जालना : जिल्ह्यातील भोकरदन, बदनापूर आणि परतूर या विधानसभेच्या जागांवर सध्या भाजपचे आमदार आहेत. महायुती मध्ये जिल्ह्यातील पाचपैकी या तीन जागांच्या व्यक्तीरिक्त उर्वरित घनसांगवी आणि जालना या दोन जागांवरही भाजपचे पदाधिकारी तसेच कार्यकर्तेही दावा सांगत आहेत. ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनीही या दोन्ही जागा, महायुतीत भाजपसाठी सोडवून घेण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा >>> अकोल्यात निवडणुकीच्या तोंडावर जातीय तणावाचे समीकरण

Onion and grain trade stopped due to market committee strike nashik
कांद्यासह धान्याचे व्यवहार ठप्प; बाजार समिती संपामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
readers comments on Loksatta editorial
लोकमानस : सरकारला सर्वच आंदोलनांची भीती वाटते
Sharad PAwar
“दिवट्या आमदार…”, पुण्यातील आमदारावर शरद पवारांची टीका; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या नावाने…”
raj thackeray western vidarbh marathi news
राज ठाकरे यांची पश्चिम विदर्भात चाचपणी; उमेदवारांच्या नावांची प्रतीक्षा
Sudhir Mungantiwar, tigers, forest,
मुनगंटीवार म्हणतात, जंगलातील वाघांना स्थलांतरित करा..
Amit Shah in nashik on Wednesday
नाशिक विभागात मित्रपक्षांच्या जागांवर भाजपची नजर, अमित शाह यांच्या उपस्थितीत बुधवारी आढावा
Sanjay Shirsat On Mahayuti Election Seats
Sanjay Shirsat : “भाजपा मोठा पक्ष, त्यांना तडजोड…”, विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

रावसाहेब दानवे म्हणाले, गेल्या काही वर्षांत घनसावंगी आणि जालना तालुक्यात पक्षाची शक्ती वाढलेली असून त्यामुळे या जागांसाठी आग्रह करीत आहेत. एखाद्या निवडणुकीत पराभव झाल्यावर उमेदवार अलिप्त होतो आणि चार-सहा महिने जनतेला तोंड दाखवत नाही. आपण पराभवाने खचून न जाता पुन्हा कामाला लागलो. संपूर्ण लोकसभा मतदार संघात दौरा केला.

हेही वाचा >>> भोसरीत आमदार महेश लांडगेंची उमेदवारी निश्चित

भोकरदनचे आमदार संतोष दानवे या वेळी म्हणाले की, रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक विकासकामे झाली. पूर्वी घनसावंगी विधानसभा मतदारसंघात पक्षाची फारशी ताकद नव्हती. परंतु मागील तीन-चार वर्षातील विकासकामांमुळे तेथील कार्यकर्त्यांत आता विजयाची आशा निर्माण झालेली आहे. त्यामुळेच घनसावंगी आणि जालना हे दोन्हीही मतदारसंघ भाजपसाठी सोडण्यात यावेत अशी कार्यकर्त्यांची मागणी असून पक्षश्रेष्ठी नक्कीच याचा विचार करतील. पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि भास्कर दानवे यांनी मागील दहा वर्षांत जालना शहरात झालेल्या अनेक विकासकामांचा तपशील देऊन त्यामुळे जालना शहराचा चेहरा-मोहरा बदलल्याचे सांगितले. या विकासकामांमुळे जालना शहरात भाजपची शक्ती वाढली असल्याने हा मतदार संघ महायुतीत आपल्या पक्षासाठी सोडवून घेण्यासाठी रावसाहेब दानवे काहीतरी सुकर मार्ग काढतील. जालना शहरात भाजपचा आमदार असावा ही कार्यकर्त्यांची भावना आहे.