनी भाजपा आणि जयदू या दोन पक्षांच्या युतीच्या शक्यतेवर भाष्य केले आहे. ‘नितीश कुमार यांच्याशी युती करायची की नाही, याबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. नितीश कुमार यांच्यासाठी आमचे दरवाजे बंद आहेत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही त्यांचा एनडीएमध्ये समावेश करून घेणार नाही,’ असे सुशील मोदी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी काळात नितीश कुमार यांच्या पक्षात बंडखोरी होणार? की नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपाशी हातमिळवणी करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.