नागपूर : राज्यात विभागनिहाय विधानसभा मतदारसंघांचा विचार करता सर्वाधिक ६२ जागा असलेल्या विदर्भात विजय मिळाला की राज्यात सत्तास्थापन करता येते, असा गेल्या तीन निवडणुकांचा अनुभव आहे. परिणामी, २०२४ च्या निवडणुकीचे खरे रणांगण विदर्भ असेल. विदर्भावर झेंडा फडकवण्यासाठी महायुती व महाविकास आघाडीत चुरस असली तरी खरा सामना हा भाजप व काँग्रेसमध्येच रंगणार आहे. विदर्भातील तब्बल ३६ जागांवर या दोन पक्षात थेट लढत होणार आहे.

पूर्व व पश्चिम अशा दोन भागात विभागलेल्या विदर्भाने ज्या पक्षाला साथ दिली त्या पक्षाचे सरकार राज्यात आरूढ होते, हे मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतरच्या तीन निवडणुकांच्या निकालाचे सूत्र आहे. पूर्व विदर्भात ३२ तर पश्चिम विदर्भात विधानसभेच्या ३० जागा आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपुरात असूनही काँग्रेसचा गड शाबूत होता. २०१४ मध्ये मोदी लाटेत विदर्भातील बहुतांश जागांवर भाजपने विजय मिळवला व सत्ता काबीज केली होती. यंदा ४२ जागांवर काँग्रेस महायुतीमधील विविध पक्षांच्या विरोधात लढणार आहे. यात सर्वाधिक लढत ही भाजपसोबत होणार आहे. तर भाजप आणि शिवसेनेमध्ये (उद्धव ठाकरे) केवळ तीन जागांवर लढत होणार आहे.

farm distress maharashtra election
विधानसभा निवडणुकीत शेतीचे मुद्दे किती प्रभावी? राज्यातील शेतीची सद्यस्थिती काय?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
is Dissatisfaction in North Gadchiroli over Sohle Iron Mine
सोहले लोहखाणीवरून उत्तर गडचिरोलीत असंतोष? खाणीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याला…
From BJP Devendra Fadnavis has been nominated for sixth time and Chandrashekhar Bawankule for fourth time
नागपूर : फडणवीस सहाव्यांदा; बावनकुळे, खोपडे चौथ्यांदा अन्…
crops damage in Maharashtra
राज्याच्या अनेक भागांना पावसाचा फटका; पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती
Kolhapur rain paddy crops
Kolhapur Rain News: कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे पिकांना फटका
BJPs Youth Aghadi disrupted the savidhan bachao maharashtra bachao lecture proving constitutional threats exist
“वर्ध्यातील चारही जागा भाजपच लढणार,’’ नितीन गडकरी यांच्या विश्वासू नेत्याचा दावा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date_ Maharashtra Assembly Election 2024
महाराष्ट्रात ३१ जागांवर ‘खेला’ होणार? मतविभागणी जवळपास समसमान, ‘काठावरच्या’ मतदारसंघांत कुणाची होणार सरशी?

हेही वाचा >>>Zeeshan Siddique : “मविआने मला शब्द दिला होता आणि उद्धव ठाकरेंनी..”; झिशान सिद्दिकी काय म्हणाले?

आठ जागांवर भाजप आणि राष्ट्रवादीसोबत भिडणार

विदर्भातील आठ जागांवर भाजचा सामना हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत होणार आहे. यात पूर्व नागपूर आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांच्या काटोल मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये लढत होणार आहे. विदर्भातील तुमसर, अहेरी आणि पुसद या तीन जागांवर अजित पवार आणि शरद पवार गटात थेट लढत होणार आहे. तुमसरमध्ये अजित पवार गटाचे राजू कारेमोरे व शरद पवार गटाचे चरण वाघमारे यांच्यात लढत आहे. तर अहेरीमध्ये माजी मंत्री धर्मरावबाबा आत्रात आणि भाग्यश्री आत्रम तर पुसदमध्ये इंद्रनील नाईक आणि शरद मैद यांच्यात लढत होणार आहे.

हेही वाचा >>>सिंदखेड राजा, बुलढाण्याचा तिढा मुंबईतच सुटण्याची चिन्हे, अपक्षांचीही मनधरणी

