कविता नागापुरे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भंडारा : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडारा-पवनी मतदारसंघाच्या निवडणूक प्रचार प्रमुखपदी अनुप ढोके या युवा कार्यकर्त्याची नियुक्ती जाहीर केली आहे. या नियुक्तीच्या माध्यमातून भाजपने शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या मतदारसंघात मतपेरणीच्या दिशेने प्रयत्न सुरू केल्याचे दिसते आहे. भाजपकडे मुरब्बी, मातब्बर, जाणकार आणि अनुभवी नेते व कार्यकर्ते असतानाही केवळ जातीय समीकरण साधण्यासोबतच बहुजनांची मते मिळवण्यासाठी आणि शिंदे गटासोबत युती न झाल्यास सक्षम उमेदवार हवा म्हणूनच एका नव्या चेहऱ्याला लोकाभिमुख करण्याची व एवढ्या मोठ्या जबाबदारीचे पद सोपवण्याची खेळी भाजपने खेळली आहे.
भंडारा जिल्ह्यातील तीन मतदारसंघापैकी भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्रात जातीय समीकरणे नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावतात. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात ४८ टक्के मतदार ओबीसी समाजाचे आहेत. या मतदारसंघाचा इतिहास पाहता, आतापर्यंत अनुसूचित जातीतील दलित उमेदवाराला नाकारले जाते, भाजप, राष्ट्रवादीने या मतदारसंघात यापूर्वी केलेला प्रयोग फसला होता. ओबीसी मतदार हिंदू दलित उमेदवाराला मतदान करतात, असे अनुभवास येते.
हेही वाचा… हातकणंगले मतदारसंघात जयंत पाटील यांचे पुत्र रिंगणात ?
हा इतिहास पाहता भाजपने आता सावध होत नवी व्यूहरचना आखली आहे. हिंदू दलित, उच्चशिक्षित, संघाचा कट्टर स्वयंसेवक, आजवर कोणतेही आरोप न झालेला एक युवा कार्यकर्ता म्हणून भाजपने अनुप ढोके यांना पुढे केले आहे. शिंदे गटासोबत युती न झाल्यास भोंडेकर यांच्यासमोर सक्षम उमेदवार देता यावा म्हणून भाजप ढोके यांनाच प्राधान्य देईल, अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे. मतदारसंघातील भाजपच्या बैठका, सभा, प्रचारसभा, लोकाभिमुख कार्यक्रम यातून ढोकेंबाबत वातावरण निर्मिती केली जाईल. एकदा का हा चेहरा लोकांच्या नजरेत भरला की त्याला विधानसभेचे तिकीट दिले जाईल, यात तिळमात्र शंका नाही.
हेही वाचा… रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघांतही भाजप आण शिंदे गटात स्पर्धा
आगामी विधानसभा निवडणुकीत ही जागा पुन्हा मिळावी म्हणून आ. भोंडेकर कसोशीने प्रयत्न करीत आहेत. भोंडेकर हे हिंदू दलित आहेत. त्यांना शह देऊन या मतदारसंघात आपले प्राबल्य निर्माण करण्यासाठी भाजप व्यूहरचना आखत आहे. शिंदे गटाला शह देण्याचा भाजपचा प्रयत्न असला तरी विद्यमान जागा सोडण्यास शिंदे तयार होणार नाहीत हे सुद्धा तेवढेच स्पष्ट आहे.