बिहारच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा एनडीएत सामील होणार आहेl, अशी चर्चा तेथे रंगली आहे. लवकरच बिहारची विधानसभा बरखास्त केली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे भाजपाने आपल्या सर्व आमदारांना पाटण्यात बोलावून घेतल्याचा दावा केला जातोय. काही दिवसांपूर्वीच मी भाजपाशी युती करणार नाही, असे नितीश कुमार म्हणत होते. मात्र, आता हेच नितीश कुमार आता भाजपाशी हातमिळवणी करण्याच्या मानसिकतेत असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, नितीश कुमार यांची राजकीय भूमिका बदलण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी याआधीही अनेकदा राजकीय सोय बघून वेगवेगळ्या पक्षांशी युती केलेली आहे.

इंडिया आघाडीसाठी बजावली महत्त्वाची भूमिका

नितीश कुमार सध्या इंडिया आघाडीत आहेत. या आघाडीत विरोधी बाकावरील एकूण २८ घटक पक्ष आहेत. या विरोधकांना एकत्र आणण्यासाठी नितीश कुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा, शिवसेना (ठाकरे गट) अशा देशातील वेगवेगळ्या नेत्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे नितीश कुमार यांनी आता भाजपाशी हातमिळवणी केल्यास इंडिया आघाडीच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. नितीश कुमार यांच्या या निर्णयाचा बिहारमधील महाआघाडी, तसेच राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडीला मोठा फटका बसू शकतो.

shivraj singh chauhan Maha Vikas Aghadi and Rahul Gandhi mislead the public with false promises and no development vision
शिवराजसिंह चौहान म्हणतात राहुल गांधींकड विकासाचे कुठलेही व्हीजन नाही
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Top leaders including Prime Minister Home Minister and Priyanka Gandhi are touring Vidarbha
गृहमंत्री शहा यांचा दौऱ्यात नक्सली एलिमेंट नजरेत,शहा चहा घेत नाही म्हणून मग,,,
devendra fadnavis vote jihad
“धर्माचा वापर करून महाविकास आघाडीचे प्रमुख नेते वोट जिहाद करत आहेत”, फडणवीस यांची टीका
Congress Secretary Sandesh Singalkar filed a complaint against Modi, Shah, and Nadda with Election Commission
संविधान बदल अन् ‘ चारसो पार’ चा नारा:मोदी, शाहांविरुद्ध एफआयआर करा,काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार
Natikuddin Khatib, Balapur, Nitin Deshmukh,
‘बाळापूर’ दोन्ही शिवसेनेसह वंचितसाठी आव्हानात्मक, लढतीला धार्मिक रंग; मतविभाजन निर्णायक
Dr Sachin Pavde become X factor against MLA Dr Pankaj Bhoir and Shekhar Shende
डॉ. सचिन पावडे ठरताहेत ‘ एक्स ‘ फॅक्टर, आघाडी व युतीस धास्ती.

२०१३ मध्ये एनडीएत सामील होण्याचा निर्णय

नितीश कुमार यांनी गेल्या १० वर्षांत पहिल्यांदा २०१३ मध्ये एनडीएत सामील होण्याचा निर्णय घेतला होता. विरोधकांमध्ये एक स्वच्छ आणि सर्वधर्मसमभाव जपणारा नेता असावा म्हणून त्यांनी भाजपाशी युती केली. मात्र पुढे २०१४ सालच्या निवडणुकीत एनडीएकडून नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून निवड करण्यात आली आणि नितीश कुमार यांची संधी हुकली.

जुलै २०१७ मध्ये तोडली राजदशी युती

पुढे त्यांनी संघमुक्त भारताची हाक देत आम्ही मातीत मिसळलो तरी बेहत्तर; पण यापुढे भाजपाशी युती करणार नाही, अशी भूमिका घेत एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. २०१५ सालची बिहार विधानसभा निवडणूक लक्षात घेता, त्यांनी बिहारमधील राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि काँग्रेस, तसेच इतर छोट्या पक्षांशी युती केली होती. या युतीला तेव्हा महायुती, असे नाव देण्यात आले. या युतीने बिहारच्या निवडणुकीत तेव्हा २४३ पैकी १७८ जागा जिंकल्या होत्या. ही निवडणूक जिंकल्यानंतर नितीश कुमार यांची बिहारचे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. नितीश कुमार मुख्यमंत्री असताना राजदचे नेते तथा उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. त्यामुळे त्यांनी जुलै २०१७ मध्ये राजदशी असलेली युती तोडली.

२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत सर्वकाही आलबेल

राजदशी असलेली युती संपुष्टात आल्यानंतर नितीश कुमार यांनी भाजपाशी हातमिळवणी करीत बिहारमध्ये पुन्हा सरकारची स्थापना केली. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत जदयू आणि भाजपा यांच्यात सर्वकाही आलबेल होते. या निवडणुकीत भाजपाने १७ जागांवर विजय मिळवला होता; तर जदयूने १७ पैकी १६ जागांवर विजय मिळवला होता.

भाजपा – जदयू यांच्यात तणाव

मात्र, २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत समसमान जागावाटपाच्या मुद्द्यावरून, तसेच नितीश कुमार यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करण्यात भाजपाने स्पष्ट भूमिका घेतली नाही. शेवटी भाजपाने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद, तसेच समान जागा देण्यास तयारी दाखवली; मात्र भाजपाने जदयूचे काही उमेदवार पाडण्यासाठी एलजेपी पक्षाला बळ दिले होते, असा आरोप केला जातो. कालांतराने नितीश कुमार आणि भाजपाचे नेतृत्व यांच्यातील संबंधांमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला. शेवटी त्यांनी भाजपापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

ऑगस्ट २०२२ मध्ये पुन्हा महायुती

नितीश कुमार यांची राष्ट्रीय राजकारणात येण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. अनेक वर्षांपासून ते यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करीत आहेत. ऑगस्ट २०२२ मध्येही हीच महत्त्वाकांक्षा मनाशी बाळगून, त्यांनी राजदशी युती करीत पुन्हा एकदा महाआघाडीची स्थापना केली. राजदशी युती करून नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. सध्या ही महाआघाडी कायम असून, यात डावे पक्ष, काँग्रेस, राजद, जदयू या पक्षांचा समावेश आहे.

आगामी काळात नेमके काय होणार?

गेल्या वर्षभरात नितीश कुमार यांनी देशातील वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली होती. २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत मोदींना सत्तेतून दूर करण्यासाठी त्यांनी विरोधकांना एकत्र करण्याचे काम केले. मात्र, काही दिवसांपासून बिहारमध्ये जदयू आणि राजद पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचे म्हटले जात आहे. असे असतानाच आता नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपाशी हातमिळवणी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.