राजस्थानसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. निवडणुकीची घोषणा होताच सर्व पक्ष कामाला लागले आहेत. राजस्थानमध्ये येत्या २३ नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. येथे सध्या काँग्रेसचे सरकार असून, मुख्यमंत्रिपदी अशोक गहलोत आहेत. दरम्यान, ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही पक्ष पूर्ण ताकदीने आखाड्यात उतरले असून, या लढाईत शेजारच्या हरियाणा राज्याचीही मदत घेतली जात आहे. हरियाणातील काँग्रेस आणि भाजपाचे नेते सध्या राजस्थानमध्ये आपापल्या पक्षाचा प्रचार करीत आहेत.

राजस्थानचे नऊ जिल्हे हरियाणाला लागून

राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणूक तोंडावर आल्यामुळे काँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही पक्ष प्रचारासाठी हरियाणातील नेत्यांची मदत घेत आहेत. आगामी काळात हरियाणातील बडे नेते राजस्थानमध्ये निवडणुकीच्या मैदानात प्रचारासाठी उतरणार आहेत; तर काही नेते याआधीच राजस्थानचा सातत्याने दौरा करीत आहेत. राजस्थानमधील नऊ जिल्हे हरियाणाला लागून आहेत. हनुमानगड, झुंझूनू, छुरू, सिकार, जयपूर, अलवर, भारतपूर अशी या सात जिल्ह्यांची नावे आहेत. या जिल्ह्यांत विधानसभेचे एकूण ६२ मतदारसंघ आहेत. २०१८ सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने यापैकी २८; तर भाजपाने २१ जागांवर विजय मिळवला होता.

Katol, Saoner, salil Deshmukh, Ashish deshmukh,
विरोधकांचे दोन मतदारसंघ भाजपच्या निशाण्यावर; काटोल, सावनेरची लढत प्रतिष्ठेची
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
minister chandrakant patil express claim about bjps vote share increasing in loksatta loksamvad
मतदान वाढेल; फायदा भाजपला ; चंद्रकांत पाटील यांचा दावा
belapur assembly constituency sandeep naik vs manda mhatre maharashtra vidhan sabha election
लक्षवेधी लढत: भाजपच्या आमदार पुत्राचेच पक्षाला आव्हान
marathi muslim seva sangh on vote jihad
‘व्होट जिहाद’ हा भाजपाचा दुष्प्रचार, मराठी मुस्लिम सेवा संघाचा आरोप
Arguments over performance of MLA Prashant Thakur during this period
ठाकूरांच्या कामगिरीवरून वाद;पनवेल विधानसभा मतदारसंघात विकासाचे मुद्दे ऐरणीवर
maharashtra assembly election 2024 , manoj jarange,
आरक्षणाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या घनसावंगीमध्ये मनोज जरांगे कोणाच्या बाजूने ?

काँग्रेसचे हरियाणातील अनेक नेते राजस्थानमध्ये दाखल

सूत्रांच्या माहितीनुसार- अशोक गहलोत यांनी हरियाणातील काँग्रेसचे नेते भूपिंदरसिंह हुड्डा यांच्याशी संपर्क साधून त्यांना राजस्थानमध्ये प्रचार करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आगामी काळात हुड्डा राजस्थानमध्ये येऊन गहलोत यांच्यासाठी सभा घेण्याची शक्यता आहे. हरियाणाच्या माजी मंत्री किरण चौधरी याआधीच राजस्थानमध्ये काँग्रेसचा प्रचार करीत आहेत. काँग्रेसने त्यांची राजस्थानच्या निवडणुकीसाठी समन्वयक म्हणून निवड केलेली आहे. किरण चौधरी यांनी राजस्थानमधील साधारण ६० जागांसाठी संभाव्य उमेदवारांशी चर्चा केली आहे. याच चर्चेच्या आधारावर त्यांनी एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल पुढे काँग्रेसच्या हाय कमांडकडे पाठवला जाणार आहे. याच अहवालाच्या आधारावर राजस्थानमध्ये उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे, असे म्हटले जात आहे.

“राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता”

हरियाणातील नेत्यांना राजस्थानमध्ये प्रचारासाठी उतरवण्याबाबत हरियाणातील काँग्रेसचे नेते विनीत पुनिया यांनी प्रतिक्रिया दिली. एखाद्या राज्यात जेव्हा निवडणूक असते, तेव्हा अन्य राज्यांतील नेते त्या राज्यात प्रचारासाठी जातात. ही नियमित चालणारी प्रक्रिया आहे. सध्या हरियाणात काँग्रेसची लाट आहे. राजस्थानमध्येही काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेत येईल. या निकालाचा प्रभाव संपूर्ण देशावर पडेल, असे पुनिया म्हणाले.

हरियाणाचे मुख्यमंत्री प्रचार करणार राजस्थानमध्ये

काँग्रेसप्रमाणेच भाजपानेही हरियाणातील १५ मोठे नेते राजस्थानमध्ये प्रचारासाठी पाठवले आहेत. याव्यतिरिक्त ५० नेते राजस्थानमध्ये प्रचार करतील. हरियाणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश धनकर दोन दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर होते. आपल्या या दौऱ्यात त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. साधारण अर्धा डझन मतदारसंघांत त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. आता निवडणुकीची घोषणा झाली आहे, त्यामुळे मतदान होईपर्यंत ते राजस्थानमध्ये आणखी काही वेळ घालवण्याची शक्यता आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हेदेखील राजस्थानमध्ये सभांना संबोधित करण्याची शक्यता आहे.

“हरियाणा-राजस्थान राज्यांत होतो रोटी-बेटीचा व्यवहार”

भाजपाने हरियाणातील भाजपाचे नेते कुलदीप बिश्नोई यांची राजस्थानचे निवडणूक सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. भाजपाच्या या रणनीतीबद्दल हरियाणातील भाजपाचे प्रवक्ते संजय शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली. “भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. पक्षाचे कार्यकर्ते एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पाठवले जातात. राजस्थानमधील सहापेक्षा अधिक जिल्ह्यांची सीमा हरियाणा राज्याला लागून आहे. हरियाणा व राजस्थान या राज्यांत रोटी आणि बेटीचा व्यवहार होतो,” अशी प्रतिक्रिया कुलदीप यांनी दिली.

जननायक जनता पार्टी ३० जागा लढवणार

राजस्थानमध्ये जाट व बिश्नोई समाज मोठ्या प्रमाणात आहे. या समाजाची मते मिळतील ही अपेक्षा ठेवून हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीने राजस्थानची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा पक्ष साधारण ३० जागा लढवणार आहे. हरियाणा राज्यात जननायक जनता पार्टी आणि भाजपा यांच्यात युती आहे. मात्र, राजस्थानची निवडणूक हे दोन्ही पक्ष एकत्र लढवणार का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम

दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने ९ ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड, मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. छत्तीसगड वगळता या सर्वच राज्यांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे. मिझोरममध्ये १३ ऑक्टोबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सर्व पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होईल. मिझोरम विधानसभा निवडणुकीसाठी ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे; तर छत्तीसगडमध्ये ७ नोव्हेंबर व १७ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान होईल. मध्य प्रदेश- १७ नोव्हेंबर, राजस्थान- २३ नोव्हेंबर व तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून, या सर्वच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर केला जाईल.