छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर कोंडीत सापडलेल्या भाजपला मराठवाड्यात पुन्हा एकदा पाण्याच्या आंदोलनातून एकाकी पाडण्यात अन्य पक्षीय नेत्यांना यश आले, असे चित्र निर्माण झाले. सोमवारी भाजप वगळता सर्वपक्षीय नेत्यांनी जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनातही गोदाकाठच्या कार्यकर्त्यांचा समावेश अधिक होता. या आंदोलनात राजेश टोपे, अमरसिंह पंडित, रमेश आडसकर, माजी मंत्री अनिल पटेल यांचा प्रमुख सहभाग होता. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचे खास अशी स्वत:ची ओळख निर्माण करणारे आमदार संजय शिरसाटही आंदोलनात सहभागी झाले.

जायकवाडी जलाशयात ८.६ अब्ज घनफुट पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांनी दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी होऊ नये म्हणून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जलसंपदा मंत्र्यावर दबाव आणला असल्याची चर्चा मराठवाड्यात सुरू आहे. त्यामुळे सोमवारच्या आंदोलनात राधाकृष्ण विखेंच्या विरोधात घोषणाबाजी झाली.

Union Home Minister Amit Shah addresses party workers at state BJP mahavijayi convention for election victory
पंचायत ते संसद भाजपच! निवडणूक विजयासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Foreign varieties on the root of Shrivardhan Rotha betel nut
परराज्यातील वाण श्रीवर्धनच्या रोठा सुपारीच्या मुळावर?
Billeshwar Mahadev temple UP Unnao
Mahabharata era Shivling damaged: महाभारतकालीन शिवलिंगाची विटंबना; अटक केलेल्या आरोपीनं सांगितलं धक्कादायक कारण
Jayant Patil regret reaction on very small size of opposition
जिरवा जिरवीच्या राजकारणामुळे विरोधकांचा आकार एकदम छोटा, जयंत पाटलांकडून खंत
general administration department issued a circular on national heroes anniversaries opposed by mahanubhava corporation
सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या प्रतिमा पूजनावरून वाद! राज्य शासनाच्या ‘या’ निर्णयाला विरोध…
Threat to bar owner Chikhli , Chikhli bar Loot ,
बुलढाणा : रात्रीची वेळ; बार मालकाच्या गळ्याला चाकू लावला अन…
Ramdas Athawale statement on Santosh Deshmukhs murder case
बीड जिल्ह्यात शांतता ठेवायची असल्यास, वाल्मिक कराड याला कठोर शिक्षा झाली पाहिजे : रामदास आठवले

हेही वाचा : भाजपाकडून फार महत्त्व नाही; पण वसंधुरा राजे त्यांच्या बालेकिल्ल्यात अजूनही ‘राणी’

परभणी जिल्ह्यात भाकपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन आधीच छेडले होते. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे जलयुक्त शिवार योजनेत सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांनीही सरकारला घरचा आहेर दिला. नरहरी शिवपुरे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा पाणी परिषद हे औपचारिक संघटन उभे करून पाण्याच्या लढ्याला न्यायालयीन बळ देण्यात आले. या कार्यकर्त्यांनी गोदावरी पाटबंधारे महामंडळासमोरही आंदोलन केले. सोमवारी आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यात आली. जालन्यातून राजेश टोपे आणि शिंदे गटाचे अर्जुन खोतकर हेही आंदोलनात उतरले. काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे यांनी मराठवाड्याच्या न्याय प्रश्नासाठी सर्वपक्षीय एकजुट होणे आवश्यक असल्याचे मत यावेळी आवर्जून व्यक्त करण्यात आले. मात्र, या आंदोलनात भाजपच्या कार्यकर्त्यांचा अजिबात सहभाग नव्हता.

हेही वाचा : कसबा पेठेतील वातावरण पुन्हा तापले

आंदोलनादरम्यान आमदार हरिभाऊ बागडे यांनी आंदोलकांची भेट घेतली. ‘माझे आणि जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बोलणे झाले आहे. त्यांनी जायकवाडीत पाणी सोडू, असे सांगितले आहे. आम्ही आंदोलनात सहभागी नाही आहोत. मात्र, पाणी सोडले जाईल असा निरोप देण्यासाठी आंदोलनस्थळी आलो.’ पाणी कधी सोडले जाईल, हे मात्र त्यांनी सांगितले नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अडचण व्हावी अशी रचना जमून आली होती. त्याचा अन्य भाजप वगळता अन्य पक्षातील नेत्यांनी माध्यमांमध्ये लाभ उठवण्याचाही प्रयत्न केला. आता पाण्यावरूनही भाजप आणि जलसंपदा मंत्री म्हणून फडणवीस यांच्याविषयीचा रोष वाढता राहील, असे प्रयत्न दिसून आले. विशेष म्हणजे या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांची आंदोलनात लक्षणीय संख्या होती. महिला कार्यकर्त्यांचाही सहभाग होता. उद्धव ठाकरे गटाने आंदोलनात फारसा उत्साह दाखविला नाही. पण माजी महापौर नंदकुमार घोडले यांनी हजेरी लावली.

हेही वाचा : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटक भाजपामध्ये खदखद; विजयेंद्र यांच्या नियुक्तीमुळे अनेक नेते नाराज!

राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात या नगर जिल्ह्यातील दोन नेत्यांमुळे पाणी अडविले जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला खरा. पण प्रामुख्याने मंत्री विखे यांनी यात पुढाकार घेतल्याने त्यांच्या विरोधात मराठवाड्यात रोष दिसून येत आहे. अल्पसंख्याकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या चिरंजीवाच्या विवाहप्रसंगी हजेरी लावणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी जायकवाडीच्या पाणी वाटपावर उद्या बोलू, असे म्हटले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिंदे समर्थक आंदोलनात सहभागी झाले, हे विशेष.

Story img Loader