मतदारसंघ भाजप – काँग्रेस

दक्षिण-पश्चिम नागपूर – देवेंद्र फडणवीस – प्रफुल्ल गुडधे

पश्चिम नागपूर – सुधाकर कोहळे – विकास ठाकरे

दक्षिण नागपूर- मोहन मते – गिरीश पांडव

मध्य नागपूर – प्रवीण दटके – बंटी शेळके

उत्तर नागपूर- डॉ. मिलिंद माने – डॉ. नितीन राऊत

सावनेर – आशीष देशमुख – अनुजा केदार

उमरेड – सुधीर पारवे – संजय मेश्राम

कामठी- चंद्रशेखर बावनकुळे – सुरेश भोयर

चंद्रपूर- किशोर जोरगेवार – प्रवीण पडवेकर

राजुरा – देवराव भोंगळे – सुभाष धोटे

ब्रम्हपुरी- कृष्णलाल सहारे – विजय वडेट्टीवार

वरोरा – करण देवतळे – प्रवीण काकडे

बल्लापूर – सुधीर मुनगंटीवार – संतोष रावत

चिमूर – कीर्तीकुमार भांगडिया – डॉ. सतीश वारजूकर

गडचिरोली – डॉ. मिलिंद नरोटे – मनोहर पोरेटी

आरमोरी- कृष्णा गजबे – रामदास मसरात

साकोली – अविनाश ब्राह्मणकर – नाना पटोले

गोंदिया- विनोद अग्रवाल – गोपालदास अग्रवाल

आमगाव- संजय पुराम – राजकुमार पुराम

अमरावती- सुलभा खोडके- सुनील देशमुख

तिवसा – राजेश वानखडे – यशोमती ठाकूर

धामनगाव रेल्वे – प्रताव गडसळ – वीरेंद्र जगताप

अचलपूर – प्रवीण तायडे – बबलू देशमुख

मेळघाट – केवलराम काळे – डॉ. हेमंत चिमोटे

यवतमाळ- मदन येरावाल बाळासाहेब मांगूळकर

राळेगाव- प्रा. अशोक उईके – प्रा. वसंत पुरके

आर्णी – राजू तोडसाम – जितेंद्र मोघे

उमरखेड – किसन वानखेडे – साहेबराव कांबळे

वर्धा – पंकज भोयर – शेखर शेंडे

देवळी- राजेश बकाने – रंजीत कांबळे

अकोला पश्चिम- विजय अग्रवाल – साजीदखान पठाण

आकोट- प्रकाश भारसाकडे – महेश दंडणे

चिखली- श्वेता महाले- राहुल बोंद्रे

खामगाव- आकाश फुंडकर – दिलीपकुमार सानंदा

जळगाव जामोद- संजय कुटे – स्वाती वाकेकर

मलकापूर – चैनसुख संचेती- राजेश एकडे

मतदारसंघ – भाजप – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

पूर्व नागपूर – कृष्णा खोपडे – दुनेश्वर पेठे

काटोल – चरणसिंग ठाकूर – सलील देशमुख

हिंगणा – समीर मेघे – रमेशचंद्र बंग

तिरोडा- विजय रहांगडाले – रविकांत (गुड्डू) बोपचे

हिंगणघाट- समीर कुणावार – अतुल वांदिले

आर्वी- सुमित वानखेडे – मयूरा काळे

मूर्तीजापूर- हरीश पिंपळे – सम्राट डोंगरदिवे

कारंजा – सई डहाके – न्यायक पाटणी

मतदारसंघ – शिवसेना (शिंदे) – शिवसेना (उद्धव ठाकरे)

रामटेक – ॲड. आशीष जयस्वाल – विशाल बरबटे

दर्यापूर – अभिजीत अडसूळ – गजानन लवटे

बाळापूर – बळीराम शिरसकार- नितीन देशमुख

बुलढाणा – संजय गायकवाड – जयश्री शेळके

मेहकर- संजय रायमुलकर – सिद्धार्थ खरात

मतदारसंघ – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

अहेरी- धर्मरावबाबा आत्राम- भाग्यश्री आत्राम

तुमसर- राजू कारेमाेरे – चरण वाघमारे

मोर्शी – देवेंद्र भुयार – गिरीश कराळे

पुसद- इंद्रनील नाईक – शरद मैद

मतदारसंघ – शिवसेना (शिंदे) काँग्रेस

भंडारा- नरेंद्र भोंडेकर – पूजा ठवकर

दिग्रस- संजय राठोड – माणिकराव ठाकरे

रिसोड – भावना गवळी – अमित झनक

मतदारसंघ – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – काँग्रेस

अर्जूनी मोरगाव- राजकुमार बडोले – दिलीप बन्सोड

मतदारसंघ – युवा स्वाभिमान(महायुती) – शिवसेना (उद्धव ठाकरे)

बडनेरा- रवि राणा (महायुती) सुनील खराटे- शिवसेना

मतदारसंघ – भाजप – – शिवसेना (उद्धव ठाकरे)

वणी- संजीव रेड्डीभोजपूरवार – संजय नेरकर

अकोला पूर्व – रणधीर सावरकर – गोपाल दातकर

वाशिम – श्याम खोडे – डॉ. सिद्धार्थ देवळे

मतदारसंघ – शिवसेना (शिंदे) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

सिंधखेड राजा – शशिकांत खेडकर शिंदे – राजेंद्र शिंगणे