निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सार्वत्रिक निवडणुका सात टप्प्यांत होणार असून, निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये लोकसभेसाठी सात टप्प्यातील निवडणूक होत असताना विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाने भाजपावर सरकारी संस्थांचा आपल्या फायद्यासाठी गैरवापर करीत असल्याचा आरोप करीत आहे. सात टप्प्यांत निवडणुका झालेल्या तीन राज्यांपैकी बिहारमध्ये लोकसभेच्या सर्वात कमी ४० जागा आहेत, इतर दोन राज्यात म्हणजेच उत्तर प्रदेश ८० जागा आणि पश्चिम बंगाल ४२ जागा आहेत.
यूपीच्या तुलनेत बिहारमध्ये लोकसभा मतदारसंघांची संख्या निम्मी असल्याचे आरजेडीचे राष्ट्रीय प्रवक्ते सुबोध कुमार मेहता यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. ते म्हणाले की, “आम्ही एनडीए सरकारच्या काळात सरकारी संस्था, नोकरशाही आणि माध्यमांचा गैरवापर करण्याचा एक वाईट ट्रेंड पाहिला आहे. कडक उन्हाळ्यात बिहारमध्ये दीड महिन्यात सात टप्प्यांत होणाऱ्या मतदानाला काही अर्थ नाही. उत्तर प्रदेशात ते समजू शकतो. लांबलेल्या निवडणुकांमुळे एनडीएची अस्वस्थता दिसून आली आहे, ज्यात भाजपा, जेडी(यू), लोक जनशक्ती पक्षाचे दोन गट आणि इतर लहान पक्षांचा समावेश आहे.
हेही वाचाः साताऱ्यातून आजी-माजी सैनिक, माथाडी कामगारांचे नेतेही इच्छुक
“भाजपाने नितीश कुमार यांच्याबरोबर युती केली असली तरी परत एनडीएमध्ये स्थान न दिल्यानेच त्यांचेच शब्द त्यांना खात आहेत. त्यामुळे वेळापत्रकानुसार, ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अधिक रॅलींचे नियोजन करू शकतात आणि त्यांच्या फायद्यासाठी सरकारी यंत्रणा वापरू शकतात. भाजपाशी अशी वागणूक मतदारांना निराश करू शकते, ” असेही आरजेडी प्रवक्ते मेहता म्हणाले. तसेच आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी नोकऱ्या देण्याच्या दिलेल्या आश्वासनानंतर एनडीए घाबरलेला दिसत आहे.
हेही वाचाः कोल्हापूरसाठी सांगलीचा बळी नको, काँग्रेस नेत्यांचे नेतृत्वाकडे आर्जव
गेल्या वेळी कमी-अधिक समान घटक असलेल्या एनडीएने बिहारमधील निवडणुकीत ४० पैकी ३९ जागा जिंकल्या होत्या. यावर भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष निखिल आनंद यांनी आरजेडीवर टीकास्त्र डागले. निवडणूक आयोगाने घातलेल्या अटी सर्व राजकीय पक्षांसाठी समान आहेत. “निवडणूक आयोगावर आरोप करून आरजेडी रडीचा डाव खेळत आहे हे सिद्ध होते. इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी आतापासूनच म्हणजे निवडणुकीपूर्वीच पराभव स्वीकारलेला आहे, असे दिसते.” प्रत्येक पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना मोठमोठ्या घोषणा देऊन आकर्षित करतोय. त्यामुळेच आरजेडी भाजपाच्या घोषणांना घाबरत आहे. आम्ही बिहारमधील लोकसभेच्या सर्व जागा जिंकू शकतो हे आमच्या कार्यकर्त्यांच्या कामावरून दिसून येत आहे. आरजेडी-काँग्रेस-डावी आघाडी ही भाजपा आणि एनडीएचा सामना करण्यास घाबरत असल्याचंही ते म्हणालेत.