वर्धा : जिंकणार कोण, हा एकच निकष आता सर्वच पक्षात लावल्या जात असल्याचे व त्यावरून विद्यमान आमदारांनाही तिकीट नं देण्याचे धोरण अंमलात येत आहे. भाजप हा या तंत्रातील आद्य पुरस्कर्ता असल्याचे विविध राज्यात झालेल्या निवडणुकीत भाजपने केलेल्या प्रयोगवरून म्हटल्या जात असते.

भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हे तंत्र वापरल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने विदर्भात सहा विद्यमान आमदारांना या तंत्राचा फटका बसला. सर्वात चर्चेत आले ते दादाराव केचे यांचे नाव. त्यांचे तिकीट कापून ते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे यांना देण्यात आले. त्यामुळे संतप्त केचे यांनी स्वतंत्र अर्ज सादर करीत खळबळ उडवून दिली. अद्याप त्यांनी अर्ज परत घेतला नसून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी कापली म्हणून ढसढसा रडल्याने वाशीमचे लखन मलिक चर्चेत आले. त्यांच्याऐवजी भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव श्याम खोडे यांना संधी दिली आहे. परत संधी दिली नसल्याचे कळताच मलिक रडायला लागले होते. हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. सलग तीनदा ते निवडून आले होते. मलिक हे निष्क्रिय असल्याची टीका झाली होती. मात्र पुढील भूमिका ठरविणार असल्याचा ईशारा त्यांनी देऊन टाकला आहे.

split in Naik family in Pusad, Naik family, Pusad,
पुसदमध्ये नाईक घराण्यात उभी फूट, सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Anis Ahmed in Nagpur Assembly Constituency for Maharashtra Vidhan Sabha Election 2024
Nagpur Assembly Constituency : गाजावाजा करीत ‘वंचिंत’मध्ये गेलेले अनिस अहमद निवडणुकीपासून वंचित
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Maharashtra assembly election 2024 BJP rebel Dadarao Keche moved out of Maharashtra
आर्वीत राजकीय भूकंप, भाजप बंडखोर दादाराव केचे यांना महाराष्ट्राबाहेर हलविले
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हेही वाचा – पक्षफुटीनंतर शिवसेना, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला विदर्भात कमी जागा

गडचिरोली येथून विद्यमान भाजप आमदार डॉ. देवराव होळी यांना डच्चू देण्यात आला आहे. त्यांच्याऐवजी डॉ. मिलिंद नरोटे यांना संधी देण्यात आली आहे. आता होळी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे. भाजपच्या पहिल्या यादीत गडचिरोलीचा उल्लेख नसल्याने तिकीट बाबत उत्सुकता निर्माण झाली होती. नवे उमेदवार डॉ. हे सामाजिक कार्याने ओळखले जात असून संघ परिवाराचा विश्वासू चेहरा म्हणून त्यांचा परिचय दिल्या जातो. होळी हे वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा अडचणीत आले होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षविरोधी कार्य केल्याची तक्रार पण झाली होती. म्हणून त्यांना उमेदवारी नाकरण्यात आल्याची चर्चा होते.

हेही वाचा – Umred Assembly Constituency : उमेरडमध्ये शिवसेनेचे राजू पारवे अधांतरी, भाजपच्या पारवेंना उमेदवारी

नागपूर मध्यमधून विद्यमान आमदार विकास कुंभारे यांची तिकीट कापण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी माजी नगरसेवक प्रवीण दटके यांना उमेदवारी मिळाली आहे. आर्णी या अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघातील विद्यमान आमदार डॉ. संदीप धुर्वे यांची तिकीट कापण्यात आली आहे. माजी आमदार राजू तोडसाम यांना संधी मिळाली आहे. तसेच उमरखेड मतदारसंघात भाकरी फिरविण्यात आली आहे. या ठिकाणी विद्यमान भाजप आमदार नामदेव ससाणे यांचा पत्ता कटला आहे. ईथे किसान वानखेडे यांना संधी देण्यात आली आहे. विदर्भातील या सहा मतदारसंघात भाजपने भाकरी फिरविण्याचे तंत्र अंमलात आणले आहे.