राजस्थानची विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. ही बाब लक्षात घेता भारतीय जनता पार्टी, काँग्रेस यासारखे राष्ट्रीय पक्ष कामाला लागले आहेत. या पक्षांकडून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच कोणत्या जागेवर आपले प्रभुत्व कमी आहेत, हे जाणून घेण्यासाठी या पक्षांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. राज्य पातळीवरच्या नेत्यांच्या दिल्लीतील नेत्यांसोबतच्या बैठका वाढल्या आहेत. दरम्यान, हरियाणामध्ये मोठा जनाधार असलेली जननायक जनता पार्टी अर्थात जेजेपी हा पक्ष राजस्थानची विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी या पक्षाने तयारीदेखील सुरू केली आहे.

रिटा सिंह यांचा जेजेपी पक्षात प्रवेश, काँग्रेसला फटका?

हरियाणामध्ये जेजेपी पक्षाची भाजपाशी युती आहे. या युतीच्या माध्यमातून हा पक्ष हरियाणात सत्तेत सहभागी झालेला आहे. आता याच पक्षाने राजस्थानची निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. काही महिन्यांपूर्वीच या पक्षाने तसे सूतोवाच केले होते. केल्या काही महिन्यांपासून जेजेपी पक्षाचे नेते राजस्थानचा सातत्याने दौरा करत होते. आपल्या या दौऱ्यात ही नेतेमंडळी राजस्थानमधील वेगवेगळ्या नेत्यांना आपल्या पक्षात सामावून घेत होती. नुकतेच काँग्रेसचे दिग्गज आणि प्रभावी नेते नारायण सिंह आणि काँग्रेसचे दंता रामगड मतदारसंघाचे आमदार विरेंद्र सिंह यांच्या पत्नी रिटा सिंह यांनी जेजेपी पक्षात प्रवेश केला आहे. सिंह परिवाराचे सिकार जिल्ह्यात मोठे राजकीय प्रस्थ आहे. असे असताना रिटा सिंह यांनी जेजेपी पक्षात प्रवेश केल्यामुळे या जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. रिटा सिंह यांच्या पक्षप्रवेशानंतर जेजेपी पक्षाने त्यांच्यावर महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. रिटा सिंह यांच्या जेजेपी पक्षातील प्रवेशामुळे काँग्रेसला फटका बसेल का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

amit shah in jalgaon during campaigning
भाजपचा अल्पसंख्यांकांना आरक्षण देण्यास विरोध; अमित शहा यांच्याकडून भूमिका जाहीर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Most rebellion in Konkan in bjp
कोकणात सर्वाधिक बंडखोरी भाजपमध्ये
ballarpur assembly, abhilasha gavture, sudhir mungantiwar, santosh singh ravat,
गावतुरे यांच्या बंडखोरीने बल्लारपूरमध्ये काँग्रेस अडचणीत
chimur vidhan sabha constituency kirtikumar bunty bhangdiya vs congress satish warjukar
चिमूरमध्ये थेट लढतीमुळे कीर्तीकुमार भांगडिया अडचणीत
Assembly Election 2024, Doctor, Manifesto
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डॉक्टरांचा जाहीरनामा! राजकारण्यांकडे केलेल्या मागण्या जाणून घ्या…
sharad pawar rally in hinganghat
प्रथमच असे घडणार ! शरद पवार यांच्या सभेत हिंगणघाटचे ‘शरद पवार’ गैरहजर राहणार
Jalgaon vidhan sabha election 2024
जळगाव जिल्ह्यात बंडखोरांवरील कारवाईत भाजपचा दुजाभाव, माजी खासदारास अभय

शेतकरी आणि महिलांसाठी काम करणार- रिटा सिंह

जेजेपी पक्षात प्रवेश करताच रिटा सिंह यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मात्र यावेळी त्यांनी त्यांच्या जेजेपी प्रवेशामुळे काँग्रेसला फटका बसणार का? या प्रश्नावर भाष्य करणे टाळले. त्याऐवजी त्यांनी मला राजस्थानमधील शेतकरी आणि महिलांसाठी काम करायचे आहे, अशी प्रतिक्रिया दिली. दुसरीकडे जेजेपी पक्षाचे अध्यक्ष अजय सिंह चौटाला यांनी भाजपाचे राजस्थानमध्ये ज्या ठिकाणी प्राबल्य नाही, त्याच जागांवर लढण्याचा आमचा विचार आहे, असे यापूर्वी सांगितले आहे. जेजेपी पक्षाचे लक्ष प्रामुख्याने जाट समुदायाचे प्राबल्य असलेल्या सिकर जिल्ह्यासह अन्य अशाच प्रदेशावर असणार आहे.

जाट समाजाच्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

गेल्या काही दिवासांपासून हरियाणाचे उपमुख्यमंत्री आणि जेजेपी पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला हे सतत राजस्थानला भेट देत आहेत. राजस्थानमधील वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांत ते भाग घेत आहेत. हे सर्व कार्यक्रम प्रामुख्याने जाट समाजाला आकर्षित करण्यासाठी आयोजित केले जात आहेत.

याआधीही जेजेपी पक्षाने राजस्थानची निवडणूक लढवली

दरम्यान, द इंडियन नॅशनल लोकदल या पक्षातील काही नेत्यांनी आपली वेगळी चूल मांडत जेजेपी या नव्या पक्षाची स्थापना केली होती. जेजेपी पक्षाने याआधीही राजस्थानची निवडणूक लढवलेली आहे. येथे अजय सिंह चौटाला यांनी निवडणूक लढवून विजय प्राप्त केला होता. अजय सिंह यांचे आजोबा म्हणजेच माजी उपपंतप्रधान देवीलाल यांनीदेखील १९८९ साली सिकर जिल्ह्यातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता.