गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये निडणुका जाहीर झाल्या आहेत. गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर हिमाचल प्रदेशमधील मतदान अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले आहे. दरम्यान, या निडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांकडून विविध आश्वासने देण्यात येत आहेत. काँग्रेस आणि ‘आप’नंतर आता भाजपाने मतदारांना आर्कषित करण्यासाठी सायकल, स्कुटी, एलपीजी सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी राजकीय पक्षांकडून मोफत देण्यात येणाऱ्या गोष्टींवरून टीका केली होती. त्यांनी याला ‘रेवडी संस्कृती’ म्हटले होते. मात्र, आता भाजपाकडून याला महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने करण्यात आलेल्या घोषणा असल्याचे बोलले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – हिमाचल प्रदेश : निवडणूक जिंकण्यासाठी आश्वासनांचा पाऊस; काँग्रेस, भाजपाच्या जाहीरनाम्यांत नेमकं काय?

भाजपाने नेमक्या काय घोषणा केल्या आहेत?

हिमाचल प्रदेश निवडणुकीसाठी भाजपाने ‘संकल्पपत्र’ जाहीर केले आहे. यानुसार भाजपा जर हिमाचलमध्ये पुन्हा सत्तेत आली, तर ६वी ते १२वीपर्यंत शिकणाऱ्या मुलींना सायकल, तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना स्कुटी देण्यात येणार असल्याची घोषणा भाजपाने केली आहे. याच बरोबर दारिद्र रेषेखाली कुटुंबांना मोफत एलपीजी सिलिंडर आणि गरोदर महिलांना २५ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचेही या संकल्पपत्रात म्हटले आहे. तर गुजरातमध्ये भाजपाने पुन्हा सत्तेत आल्यास पीएम उज्वला योजनेंतर्गत दोन एलपीजी सिलिंडर देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, भाजपाकडून करण्यात आलेल्या या घोषणा मोफत देण्यात येणाऱ्या गोष्टी नसून महिला सशक्तीकरणादृष्टीने घेतले निर्णय असल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ”मोफतच्या गोष्टी देणे आणि एखाद्याचे सशक्तीकरण करणे यात फरक आहे. जेव्हा तुम्ही एकाद्याच्या सशक्तीकरणासाठी काम करता तेव्हा त्याला मोफत देणे म्हणता येणार नाही”, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी काँग्रेस आणि आपने दिलेल्या आश्वासनांवरही टीका केली आहे. छत्तीसगड आणि राजस्थानध्ये काँग्रेसने दिलेली आश्वासने अद्यापही पूर्ण झाली नसल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा – भारत जोडो यात्रा ही राजकीय हुकूमशाहीविरोधातील लढाई; जयराम रमेश यांची मोदीनीतीवर टीका

काँग्रेस आणि ‘आप’कडून आश्वासनांचा पाऊस

काँग्रेस आणि ‘आप’कडूनही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक आश्वासने देण्यात आली आहे. काँग्रेसने हिमाचल प्रदेशमध्ये ३०० युनीटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. तसेच १८ ते ६० वर्षांपर्यंत महिलांना १५०० रुपये प्रतिमहिना आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तर गुजरातमध्ये ५०० रुपयांत एलपीजी सिलिंडर आणि ३०० युनीटपर्यंत मोफत वीज तसेच मुलींना पदव्युत्तर पदवीपर्यंत मोफत शिक्षण आणि करोनामुळे घरातील कर्ता पुरूष गमावलेल्यांना चार लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

हेही वाचा – Gujrat Election 2022 : १० वेळा आमदार राहिलेल्या आदिवासी चेहऱ्याचा काँग्रेसला ‘रामराम’, भाजपात केला प्रवेश

भाजपा आणि काँग्रेसप्रमाणेच ‘आप’नेही गुजरातमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही घोषणा केल्या आहेत. १८ वर्षांवरील महिलांना एक हजार रुपये प्रतिमहिना आर्थिक मदत ३०० युनीटपर्यंत मोफत वीज आणि बेरोजगार युवकांना तीन हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे आपकडून सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp criticizes congress aap on freebies but bjp promises many things in himachal gujarat spb