काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या मध्यप्रदेशमध्ये असून या यात्रेदरम्यान ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. भाजपाने ‘भारत जोडो’ यात्रेतील एक व्हिडिओ शेअर करत हे आरोप केले आहेत. दरम्यान, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौव्हान यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – कोश्यारींच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजपामधूनही तीव्र प्रतिक्रिया, राज्यपाल भाजपासाठी डोकेदुखी ठरत आहेत का?

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या आहेत. काँग्रेसला भारत जोडायचा आहे, की भारत तोडणाऱ्यांना जोडायचे आहे? काँग्रेसने यापूर्वीही भारत तोडण्याचा प्रयत्न केला आहे, पुन्हा भारत तोडायची त्यांची इच्छा आहे का? असा प्रश्न शिवराजसिंग चौहान यांनी उपस्थित केला आहे. तसेच ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – पंढरपूर कॉरिडॉर रद्द होण्यासाठी भाजपचे पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार ? पंढरपूर कर्नाटकला जोडण्याच्या मागणीमुळे मनसे संतप्त

मध्यप्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष वीडी शर्मा यांनीही या मुद्द्यावरून राहुल गांधींवर टीका केली आहे. काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेत ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या जाणं हे दुर्देवी असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा – गेहलोत-पायलट ही खरगेंची डोकेदुखी, वादावर तोडगा हे पहिले मोठे आव्हान

दरम्यान, काँग्रेसने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ”भारत जोडो यात्रेला मिळणारा नागरिकांचा प्रतिसाद बघता भाजपाचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे काँग्रेसला बदनाम करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. आम्ही यासंदर्भात कायदेशीर कारवाई करणार आहोत”, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दिली आहे. तसेच छतरपूरमधील नागरिकांना राहुल गांधींना भेटायचे असून मध्य प्रदेश सरकार त्यांना भेटू देत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp alligation to pakistan jindabad slogan raised in congress bharat jodo yatra congress replied spb