महेश सरलष्कर

राजस्थानमध्ये काँग्रेस व भाजप यांच्यामध्ये अटीतटीची लढाई होत असली तरी, दोन्ही पक्षांमधील पक्षांतर्गत धुसफुशीमुळे उमेदवारांच्या निवडीतच अधिक चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेसमध्ये अशोक गेहलोत व सचिन पायलट गटामध्ये छुपा संघर्ष थांबलेला नाही तर, भाजपमध्ये वसुंधरा राजेंचे पाठीराखे उघडपणे केंद्रीय नेतृत्वाविरोधात नाराजी व्यक्त करत आहेत. भाजपने राजस्थानच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असली तरी, काँग्रेसने अतिसावध पवित्रा घेतल्यामुळे पक्षाचा एकही उमेदवार घोषित झालेला नाही.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
parliament congress protest
‘इंडिया’चा दबाव झुगारून काँग्रेसचे आंदोलन
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक दोनवेळा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ती कदाचित गुरुवारी होण्याची शक्यता आहे. राजस्थानचे उमेदवार निश्चित करण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या तीन दिवसांपूर्वी १५ रकाबगंज येथील पक्षाच्या वॉर रुममध्ये बैठका झाल्या होत्या. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या जाहीरसभेसाठी राजस्थानला परतलेले मुख्यमंत्री अशोक गेहलोत मंगळवारी रात्री पुन्हा मंगळवारी रात्री दिल्लीकडे रवाना झाले. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी गुरुवारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा >>> संसदेत प्रश्न विचारण्यासाठी मोहुआ मोईत्रा लाच घेतात, भाजपाच्या निशिकांत दुबे यांचा गंभीर आरोप!

जयपूरमध्ये मॅरॅथॉन बैठकांनंतर राजस्थानचे भाजप नेते मंगळवारी दिल्लीत दाखल झाले. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी मंगळवारी दुपारी सुकाणू समितीची बैठक झाली. या बैठकीत वसुंधरा राजे सहभागी झाल्या होत्या. आत्तापर्यंत राजस्थानच्या निवडणुकीसंदर्भात केंद्रीय नेतृत्वासोबत झालेल्या प्रदेश भाजपच्या नेत्यांच्या बैठकांमध्ये वसुंधरा राजे सामील झाल्या आहेत. पण, त्या राजस्थानमधील प्रदेश भाजपच्या बैठकांना जाणीवपूर्वक गैरहजर राहतात अशी चर्चा होत आहे. वसुंधरा राजेंची नाराजी स्पष्ट झाली असल्यामुळे त्यांच्या पाठिराख्यांमुळे पक्षाचे किती नुकसान होऊ शकते याचा अंदाज घेतला जात आहे. त्यामुळे भाजपच्या राजस्थानमधील उमेदवारांच्या दुसऱ्या यादीला उशीर होत असल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा >>> मध्य प्रदेश : काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी असल्याचा भाजपाचा दावा!

पहिल्या यादीमध्ये वसुंधरा राजेंच्या समर्थक आमदारांना डावलण्यात आल्याने उघडपणे रोष व्यक्त केला जात आहे. विद्यमान आमदार व राजेंच्या कट्टर समर्थक अनितासिंह गुज्जर यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी अप्रत्यक्ष बंड केले असून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. विद्यमान खासदार राज्यवर्धन राठोड यांना उमेदवारीला राजे समर्थकांनी रस्त्यावर उतरून विरोध केला आहे. राठोड यांना या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. त्यांची समजूत काढण्यासाठी राठोड कारमधून उतरले. त्यांनी कार्यकर्त्यांना मिठाई खाऊ घालण्याचा प्रयत्न केला पण, एकानेही ती मिठाई खाल्ली नाही. दोनवेळा आमदार झालेले राजे समर्थक राजपालसिंह शेखावत यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. सरदारपुरा मतदारसंघातून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात केंद्रीयमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना उतरवले जाण्याची शक्यता असली तरी तिथे राजेंचे पाठिराखे कोणती भूमिका घेतात यावर हेही महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा >>> बंजारा समाजाला खुश करण्यावर सत्ताधाऱ्यांचा भर

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या काँग्रेस नेतृत्वाशी उमेदवारांच्या निश्चितीसाठी तीन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवेळी दिल्लीतील जोधपूर हाऊसभोवती हजारो इच्छुकांचा गराडा पडला होता. गेहलोत यांची कार अडवून काँग्रेसजनांची उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड सुरू होती. राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे बुधवारी दिल्लीत असून गेहलोत यांच्यासोबत केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले जाऊ शकते. पण, दिल्लीत येण्यापूर्वी जयपूरमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे गेहलोत हे सचिन पायलट यांना माफ करण्याच्या मनःस्थिती नसल्याचे स्पष्ट झाले.

काँग्रेसचे आमदार लाचखोर असल्याचा बिनबुडाचा आरोप भाजप आणि संघवाले करत आहेत. ते जर भ्रष्ट असते तर १० कोटी घेऊन त्यांनी बंडाला पाठिंबा दिला नसता का, असा सवाल गेहलोत यांनी केला. सचिन पायलट यांच्या २०२० मधील बंडाचा अप्रत्यक्ष उल्लेख करून गेहलोत यांनी पायलट यांना पुन्हा चपराक दिल्याचे मानले जाते. आमदारांना तर हॉटेलमध्ये बसल्या-बसल्या १० कोटींची ऑफर दिली जात होती, त्यावेळी त्यांना विचारणारेही कोणी नव्हते. सरकार कोसळले असते. त्यावेळी काहीही होऊ शकले असते. पण, या आमदारांनी पैसे घेतले नाहीत. सहा महिने हॉटेलात काढावे लागले तरी चालेल पण, सरकार टिकले पाहिजे या उद्देशाने ते नेटाने उभे राहिले, असा टोला गेहलोत यांनी हाणला. सचिन पायलट यांच्या बंडामध्ये सहभागी न झालेल्या आमदारांना प्राधान्याने उमेदवारी देण्याचा प्रयत्न गेहलोत करत असल्याचे सांगितले जाते.

Story img Loader