सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात दोन विधानसभा मतदारसंघ शिवसेना (शिंदे गट) आणि एक मतदारसंघ भाजपला मिळण्याची शक्यता असल्याने भाजपमध्ये जोरदार खदखद सुरू आहे. तर भाजपने सावंतवाडी, कुडाळ विधानसभा मतदारसंघ मिळावा म्हणून दबावगट निर्माण केला आहे. त्यामुळे कुडाळ मतदार संघ भाजप पारड्यात पडेल अशी अपेक्षा ठेवून आहे. दरम्यान मंत्री दिपक केसरकर यांनी सावंतवाडी व कुडाळ विधानसभा मतदारसंघ शिवसेना पक्ष लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार निलेश राणे यांनी उमेदवारीवर दावा केला आहे. निलेश राणे भूमिकेवर ठाम राहिले आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ आणि कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अनुक्रमे दीपक केसरकर आणि वैभव नाईक विजय झाले होते तर कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघात भाजपचे नितेश राणे विजयी झाले होते. तिन्ही मतदारसंघातील हे विद्यमान आमदार पुनश्च एकदा निवडणुकीत उभे राहण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.

महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Markadwadi EVM Issue.
Markadwadi : “राम सातपुते फडणवीसांचं डबडं, ते वाजतच राहणार”, मारकडवाडी प्रकरणावरून उत्तम जानकरांची टीका
Sharad Pawar EVM Markadvadi
Sharad Pawar on EVM: ‘छोट्या राज्यात विरोधक, मोठ्या राज्यात भाजपा’, शिंदे-अजित पवार गटाच्या मतदानाची आकडेवारी देत शरद पवारांची टीका
mla subhash dhote
आणखी एका पराभूत उमेदवाराची ईव्हीएमवर शंका… अडीच लाख रुपये भरून….
New CM of Maharashtra Devendra Fadnavis| BJP announced Maharashtra New Chief Minister
Maharashtra New CM: दहा वर्षांत देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी, काय घडलं गेल्या दशकभरात?
jalgaon evm machines
जळगावमध्ये ईव्हीएम विरोधात मोर्चा

हेही वाचा >>> Maharashtra Elections 2024: सोलापूरमध्ये अजित पवारांसमोर मोठे आव्हान

भाजप, शिवसेना (शिंदे गट ) आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती आहे. महायुतीच्या संकेताप्रमाणे कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ शिवसेनाला मिळतील तर कणकवली विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळेल. मात्र भाजपने आपली ताकद सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढली असल्याने सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली या विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे.सध्या मंत्री दीपक केसरकर सावंतवाडी मतदारसंघातून प्रतिनिधित्व करत असल्याने या ठिकाणी केसरकर यांना हा मतदारसंघ मिळेल. तर कुडाळमधून वैभव नाईक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रतिनिधित्व करत असल्याने या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाला उमेदवारी मिळाली तर उमेदवार कोण असेल ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा >>> Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर उतरलं पहिलं विमान! धावपट्टीची चाचणी यशस्वी; नियमित वाहतूक कधी सुरू होणार?

दरम्यान या ठिकाणी भाजपने दावा केला असून भाजपचे उमेदवार म्हणून निलेश राणे यांनी मतदारसंघात जोरदार मुसंडी मारली आहे. आपण या निवडणुकीत उमेदवार असू असे सांगितले असून भाजप कि शिवसेना ( शिंदे गट) यापैकी कोणत्या पक्षाचे ते उमेदवार असतील, हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघ भाजपला सुटला नाही तर निलेश राणे शिवसेनेत ( शिंदे) मध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे नुकतेच भेटले असल्याने ही चर्चा सुरू आहे.मात्र याला दुजोरा मिळाला नाही. तर मंत्री दिपक केसरकर यांनी निलेश राणे यांनी शिवसेना प्रवेश केला तर स्वागत आहे असे म्हटले आहे.

कणकवली विधानसभा मतदारसंघातून आमदार नितेश राणे हे भाजपचे उमेदवार असतील. सावंतवाडीतून दीपक केसरकर हे शिवसेना (शिंदे गटा) चे उमेदवार असतील तर वैभव नाईक कुडाळ मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार असतील. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी केसरकर यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले असून भाजपचे माजी नगराध्यक्ष संजू परब व भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांनी देखील उमेदवार म्हणून रिंगणात राहणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे केसरकर यांना भाजपने घेरले असल्याचे चित्र आहे.

Story img Loader