लातूर : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ हा भाजपने आपल्याकडे घ्यावा, यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह सुरू असून, माजी राज्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश घेतल्यामुळे ते या जागेवर प्रमुख दावेदार मानले जातात.

बसवराज पाटील मुरूमकर हे कसलेले राजकारणी आहेत. उमरगा विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केले तेव्हा ते राज्यमंत्री होते. त्यानंतर उमरगा विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यामुळे लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघात त्यांनी पाऊल टाकले व सलग दोन वेळा ते विजयी झाले. २०१९ साली त्यांचा विधानसभा मतदारसंघात पराभव झाला. त्यानंतर पक्षांतर्गत कुरघोडीमुळेच आपला पराभव झाला हे त्यांना लक्षात आल्यामुळे ते पक्षांतर्गत राजकारणाला विटले होते.

कसब्यात एक ॲक्सिडेंटल आमदार तयार झाला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार रविंद्र धंगेकर यांना टोला
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
Assembly Elections 2024 Akkalkuwa-Akrani Assembly Constituency Congress
लक्षवेधी लढत: अक्कलकुवा: लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढणार का?
maharashtra assembly election 2024 rohit pawar s reply to mahesh landge in bhosari assembly constituency
पिंपरी : धमक्या देऊ नका, आम्ही राजकारणात गोट्या खेळण्यास आलो नाहीत; रोहित पवार यांचे महेश लांडगे यांना प्रत्युत्तर
Sharad Pawar, Sudhir Kothari Hinganghat,
वर्धा : अखेर शरद पवार थेट ‘हिंगणघाटच्या शरद पवारां’च्या घरी, म्हणाले…
Ajit Pawar lashed out at the group over the issue of disclaimer regarding the clock symbol print politics news
घड्याळाबाबत अस्वीकरणाच्या मुद्द्यावरून अजित पवार गटाला फटकारले

हेही वाचा – मनसेचे परप्रांतीयांविरोधातील ‘खळ्ळ्य खट्ट्याक’ बंद ? महायुतीसाठी भाजपची अट

काँग्रेसमधील अंतर्गत कुरघोडी परवडणारी नाही हे लक्षात घेऊन गेल्या काही महिन्यांपासून ते भाजपमध्ये प्रवेश घेण्याच्या विचारात होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेण्याचे धाडस दाखवले. शिवराज पाटील चाकूरकर यांचे ते मानसपुत्र मानले जातात. उमरगा, औसा, बार्शी, तुळजापूर, भूम, परंडा आणि धाराशिव अशा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाजाचे प्राबल्य आहे. त्यांना उमेदवारी मिळाली तर लिंगायत समाजाची मते मिळू शकतात. ओम राजेनिंबाळकर यांना टक्कर देणारा उमेदवार म्हणून बसवराज पाटील मुरूमकर यांच्याकडे पाहिले जाते. मुरूमकर यांना उमेदवारी मिळाली तर धाराशिव जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपात प्रवेश घेतील. लातूर, धाराशिव याबरोबर कर्नाटकमधील बिदर व गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातही याचा भाजपला चांगला लाभ होणार आहे.

हेही वाचा – जरांगे यांच्या रविवारी होणाऱ्या बैठकीबाबत उत्सुकता, ‘मराठा मतपेढी’ दिशा देणार

शिवराज पाटील चाकूरकर यांचे आणखी काही निकटवर्तीय भाजपात मुरूमकर यांच्यासमवेत प्रवेश घेण्याची शक्यता आहे. तुळजापूरचे अनेक कार्यकर्तेही भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. बसवराज पाटील मुरूमकर यांची धाराशिव जिल्ह्यातील राजकारणावर गेल्या २५ वर्षांपासून चांगली पकड आहे. अतिशय व्यापक जनसंपर्क, सर्व स्तरात काम, दलित, मुस्लीम मतदानही खेचून घेण्याची ताकद या सर्व जमेच्या बाजूंमुळेच मुरूमकर हे धाराशिव लोकसभा मतदारसंघातून प्रमुख दावेदार आहेत.

हेही वाचा – मिरजेतील उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार

आपण भाजप श्रेष्ठींना धाराशिवमधून लोकसभा उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे कळवले आहे. महायुतीत जागा मिळाली व पक्षाने संधी दिली तर आपण ताकदीने निवडणूक लढवणार असल्याचे मुरूमकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.