गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि संयुक्त जनता दल (जदयू) यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचा दावा केला जात आहे. सत्तेत असूनही गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही पक्षांत अनेक मुद्द्यांवर वाद आहेत, असे म्हटले जाते. दरम्यान, गेल्या काही दिवसांत बिहारमध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. असे असतानाच आता बिहारला आलोक कुमार मेहता यांच्या रुपात नवे शिक्षणमंत्री मिळाले आहेत. मेहता हे राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या जवळचे मानले जातात.

मेहता राजदचे अनुभवी नेते

मेहता यांच्याआधी राजदचे नेते चंद्रशेखर यांच्याकडे शिक्षण मंत्रालय होते. मात्र त्यांच्याकडून हे खाते काढून त्यांच्याकडे साखर मंत्रालय सोपवण्यात आले आहे. आता शिक्षण मंत्रालय आलोक कुमार मेहता यांच्याकडे देण्यात आले आहे. मेहता यांच्याकडे शिक्षण मंत्रालय देण्याची अनेक कारणे आहेत. सर्वांत पहिले कारण म्हणजे ते लालू प्रसाद यादव यांच्या जवळचे मानले जातात. दुसरी बाब म्हणजे एक अनुभवी नेते म्हणून त्यांची ओळख आहे. ते अभियंता आहेत. २००४ साली त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. ते समस्तीपूरच्या जागेवरून निवडून आले होते. त्यांचे वडीलदेखील राजकारणी होते. आलोक मेहता यांचे वडील तुलसीदास मेहता यांनी ऑक्टोबर १९९० मध्ये भाजपाचे नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या रथयात्रेला विरोध करत जनता दलाच्या आंदोलनात सहभाग घेतला होता. तुलसीदास मेहता हे लालूप्रसाद यादव यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते.

mahavikas aghadi government in state was lost because of Sanjay Raut vishwajit Kadams criticism
संजय राऊतांमुळे राज्यातील आघाडीचे सरकार गेले, विश्वजित कदम यांची खोचक टीका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
those claiming hindus in danger denying reservation to marathas says manoj jarange patil
‘हिंदू खतरे में’ म्हणणाऱ्यांचे मराठ्यांकडे दुर्लक्ष; मनोज जरांगे यांची महायुतीवर टीका
yogi adityanath criticize congress and mahavikas aghadi
योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”
Ramdas Athawale, Panvel Candidate Prashant Thakur,
राहुल गांधी यांच्या अनेक पिढ्या आल्या तरी संविधान बदलू शकणार नाहीत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन
Rs 700 crore was recovered from liquor sellers pm Narendra Modi alleged
“काँग्रेसच्या सत्तेतील राज्य शाही परिवाराचे ‘एटीएम’, मद्यविक्रेत्यांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही

समस्तीपूर येथून लढवली लोकसभेची निवडणूक

मेहता १९९४ साली सक्रिय राजकारणात आले. सुरुवातीला त्यांनी राजदच्या युवा शाखेत काम केले. २००४ साली त्यांनी समस्तीपूर येथून पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना ५०.६ टक्के मते मिळाली. ते इतर मागास प्रवर्गातील कुशवाह समाजातून येतात. ते राजद पक्षाचे कुशवाह समाजाचा चेहरा आहेत.

उदयपूर जागेवरून निवडणूक लढवत ५२.४ टक्के मते

तेजस्वी यादव यांनी २०१२ साली सक्रिय राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तेजस्वी यादव यांना मदत करणाऱ्या मोजक्या नेत्यांत आलोक कुमार मेहता होते. २०१५ साली राजद आणि जदयू पक्षांनी युती करत विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मेहता यांनी उदयपूर जागेवरून निवडणूक लढवत ५२.४ टक्के मते मिळवली. ही निवडणूक जिंक्यानंतर मेहता यांना नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये सहकारमंत्रिपद मिळाले. २०२० सालच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी विजयी कामगिरी करत ४८.८ टक्के मते मिळवली.

वादात न सापडणारा नेता हवा होता

मेहता यांच्याआधी चंद्रशेखर यांच्याकडे शिक्षणमंत्रिपद होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली. रामचरितमानसवर केलेल्या विधानामुळे तर बिहार सरकारवर चांगलीच टीका झाली होती. त्यामुळे जबाबदारीने वागेल, तसेच कोणत्याही वादात सापडणार नाही, असा नेता नितीश कुमार तसेच राजद पक्षाला हवा होता. आलोक मेहता हे अनुभवी नेते समजले जातात. याच कारणामुळे राजदने चंद्रशेखर यांच्याकडील शिक्षणमंत्रिपद काढून ते आलोक मेहता यांना दिले आहे. याबाबत राजदच्या अंतर्गत सूत्रांनी प्रतिक्रिया दिली. “लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांना चंद्रेशखर शिक्षणमंत्रिपदावर नको होते. सध्या शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी काही नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नितीश कुमार यांना या अधिकाऱ्यांशी समन्वय साधणार शिक्षणमंत्री हवा होता,” असे या नेत्याने सांगितले.