BJP vs Congress on Amit Shah Statement : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी चांगलाच गदारोळ घातला. अमित शाह यांनी डॉ. आंबेडकरांचा अपमान केला असून त्यांना तातडीने पदावरून हटवण्यात यावं, अशी मागणीही विरोधकांनी केली. या मुद्द्यावरून भाजपा बॅकफुटवर गेल्याचं चित्र दिसत होतं. परंतु, दुसऱ्याच दिवशी त्यांनी विरोधकांवर प्रतिहल्ला करण्यास सुरुवात केली. काँग्रेसने बाबासाहेबांचा कधी आणि कसा अपमान केला हे सांगण्याचा भाजपाने प्रयत्न केला. दरम्यान, काँग्रेसच्या या मुद्द्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाने विशेष रणनीती आखली आहे.

सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) घटकपक्षातील नेत्यांनी बुधवारी (२५ डिसेंबर) भाजपा अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी भारतीय संविधान आणि डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या कथित खोट्या अपप्रचाराचा सामना करण्यासाठी एकजूटता दाखवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

Sadhguru disheartened over Parliament disruptions on adani issue
Sadhguru on Adani: ‘उद्योगपतींवरून संसदेत रणकंदन नको’, अदाणींना समर्थन देत सद्गुरुंनी व्यक्त केली नाराजी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
Ujjwal Nikam.
Ujjwal Nikam On EVM : “आज तुम्ही पराभूत झाल्यामुळे…” उज्ज्वल निकमांनी सांगितले ईव्हीएम विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी कोणत्या दहा गोष्टी लागणार
News About Loksabha
Parliament : संसदेत उफाळून आलेला विधेयकांच्या नावांचा वाद काय? विरोधी पक्षांनी नेमकं काय म्हटलं आहे?
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव

हेही वाचा : BJP : भाजपा निवडणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष, कुठल्या खास निकषांवर होणार निवड?

‘एनडीएमध्ये एकजूटता असायला हवी’

भाजपाचा प्रमुख मित्रपक्ष असलेल्या तेलुगु देशम पार्टीने एनडीएमध्ये चांगल्या समन्वयाची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे. इंडिया आघाडीतील घटकपक्ष ज्याप्रमाणे एकत्रित येऊन सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक हल्ला करत आहेत, तसेच एनडीएतील मित्रपक्षांनी देखील एकजूटता दाखवायला हवी, असा सूर बैठकीतील नेत्यांचा होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत वक्तव्य करून डॉ. आंबेडकरांचा अपमान केला आहे, असा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

भाजपाचे दिवंगत नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची बुधवारी १०० वी जयंती होती. त्यांना आदरांजली वाहिल्यानंतर जेपी नड्डा यांच्या दिल्लीतील निवास्थानी एनडीएमधील नेत्यांची जवळपास तासभर बैठक झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, अमित शाह यांचे वक्तव्य, जातीय जनगणना आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी भाजपाला कसं लक्ष्य केलं यावर बैठकीत चर्चा झाली.

बैठकीत कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली?

अमित शाह यांनी बैठकीला उपस्थित असलेले तेलुगु देशम पार्टीचे नेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह अनेक नेत्यांना सांगितले की, काँग्रेसकडून कसा खोटा अपप्रचार केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तेलुगु देशम पार्टीने असा स्पष्ट संदेश दिला की, विरोधकांच्या अपप्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी एनडीएतील घटकपक्षांना एकजूट दाखवावी लागेल. तसेच एकमेकांमध्ये समन्वय ठेवणं देखील गरजेचं आहे. काँग्रेसने जनतेची दिशाभूल करण्यासाठी अमित शाह यांच्या विधानाचा खोटा अपप्रचार केला आहे, असा आरोपही भाजपा नेत्यांकडून करण्यात आला.

बैठकीला उपस्थित असलेल्या एका नेत्याने सांगितले की, “अमित शाह यांनी आपल्या भाषणात जेव्हा आंबेडकरांचा उल्लेख केला, तेव्हा काँग्रेसच्या खासदारांनी यावर तात्काळ प्रतिक्रिया दिली नाही. परंतु, त्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांची एक बैठक घेऊन हा मुद्दा उचलून धरण्याचा निर्णय घेतला. आंबेडकरांच्या मुद्द्यावर जनतेचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी जाणीवपूर्वक अमित शाह यांना लक्ष्य केले.”

भाजपा करणार काँग्रेसवर जोरदार पलटवार

भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांसह केंद्रीय मंत्र्यांनी बैठकीत अनेक जुने मुद्दे उकरून काढले. काँग्रेस सरकारने पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला अपमान, आणीबाणी लादण्याचे पाप याबाबत भाजपाने मित्रपक्षांना सांगितले. त्यांनी मित्रपक्षांना असे आवाहन केले की, काँग्रेसने केलेली पापं आपण तळागाळातील जनतेला सांगितली पाहिजेत. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने डॉ. आंबेडकरांच्या स्मरणार्थ पाच तीर्थस्थळांचा विकास, दलितांचे सशक्तीकरण, कल्याणकारी योजनामध्ये त्यांना हक्काचा वाटा देणे यासारखी कामे केली आहेत, असं मित्रपक्षांनी जनतेला सांगण्याची विनंती केली.

हेही वाचा : Mahayuti : महायुतीत भाजपाच मोठा भाऊ! मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपात हेच चित्र कसं स्पष्ट दिसलं?

बैठकीला एकनाथ शिंदेंची अनुपस्थिती

सूत्रांनी सांगितले की, बैठकीनंतर भाजपाच्या मित्रपक्षांच्या नेत्यांनी देखील जे.पी नड्डा यांची वैयक्तिक भेट घेतली. आपापल्या राज्यातील त्यांचा अजेंडा आणि इतर संबंधित समस्यांवर चर्चा केली. विशेष बाब म्हणजे, या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या जागांमध्ये किंचित घट झाली होती. त्यानंतर काही महिन्यांनी महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत एनडीएला मोठा विजय मिळाला. या विजयाबद्दलही बैठकीला उपस्थित असलेल्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला.

बैठकीत जनता दलाचे प्रतिनिधित्व केंद्रीय मंत्री राजीव रंजन उर्फ लालन सिंह यांनी केले. तर शिवसेना शिंदे गटाकडून बैठकीला खासदार प्रतापराव जाधव हजर होते. केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी, नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू, माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह, केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल, जीतन राम मांझी आणि संजय निषाद यांची देखील बैठकीला उपस्थिती होती.

बैठकीत अमित शाह यांनी काय सांगितले?

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काय घडले आणि त्यातून आपण कोणते धडे घेतले यासह अलीकडील राजकीय घडामोडींवर अमित शाह यांनी बैठकीत सविस्तरपणे सांगितले. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कधीही आदर केला नाही. परंतु, आता त्यांच्या बाजूने खोटा अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्याचा आपण एकजुटीने सामना करायला हवा, असे अमित शाह यांनी मित्रपक्षांना सांगितले. बेळगाव येथे काँग्रेस कार्यकारिणीच्या विस्तारित बैठकीच्या एक दिवस आधी दिल्लीत एनडीएतील मित्रपक्षांची बैठक पार पडली आहे.

भाजपाला घेरण्याची काँग्रेसची रणनीती

दरम्यान, बेळगाव येथे आज २६ डिसेंबरपासून काँग्रेस कार्यकारिणीचे दोनदिवसीय अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानाचा मुद्दा उचलून धरला जाणार आहे. याशिवाय जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरूनही भाजपाला लक्ष्य केलं जाणार आहे. २७ डिसेंबरला काँग्रेसतर्फे बेळगावमध्ये जय बापू, जय भीम, जय संविधान मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. १९२४ मध्ये महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव येथे काँग्रेसचे अधिवेशन पार पडलं होतं. या अधिवेशनाला १०० वर्षे पूर्ण झाली असून यानिमित्ताने डॉ. आंबेडकर आणि संविधानाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

Story img Loader