प्रबोध देशपांडे

अकोला : आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात भाजप व वंचित बहुजन आघाडी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतर आठ दिवसांच्या आतच उड्डाणपुलाचे लोकार्पण केल्याच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले. दोन्ही पक्षातील वाद इतका टोकाला गेला की भाजपने वंचितचे ‘शहाणपण’ तर, वंचितने भाजपची ‘लायकी’ काढली. नेत्यांमधील वाकयुद्ध चांगलेच भडकले. भाजपकडून विकास कामांच्या माध्यमातून निवडणुकीसाठी पोषक वातावरण निर्मिती केली जात असतांना वंचितने त्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
bjp leader shivray Kulkarni
भाजपचे नाव घेणाऱ्यांनी गल्लीबोळात भाजपविरोधात बैठकी…भाजप प्रवक्त्यांच्या आरोपामुळे…
Mallikarjun Kharge criticize BJP in nagpur
“बाटना और काटना हे भाजपचे काम” मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
Most rebellion in Konkan in bjp
कोकणात सर्वाधिक बंडखोरी भाजपमध्ये
dcm devendra fadnavis praise obc community
भाजपच ओबीसींच्या पाठीशी!, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
Kamathi Vidhan Sabha Constituency President Chandrasekhar Bawankule Nominated
लक्षवेधी लढत: कामठी : भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत

लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल-मे महिन्यात होणार आहे. त्यानंतर राज्यात ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महापालिका, नगर पालिकांच्या रखडलेल्या निवडणुका देखील लागू शकतात. या निवडणुकांच्या वर्षासाठी प्रमुख पक्षांनी जोरदार तयारी केली. नेत्यांसह इच्छूकांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. पक्षांचाही संघटनात्मक बांधणीवर भर आहे. निवडणुकांच्या अगोदरच अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचणे, हे नेत्यांचे लक्ष्य असते. निवडणुकीसाठी जुळवाजुळव व तळागाळातून मोर्चेबांधणी केली जात आहे. २००४ पासून सलग चार लोकसभा निवडणुका जिंकून खासदार संजय धोत्रे यांनी अकोला मतदारसंघ भाजपचा अभेद्य गड निर्माण केला.

आणखी वाचा-सोलापूरमधील आमदार शिंदे बंधू शरद पवारांच्या रडारवर

भाजप, काँग्रेस व वंचित आघाडीत झालेल्या तिरंगी लढतीमध्ये भाजपला थेट लाभ झाल्याचा अकोल्याचा इतिहास आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर व काँग्रेस एकत्र आल्याशिवाय भाजपचा पराभव होऊ शकत नसल्याचे लोकसभेच्या गेल्या नऊ निवडणुकांच्या निकालावरून समोर येते. लोकसभा निवडणूक लढण्याच्या व उमेदवारीच्या घोषणेमध्ये वंचितने आघाडी घेतली. परंपरागत अकोला लोकसभा मतदारसंघातून ॲड. प्रकाश आंबेडकर स्वत: निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. वंचितसोबत आघाडी की स्वबळ यामध्ये काँग्रेस अडकली असली तरी भाजप व वंचित आघाडी पुन्हा एकदा आमने-सामने येणार असल्याचे निश्चित झाले. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून तयारी केली जात आहे.

आपला प्रमुख विरोधक म्हणून भाजपला वेळोवेळी अडचणीत आणण्याचा प्रयत्न वंचितकडून सातत्याने सुरू आहे. अकोल्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते व ज्यांनी तीन दशके सलग भाजपचा झेंडा फडकवत ठेवला असे आमदार गोवर्धन शर्मा यांचे ३ नोव्हेंबरला दुर्धर आजाराने निधन झाले. त्यामुळे भाजपचे राजकीयदृष्ट्या मोठे नुकसान झाले. या धक्क्यातून सावरत भाजपने शहरातील डाबकी रोड मार्गावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण केले. विकास कामांच्या माध्यमातून जनसमर्थन वाढविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. गोवर्धन शर्मा यांच्या दु:खद निधनाच्या अवघ्या आठ दिवसांच्या आत उड्डाणपुलाचे लोकार्पण केल्याच्या मुद्द्यावरून वंचितने प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी ‘भाजपने असंवेदनशीलतेचा गळस गाठला’ अशी टीका केली. त्याला भाजपचे लोकसभा प्रमुख अनुप धोत्रे, गोवर्धन शर्मा यांचे पूत्र अनुप शर्मा, प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी प्रत्युत्तर दिले. भाजपचे जनसुविधा निर्माण करण्याला महत्त्व असून गलिच्छ राजकारण न करण्याचा त्यांनी सल्ला दिला. याशिवाय जिल्हा परिषदेतील सत्ताधारी वंचितच्या कामगिरीवर निशाना साधून भाजपला शिकवण्याची गरज नसल्याचे टीकास्त्र सोडले. त्यावर वंचितचे डॉ. पुंडकर यांनी पलटवार करून २० वर्षांतील विकास कार्याचा उल्लेख करीत भाजपची लायकीच काढली. लोकसभा निवडणुकीला १५० दिवसांपेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे गुलाबी थंडीच्या दिवसांमध्ये एकमेकांची उणीदुणी काढून आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण तापण्यास सुरुवात झाल्याचे चित्र आहे.

आणखी वाचा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजस्थानातील ‘शिलेदार’ अजूनही चर्चेत

निवडणुकांच्या तोंडावर राजकीय रंगत

लोकसभा निवडणुकीची चाहूल लागण्यात सुरुवात झाली. अकोल्यात वंचितने उमेदवारी जाहीर केली, तर आपला गड अभेद्य ठेवण्यासाठी भाजप कंबर कसून कामाला लागली आहे. दरवेळस प्रमाणे काँग्रेसचे तळ्यात-मळ्यात आहे. एकमेकांचे प्रमुख विरोधक म्हणून भाजव व वंचित आघाडीत जुंपली. निवडणुकांच्या तोंडावर अकोला जिल्ह्यातील राजकारण चांगलेच रंगत आहे.