लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कर्नाटकात चार वर्षांपूर्वी भाजपचे सरकार स्थापन करण्यास मदत करणाऱ्या काँग्रेसच्या बहुसंख्य बंडखोर आमदारांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. काही आमदारांना पुन्हा उमेदवारी देऊ नये म्हणून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पक्षाकडे मागणी केली होती. पण पक्षाने त्याकडे दुर्लक्ष केले.
पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे १०४ आमदार निवडून आले तरीही ११३चा जादुई आकडा गाठता आला नव्हता. यामुळेच येडियुरप्पा यांचे सरकार अल्पजीवी ठरले. त्यानंतर जनता दलाचे कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. काँग्रेस – जनता दलाचे सरकार सुरुवातीपासूनच अस्थिर होते. यातच काँग्रेसच्या १३ तर जनता दलाच्या दोन आमदारांच्या राजीनाम्यानंतर कुमारस्वामी सरकार कोसळले. मग येडियुरप्पा पुन्हा मुख्यमंत्री झाले.
आणखी वाचा- नगर भाजप संघटनेच्या कारभारात सुधारणा होणार का ?
भाजपला सरकार स्थापन करण्यास मदत करणाऱ्या आमदारांना भाजपने पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली व पुन्हा निवडून येण्यास सर्वतोपरी मदत केली होती. यातील अनेकांना मंत्रिपदे देण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काही मतदारसंघातील भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी बंडखोर काँग्रेस व जनता दलातून भाजपमध्ये आलेल्या आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यास विरोध दर्शविला होता. पण या आमदारांना पुन्हा उमेदवारी नाकारल्यास भाजप आमदारांचा वापर करून फेकून देते असा संदेश जाण्याची भीती होती. यातूनच भाजपने सर्वांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे.
सीमा भागातील अथनी मतदारसंघातील महेश कुमठहल्ली यांना भाजपने पुन्हा उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघातून गेल्या वेळी पराभूत झालेले आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी बंडखोर काँग्रेस आमदाराला पुन्हा उमेदवारी देण्यास तीव्र विरोध दर्शविला होता. पण पक्षाने सावदी यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष केले. यामुळे सावदी आता बहुधा वेगळी मार्गाने जातील, अशी चिन्हे आहेत.