BJP Candidate Ravinder Raina from Naushera: निवडणूक म्हटलं की पैसा आणि पैसा म्हटलं की कोट्यवधींचे आकडे असंच समीकरण गेल्या काही वर्षांमध्ये पाहायला मिळत आहे. पण अशातही काही अत्यंत कमी मालमत्ता किंवा संपत्ती असणारेही उमेदवार वा राजकारणी असल्याचं दिसून आलं आहे. ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचं नाव अशा साधेपणामुळे चर्चेत आहे. पण त्याचबरोबर आता जम्मू-काश्मीरमधील सर्वात कमी संपत्ती असणाऱ्या उमेदवारांची चर्चा पाहायला मिळत आहे. त्यातही भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि दुसऱ्यांदा आमदारकीसाठी उभे राहिलेले रवींदर रैना यांचं नाव गेल्या काही दिवसांत भलतंच चर्चेत आलं आहे.

रवींदर रैना यांनी जम्मू-काश्मीरमधील गेल्या विधानसभा निवडणुका अर्थात २०१४ मध्ये नौशेरामधून विजय मिळवला होता. त्यावेळी विधानसभेत ‘माता वैष्णो देवी’च्या नावाने त्यांनी आमदारकीची शपथ घेतली होती. त्यानंतर पीडीपीचे आमदार इंजिनिअर अब्दुल राशिद यांनी २०१५ मध्ये आमदार निवासात बीफ पार्टी केल्याचा आरोप करत त्यांच्यावर भर विधानसभेत हात उचलल्याच्या आरोपांमुळेही रवींदर रैना चर्चेत आले होते. पण यावेळी मात्र ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत.

person took 1 85 crores and absconded with his family after luring investors with interest
नागपुरात आणखी एक महाघोटाळा! अडीच हजार लोकांचे कोट्यवधी…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ
emboldened rioters attacked police officer in nashik
पतीचा पत्नी, मेहुणी, सासऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
Excessive expenditure on ST Bank employees But members of bank still did not get dividend
एसटी बँकेच्या कर्मचाऱ्यांवर लाखोंची खैरात, सभासदांना ठेंगा; कर्मचारी संघटना म्हणते…

फक्त १ हजार रुपयांची संपत्ती!

भाजपाचे तिसऱ्यांदा जम्मू-काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष झालेले ४७ वर्षीय रवींदर रैना यांनी निवडणूक अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अवघी १ हजार रुपये संपत्ती दाखवली आहे. बरं रोख रक्कम एवढी असताना मालमत्ता भरपूर असेल, असा अंदाज साधारणपणे लावला जातो. पण रैना यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात कोणत्याही स्थावर वा जंगम मालमत्तेचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत सर्वात गरीब उमेदवारांपैकी ते एक ठरले आहे.

संपत्तीत वाढ नव्हे, घट झालेला लोकप्रतिनिधी!

सामान्यपणे लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर किंवा त्यांच्याकडे एखादं पद आल्यानंतर त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतं. पण रवींदर रैना यांच्याबाबतीत स्थिती याच्याउलट आहे! २०१४ मध्ये रवींदर रैना यांनी २० हजार रुपये रोख आणि १ हजार रुपयांची बँकेत बचत अशी एकूण २१ हजार रुपयांची संपत्ती दाखवली होती. तेव्हाही त्यांच्याकडे कोणतीही मालमत्ता नव्हती. आता २०२४ च्या निवडणुकीसाठीच्या अर्जात २१ हजारांची ही ‘संपत्ती’ १ हजारापर्यंत घटली आहे!

सहा उमेदवारांकडे शून्य मालमत्ता!

जम्मू-काश्मीरमधील यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये एकूण उमेदवारांपैकी सहा उमेदवार असे आहेत की ज्यांच्याकडे शून्य मालमत्ता आहे. त्यात बिशनाहचे उमेदवार विशाल कुमार, जम्मू पूर्वचे उमेदवार आसिफ डी. एम., जम्मू पश्चिमचे उमेदवार राज कुमार ललोत्रा, हंदवाडाचे उमेदवार शाहीद हुसैन मीर आणि याच मतदारसंघातले दुसरे उमेदवार झाहिद मुश्ताक शेख यांनी प्रतिज्ञापत्रात शून्य मालमत्ता नमूद केली आहे. हे सर्व अपक्ष उमेदवार आहेत. त्याशिवाय, पीडीपीचे कथुआमधील उमेदवार सुदेश कुमार यांनीही शून्य मालमत्ता नमूद केली आहे. याशिवाय, मोहम्मद अक्रम या अपक्ष उमेदवारानेही ५०० रुपये रोख रक्कम एवढी संपत्ती जाहीर केली आहे.

या सगळ्यांमध्ये रवींदर रैना वेगळे ठरतात. रैना हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक आहेत. त्यांच्या बँकेत कोणतीही ठेव जमा नाही. कोणतीही मालमत्ता त्यांनी खरेदी केलेली नाही वा वारसाहक्काने त्यांना मिळालेली नाही. त्याशिवाय सोनं, गुंतवणूक, शेतजमीन किंवा इतर कोणती जमीन, घर, गाडी असं काहीही त्यांच्या मालकीचं नाही. शिवाय, त्यांच्यावर कोणतंही कर्ज नसलयाचं त्यांनी म्हटलं आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांच्या प्राप्तिकर परताव्यामध्ये शून्य वार्षिक उत्पन्न नमूद आहे!

एकमेव उत्पन्न म्हणजे आमदारकीची पेन्शन!

दरम्यान, रैना यांना मिळणारी एकमेव मिळकत म्हणजे त्यांची माजी आमदार म्हणून मिळणारी पेन्शन. जम्मू काश्मीरमध्ये विद्यमान आमदारांना १ लाख रुपये वेतन तर माजी आमदारांना ५० हजार रुपये पेन्शन मिळते. पण ते त्यांची सगळी पेन्शन श्री माता वैष्णो देवी ट्रस्टला दान करतात, अशी माहिती त्यांचे बंधू राकेश रैना यांनी दिली. २०१८ पासून ते त्यांची पूर्ण पेन्शन दान करतात. त्यांचा जेवणाच, घराचा आणि प्रवासाचा खर्च पक्षाकडून केला जातो. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती होण्याआधी ते त्यांच्या गरजा भागल्यानंतर उरलेलं सगळं आमदारकीचं वेतन ट्रस्टला दान करत असत, असंही राकेश रैना यांनी सांगितलं.

रवींदर रैना सध्या माजी आमदार म्हणून त्यांना देण्यात आलेल्या घरात राहतात. त्यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून हेच धोरण अंगीकारल्याचं त्यांचे आप्तस्वकीय सांगतात. २००० साली ते मर्चंट नेव्हीमध्ये रुजू झाले. पण तीन महिन्यांच्या आत त्यांनी नोकरी सोडली व ते संघाचे पूर्णवेळ सदस्य झाले. राजौरी जिल्ह्यात त्यांनी जवळपास १० वर्षं संघाचे प्रचारक म्हणून काम केलं. २०१४ साली ते नौशेरामधून आमदार म्हणून निवडून आले.

बिहारमध्ये ११४ वर्षांनंतर भूमी सर्वेक्षण; नितीश कुमार सरकारच्या निर्णयावर विरोधकांची टीका कशासाठी?

रवींदर रैना यांचे वडील पुशप दत्त रैना हे निवृत्त शाळा मुख्याध्यापक आहेत. ते त्यांच्या पत्नीसह अर्थात रैना यांच्या आईसह त्यांचे छोटे बंधू सुनील रैना यांच्यासह राहतात.

फाटक्या खिशाचा कुर्ता चर्चेत!

दरम्यान, रवींदर रैना यांचा प्रचारासाठी होणारा प्रवास व लोकांशी संवाददेखील त्यांच्या राहणीमानाइतकाच साधेपणा जपून होत असतो. नौशेरामध्ये एकदा प्रचारादरम्यान त्यांनी उपस्थित लोकांना कुर्त्याच्या खिशात हात घालून खिसा बाहेर काढून दाखवला होता. कारण त्यांचा खिसा फाटलेला होता.

भाजपाच्या इतर उमेदवारांची कोट्यवधींची उड्डाणे!

दरम्यान, रवींदर रैना यांची संपत्ती जरी १००० रुपये इतकी असली, तरी भाजपाच्या इतर उमेदवारांकडून मात्र कोट्यवधींची संपत्ती जाहीर करण्यात आली आहे. भाजपाच्या ६२ उमेदवारांकडे सरासरी प्रत्येकी ९ कोटी १३ लाख इतकी संपत्ती आहे. जम्मू-काश्मीर निवडणुकीतील एकूण ८७३ उमेदवारांची सरासरी प्रत्येकी संपत्ती ३ कोटी ६५ लाख इतकी आहे.