बिहारमध्ये रामचरित मानस वरून सुरू झालेला वाद शमण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. यावरून राजकारण होताना दिसतं आहे. बिहारचे शिक्षण मंत्री चंद्रशेखर यांनी जे वक्तव्य केलं त्यावरून तर भाजपा खासदाराने असंही सांगितलं की लवकरच महाराष्ट्रासारखा खेळ बिहारमध्ये होणार आहे. म्हणजेच बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजपा आक्रमक होणार आणि सत्ता उलथवण्याचे प्रयत्न करणार असं दिसतं आहे.

काय म्हटलं होतं चंद्रशेखर यांनी?

रामचरित मानस आणि माधव गोळवलकर यांनी लिहिलेलं बंच ऑफ थॉट्स यांसारख्या पुस्तकांमुळे देशातल्या ८५ टक्के जनतेला मागास ठेवण्याचं काम केलं आहे. हिंदू ग्रंथ अशी मान्यता असलेलं रामचरित मानस हे देखील मनुस्मृती प्रमाणे जाळून टाकलं पाहिजे. कारण असे ग्रंथ हे समाज विभागणीला प्राधान्य देणारे ठरतात. या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. भाजपाने हा मुद्दा प्रचंड मोठा करत चंद्रशेखर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरही दबाव टाकला जातो आहे.

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
Rahul Gandhi criticized media for focusing on Ambanis wedding Adani and Modi not on farmers
राहुल गांधींची माध्यमांवर आगपाखड; म्हणाले, “शेतकरी व गरिबांचा मुद्दा…”
mayura kale
“आजवर काय केले तेही सांगत नाही अन् पुढे काय करणार ते पण बोलत नाही,” चर्चेतील टीका
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

राजदकडूनही चंद्रशेखर यांच्या वक्तव्याचा विरोध
राजदने बिहारचे शिक्षण मंत्री चंद्रशेखर यांच्या रामचरित मानस बाबतच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. राजदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी असं म्हटलं आहे की रामचरित मानस बाबत आक्षेप घेण्याचा पक्षाचा काहीही निर्णय झालेला नाही. जर रामचरित मानस या हिंदू ग्रंथावर काही आक्षेप घ्यायचे असतील आणि तसा निर्णय झाला असेल तर तेजस्वी यादव यांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली गेली पाहिजे आणि त्यात हा निर्णय समोर आला पाहिजे. याचाच अर्थ राजदमध्येच या मु्द्यावर एकमत होताना दिसत नाही हेदेखील समोर आलं आहे.

हे सगळं प्रकरण अशा वेळी घडलं आहे जेव्हा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर माजी कृषी मंत्री सुधाकर सिंह वारंवार टीका करत आहेत. त्यांना समज देण्यात लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांना मर्यादा आड येत आहेत. त्यामुळे जदयू मधलेही काही नेते नाराज आहेत. नितीश कुमार यांनी बिहारची दुष्काळपरिस्थिती नीट हाताळली नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं तसंच इतरही अनेक टिपण्ण्या त्यांनी केल्या. एवढंच नाही जाहीरपणे हे सगळं बोलल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामाही दिला. त्यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार शांत राहिले कारण त्यांना महाआघाडीमध्ये कुठलीही दुही माजू द्यायची नव्हती. भाजपाला राजकीय फायदा होऊ नये असंही नितीश कुमार यांना वाटत होतं. अशात जदयूचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी हेदेखील सांगितलं आहे की आम्ही राम रहीम संस्कृतीवर विश्वास ठेवतो. आपल्या मृत्यूपूर्वी हे राम असं म्हणणारे महात्मा गांधी , संविधान ज्यांनी लिहिलं ते बाबासाहेब आंबेडकर आणि रामलीला आयोजित करणारे पण समाजवादाला आदर्श मानणारे राम मनोहर लोहिया यांना आम्ही आमचे आदर्श मानतो.

आता रामचरित मानस याविषयी जे वक्तव्य शिक्षण मंत्री चंद्रशेखर यांनी केलं आहे त्यामुळे भाजपा तर आक्रमक झाली आहेच पण राजदमध्येही यावरून नाराजी आहे. या सगळ्या वातावरणाचा फायदा निश्चितच भाजपाला होतो आहे. दुसरीकडे या वादावर पडदा पडावा यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. कारण राजदचे प्रवक्ते मृत्यूंजय तिवारी यांनी इंडियन एक्प्रेसला हे सांगितलं की राम किंवा रामचरित मानस यावरून वाद उद्भवण्याचा काही प्रश्न नाही. वाद हा मजकुरातल्या काही श्लोकांविषयी असू शकतो. पण तो अर्थ मंत्री चंद्रशेखर यांनी स्वतः काढलेला असू शकतो. थोडक्यात बिहारमध्ये सुरू झालेला वाद आत्ता लगेच थांबेल असं तूर्तास तरी दिसत नाही. त्यामुळे भाजपा काय करणार? बिहारमध्ये काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.