रामनवमीच्या दिवशी बिहारमध्ये काही ठिकाणी हिंसक प्रतिक्रिया उमटल्या. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सासाराम येथील दौरा रद्द करावा लागला होता. या हिंसाचाराच्या प्रकारावरून भाजपाने सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. जनता दल (यु) आणि राष्ट्रीय जनता दलाने एकमेकांशी हातमिळवणी केल्यानंतर राज्यात दंगलीचे प्रकार वाढले आहेत, अशी टीका भाजपाकडून करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी २ एप्रिल रोजी नवादा येथील जाहीर सभेत सरकारवर आरोप करीत जनतेला आवाहन केले की, “भाजपा २०२४ रोजी पुन्हा सत्तेत आल्यानंतर आम्ही दंगलीचे प्रकार गाडून टाकू.” तसेच केंद्रीय गृहखात्याने बिहारचे राज्यपाल आर. व्ही. आर्लेकर यांना पत्र लिहून सासाराम आणि बिहारशरीफ येथील दंगलीबाबत कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्याची विनंती केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राष्ट्रीय जनता दलाचा सरकारमध्ये समावेश असल्यामुळेच दंगली घडत असल्याचा आरोपही भाजपाने केला आहे. ज्यामुळे सरकारवर ‘जंगलराज’ अशी टीका केली जात आहे. कमकुवत कायदा व सुव्यवस्थेसाठी ‘जंगलराज’ असे नाव ठेवले जाते. लालू प्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असल्यापासून राष्ट्रीय जनता दलावर ‘जंगलराज’ची टीका होत आहे. अमित शहा यांनीच मैदानात उतरून सरकारविरोधात शड्डू ठोकल्यामुळे आता बिहारमधील भाजपाचे नेतेदेखील ‘महागठबंधन’ सरकारवर तुटून पडत आहेत. राज्यसभेचे खासदार आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी म्हणाले की, “कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात नितीश कुमार १७ वर्षांत पहिल्यांदाच अपयशी ठरले आहेत. बिहारशरीफ आणि सासाराम येथे हिंसाचाराच्या ठिकाणी अर्धसैनिक दल तैनात करण्यात सरकारला उशीर झाला.”

भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि प्रवक्ते निखिल आनंद यांनी बिहार सरकारवर टीका केली. ते म्हणाले, “मुख्यमंत्री नितीश कुमार हे १४ व्या शतकातील मोहम्मद बिन तुघलक यांच्यासारखा कारभार करताना दिसत आहेत. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा ‘जंगलराज’ आल्याचे दिसत आहे. ज्या प्रकारे तुघलकच्या कारभारात समन्वयाचा अभाव होता. त्याप्रमाणेच नितीश कुमार यांच्या सरकारमधील जिल्हा प्रशासन आणि राज्याच्या सचिवालयामध्ये काहीच ताळमेळ नाही. रोहतास आणि नालंदा या ठिकाणी निर्बंध लावल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते. पण नंतर अचानक निर्बंध मागे घेतले. प्रशासनाच्या या गोंधळामुळे दंगलीची परिस्थिती निर्माण झाली.”

नितीश कुमार यांनी अमित शहा यांच्या टीकेला थेट उत्तर न देता म्हटले, “ज्या लोकांनी परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न केला, त्यांचा शोध पोलिसांनी घेतलेला आहे. ज्या लोकांनी गोंधळ घातला त्यांना सोडले जाणार नाही.” नालंदा पोलिसांनी आतापर्यंत १३० लोकांना हिंसाचारप्रकरणी अटक केली आहे. तसेच रोहतास येथे ४३ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

जनता दला (युनायटेड)चे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह यांनी भाजपाच्या विशेषतः शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. सोमवारी ट्विट करत ते म्हणाले की, त्यांचे (शाह) नवादा येथील भाषण ऐकून ‘बडका झुठा पार्टी’ (BJP) नैराश्यात गेलेली दिसते. तुम्ही बिहारच्या राज्यपालांशी दिवसातून दहा वेळा बोला, आम्हाला काहीही फरक पडत नाही. पश्चिम बंगाल, केरळ आणि महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे की, तुम्ही राजभवनाचा कसा गैरवापर करत आहात. तुमची इच्छा असेल तर तुम्ही राजभवनात २०२४ च्या निवडणुकीसाठी पक्षाचे एखादे कार्यालय सुरू करू शकता. पण काहीही झाले तरी निकाल २०१५ च्या विधानसभा निवडणुकांसारखाच लागणार. तसेच २०२४ रोजी देश भाजपामुक्त होणार, असा दावा राजीव रंजन सिंह यांनी केला.

‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते सुबोध कुमार म्हणाले की, ‘जंगलराज’ हा शब्द सारखा सारखा उगाळून आता जुना झाला. अमित शाह यांनीच आम्हाला उत्तर द्यावे की, रामनवमीच्या दोन हजार मिरवणुकांपैकी फक्त दोनच मिरवणुकीत गडबड कशी झाली? सासाराम आणि बिहारशरीफ ही दोन ठिकाणे अमित शहा यांच्या जाहीर सभेच्या ठिकाणांपासून जवळ होती? हा योगायोग होता का? जगातल्या सर्वात मोठ्या राजकीय पक्षाला निवडणूक जिंकण्यासाठी धार्मिक दंगलीची गरज भासते का? अशा शब्दात सुबोध कुमार यांनी भाजपावर टीका केली.