Delhi Election BJP News : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी पाहायला मिळत आहेत. सत्ताधारी आम आदमी पार्टीसह काँग्रेस आणि भाजपाचे नेते एकमेकांना लक्ष्य करीत आहेत. गेल्या दशकभरापासून राजधानीवर अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाची एकहाती सत्ता आहे. यंदाच्या निवडणुकीत ‘आप’ला सत्तेतून खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपाच्या प्रचारासाठी २७ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दिल्लीत येत्या ५ फेब्रुवारीला मतदान

राजधानी दिल्लीतील विधानसभेच्या एकूण ७० जागांसाठी येत्या ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच ८ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. सूत्रांच्या माहितीनुसार, अमित शाह यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरवलेल्या भाजपाच्या २७ शिलेदारांनी याआधी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर पक्षाला अनेकदा यश मिळवून दिलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतही हे शिलेदार प्रचाराची रणनीती आखून पक्षाला मोठं यश मिळवून देईल, अशी भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाला आशा आहे.

Arvind Kejriwal News
Arvind Kejriwal : ‘शीशमहल’चा मुद्दा अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात जाणार? नवी दिल्लीची जागा जिंकण्यासाठीचा मुख्य अडसर?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय?
Ravindra Chavan talk on local body elections in exclusive interview with Loksatta
‘शक्तिशाली’ भारतासाठी ‘बलशाली’ भाजप आवश्यक
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस
bjp deciding direction of campaign for the delhi assembly elections
लाल किल्ला : दिल्ली निवडणुकीची सूत्रे भाजपच्या हाती?
Image Of Ramdas Athawale
Ramdas Athawale : रामदास आठवलेंचा पक्षही दिल्लीच्या मैदानात, विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केले १५ उमेदवार

आणखी वाचा : Maharashtra Politics : उदय सामंत हे एकनाथ शिंदेंना पर्याय ठरू शकतात का?

भाजपाच्या दिल्लीतील २७ शिलेदारांमध्ये केंद्रीय मंत्री, पक्षाचे खासदार, आमदार आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये मनसुख मांडविया, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादव या केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. याशिवाय भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे आणि सुनील बन्सल यांच्याकडे निवडणूक प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. विवेक ठाकूर, सुरेंद्र नागर, अरविंद धर्मपुरी, बिप्लब देब यांच्यासारख्या आदी नेत्यांचाही या पॅनलमध्ये समावेश आहे.

दिल्लीसाठी अमित शाहांची खास रणनीती

विशेष बाब म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाच्या या २७ शिलेदारांबरोबर ४ तास बैठक घेतली होती. यावेळी त्यांना बुथस्तरीय संघटन आणखी मजबूत करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या धोरणामुळे भाजपाच्या मतांची टक्केवारी वाढून निवडणुकीत मोठा फरक पडेल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला होता. दरम्यान, या रणनीतीचा भाग असलेल्या भाजपाच्या एका न्यूज १८ ला सांगितले की, “राजधानीतील प्रत्येक बूथवर लक्ष केंद्रित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व ७ जागा तीनदा जिंकण्यात आम्हाला यश मिळालं आहे. त्यामुळे याच रणनीतीचा अवलंब करण्याचा आमचा प्रयत्न असेल.”

“लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही या बूथवर मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी प्रत्येक नेत्यांकडे दोन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाचे स्टार प्रचारक आणि उमेदवारांकडे देण्यात आलेल्या जबाबदारी व्यतिरिक्त ते इतर महत्वाची कामे पार पाडण्यात मोठा हातभार लावतील. आम्हाला निवडणुकीत आक्रमक प्रचार करण्याची किंवा भाषणं करण्याची गरज नाही. निवडणुकीत आम्ही पडद्यामागे राहून काम करू”, असंही भाजपाच्या सूत्राने न्यूज१८ ला सांगितलं आहे.

राजधानीत भाजपा कसा प्रचार करणार?

“दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमधील अनेक शहरं एनसीआरमध्ये आहेत. पक्षाकडे असलेल्या विस्तृत क्षमतेमुळे आम्ही देशभरातील सर्व भागांतील नेत्यांना या निवडणुकीच्या व्यवस्थापनासाठी आणू शकतो”, असं भाजपाच्या एका दुसऱ्या सूत्राने सांगितलं आहे. राजधानीतील विधानसभा निवडणुकीत भाजपाचा नक्कीच विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. निवडणुकीदरम्यान पक्षाला किंवा उमेदवाराला अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. ज्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा बराच वेळ जातो. हे काम भाजपाचे २७ शिलेदार अगदी व्यवस्थितपणे सांभाळतील, असंही भाजपाच्या एका सूत्राने सांगितलं.

दिल्लीतील ५१ मतदारसंघात होणार चुरशीची लढत

दिल्लीतील ७० विधानसभा मतदारसंघात आम आदमी पार्टी आणि भाजपामध्ये चुरशीचा सामना रंगण्याची शक्यता आहे. यातील ५१ मतदारसंघात भाजपाने जास्त लक्ष केंद्रित केलं आहे. या जागांवर भाजपाला विजय मिळवता आला तर पक्षाला बहुमताचा आकडा पार करणे सहज शक्य होईल आणि ‘आप’चे राजधानीवरील वर्चस्व संपुष्टात येईल, असं एका भाजपा नेत्याने सांगितले. ते म्हणाले की, “मतदानासाठी दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी उरलेला आहे. त्यामुळे पक्षाचे २७ शिलेदार अगदी जोरकसपणे काम करतील. याचा मोठा फायदा फक्त पक्षालाच नव्हे तर उमेदवारांनाही होईल आणि त्यांना मतदारांपर्यंत अगदी प्रभावीपणे संवाद साधता येईल. भाजपाचे २७ शिलेदार दिल्लीतील मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करतील. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे विविध मुद्द्यांचा अहवाल सादर करतील.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार जंगी सभा

त्याचबरोबर पक्षाच्या जाहीरनाम्यातील घोषणांचा मतदारांवर किती प्रभाव पडतो आहे, याबाबत अपडेट्स देतील. उमेदवार आणि स्थानिक नेत्यांव्यतिरिक्त भाजपाने राजधानीतील खासदारांसह निवडणुकीसाठी ४० स्टार प्रचारकांची नेमणूक केली आहे. त्यांचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असून ते मतदानाआधी किमान तीन सभा घेणार आहेत. भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री, जसे की पुष्कर सिंह धामी, हिमंता बिस्वा शर्मा आणि देवेंद्र फडणवीस यांना स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे. निवडणुकीच्या आधी योगी आदित्यनाथ हे राजधानीत १४ जाहीर सभा घेतील, असं भाजपाच्या सूत्रांनी सांगितलं आहे.

हेही वाचा : Ram Mandir Ayodhya : राम मंदिराच्या उभारणीनंतर अयोध्येतल्या लोकांचं आयुष्य कसं बदललं?

दिल्लीत भाजपाचे ६८ उमेदवार रिंगणात

दिल्लीतील ७० पैकी ६८ विधानसभा जागांवर भाजपाने आपले उमेदवार उभे केले आहेत. एनडीएमधील घटकपक्षांसाठी भाजपाने केवळ दोन जागा सोडल्या आहेत. यामध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील ‘लोजपा’ पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. विशेष बाब म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राजधानीत १५ जागांवर उमेदवार देण्याची तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी भाजपा उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. विरोधी पक्षांमध्ये दिसून येणाऱ्या वादाच्या तुलनेत एनडीएसाठी हा एक मोठा विजय असल्याचे निरीक्षकांचे म्हणणं आहे.

भाजपाचे मित्रपक्ष प्रचारासाठी करणार मदत

दरम्यान, दिल्ली निवडणुकीत भाजपाच्या प्रचारासाठी मित्रपक्षाचे नेते देखील सभा घेणार आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आधीच तारखा मागवण्यात आल्या आहेत. एकंदरीत या निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद आणि राजकीय चाणक्यनितीचा वापर करून भाजपाला विजय मिळवून देण्याचा अमित शाह यांचा प्रयत्न असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. १९९३ मध्ये भाजपाने राजधानीत सत्ता मिळवली होती. मात्र, २७ वर्षांपासून पक्षाला दिल्लीत सत्तेचा दुष्काळ पडला आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाला विजय मिळवण्याची संधी होती. परंतु, अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीच्या उदयाने भाजपाला सत्तेपासून दूर नेले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत आपला शह देऊन भाजपा दिल्लीच्या तख्त काबीज करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader