लातूर : अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील यांना पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका मांडत मतदारसंघापुरते ‘मैत्रीपूर्ण’ लढतीची परवानगी द्यावी अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. महायुतीमध्ये शिवसेनेच्या तानाजी सावंत यांनी अजित पवार यांना टीकेचे लक्ष्य केले असताना आता भाजप कार्यकर्तेही अजित पवार गट आपल्याबरोबर नको, अशी मागणी जाहीरपणे करु लागले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लोकसभा निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत युती केल्यामुळे भाजपला फटका बसला असे लोक आम्हाला सांगत आहेत. त्यामुळे अहमदपूर विधानसभा मतदारसंघ हा भाजपने आपल्याकडे घ्यावा, अशी विनंती आम्ही पक्षश्रेष्ठीकडे करत आहोत, असे भाजपची मंडळी जाहीरपणे सांगत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांचे काम आम्ही करणार नाही अशी जणू भूमिका भाजपचे सर्व प्रमुख कार्यकर्ते जनसंवाद यात्रेतून मांडत असल्याने लातूर जिल्ह्यात ‘ महायुती’ मध्ये बेबनाव पहावयास मिळत आहे.

हेही वाचा…कारण राजकारण: ‘कोल्हापूर उत्तर’मध्ये सर्वच पक्ष चेहऱ्याच्या शोधात

अहमदपूर व चाकूर या दोन तालुक्याचा हा मतदारसंघ आहे .या मतदारसंघात इच्छुकांची संख्या अधिक. प्रत्येक निवडणुकीत या ठिकाणी भाजपमध्येच बंडखोरी होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार विनायकराव पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले होते. त्यामुळे भाजपतील दोघांनी बंडखोरी केली. नंतर दोघांनाही भाजपने पक्षात प्रवेश दिला. यातील दिलीप देशमुख हे तर जिल्हाध्यक्ष आहेत.

हेही वाचा…बेरोजगारांच्या संस्थांना विनानिविदा १० लाखापर्यंतची कामे, सत्ताधारी कार्यकर्त्यांना खूश करण्याचा प्रयत्न

राज्यात अजित दादाचा गट भाजपासोबत आल्यामुळे अहमदपूरचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील हे महायुतीतून निवडणूक लढणार हे जवळपास स्पष्ट आहे.भाजपमधील अंतर्गत खदखद गेल्या दोन वर्षापासून आहे .विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मतदारसंघात जनसंवाद यात्रा सुरू आहे .मतदार संघातील चार मंडळात ही यात्रा गेली या यात्रेत भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके , अशोक केंद्रे ,माजी आमदार बब्रुवान खंदाडे अशी सगळी मंडळी अहमदपूर विधानसभा मतदारसंघ हा भाजपला अनुकूल असल्याची भाषणे करत आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp demands friendly contest in ahmedpur assembly constituency latur opposes ncp s babasaheb patil print politics news psg