२०२४ साली होणारी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील पक्ष कामाला लागले आहेत. काँग्रेस आणि भाजपा या पक्षांनी नव्याने पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपा वेगवेगळ्या राज्यांत सक्षम नेत्यांना जबादाऱ्या देत आहे. बिहारमध्ये भाजपाने नुकतेच अनेक तरुण आणि तडफदार नेत्यांचा पक्षाच्या राज्य कार्यकारिणीत समावेश केला आहे. भाजपाने या नियुक्त्यांच्या माध्यमातून जातीय, धार्मिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.

बिहार भाजपा कार्यकारिणीत महत्त्वाचे बदल

बिहार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांनी बुधवारी पक्षाच्या नव्या ३८ नेत्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. प्रदेशाध्यक्षपदाचा पदाभार स्वीकारल्यानंतर चार महिन्यांत सम्राट यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. या नियुक्त्यांच्या माध्यमांतून भाजपाने सर्व जातीच्या नेत्यांना प्रतिनिधीत्व मिळेल, याकडे प्राधान्याने लक्ष दिले आहे. तसेच पक्षाने या नव्या नियुक्त्यांमध्ये काही जुन्या नेत्यांकडील जबाबदारी कायम ठेवली आहे.

Kalpana Soren electoral campaign
Kalpana Soren: झारखंड विधानसभा निवडणुकीत कल्पना सोरेन यांची हवा; महिलांसाठीच्या योजना गेमचेंजर ठरणार?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nitin Gadkari Kothrud , Chandrakant Patil,
विकासासाठी महायुतीची गरज, नितीन गडकरी यांचे आवाहन
vadgaon sheri vidhan sabha election 2024
पुणे: अटीतटीच्या सामन्यात ‘मैत्री’ निर्णायक? ‘या’ मतदार संघात आहे असे चित्र!
Pune Prime Minister Narendra Modi Pandit Jawaharlal Nehru Pune print news
पुणे आवडे पंतप्रधानांना!
In Kolhapur many prominent office bearers and activists openly supported opposition
कोल्हापुरात स्वपक्षाविरोधात अनेक नेते मैदानात
Maharashtra assembly elections 2024 confusion about who is the official candidate of Mahavikas Aghadi in Raigad
रायगडमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कोण याचा गोंधळ सूरूच; शेकाप उमेदवारावर कारवाईची शिवसेनेची मागणी

कार्यकारिणीत तरुण नेत्यांचा समावेश

भाजपाने १२ राज्य उपाध्यक्ष, राज्य सचिव या पदांवर बिहारमधील वेगवेगळ्या नेत्यांची नियुक्ती केली आहे.यामध्ये पाच जणांवर राज्य सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. भाजपाने नव्याने नियुक्त केलेले बहुतांश नेते हे ४०-४५ वर्षांचे आहे. दोन नेत्यांचे वय ४० वर्षांपेक्षाही कमी आहे.नवी जबाबदारी दिलेल्या नेत्यांमध्ये माजी मंत्री भीमसिंह चंद्रवंशी,माजी आमदार मिथिलेश तिवारी, जगन्नाथ ठाकूर या सारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. तर गुरू प्रकाश पासवान (राष्ट्रीय प्रववक्ते), संतोश पाठक (राज्य प्रवक्ते), राजेश वर्मा, शिवेश राम आदी तरून नेत्यांवरही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

भाजपाचा जातीय समतोल राखण्याचा प्रयत्न

भाजापने वेगवेगळ्या समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नेत्यांना पक्षातील महत्त्वाची पदं देऊन जातीय समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. या नव्या नियुक्त्यांमध्ये तीन वैश्य दोन कुशवाह तर कुर्मी आणि यादव समाजाच्या प्रत्येकी एका नेत्याचा समावेश आहे. यासह आर्थिक दुर्बल घटक (ईबीसी), कहार, कुम्हार, नोनिया, धानूक, निशाद समाजाच्या प्रत्येकी एका नेत्याला भाजपाच्या नव्या कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. पासवान, रविदास, दांगी, अनुसूचित जाती या समाजातील प्रत्येकी एका नेत्याला कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे.यासह चार राजपूत तर भूमीहार,ब्राह्मण या समाजून येणाऱ्या प्रत्येकी तीन नेत्यांचादेखील या नव्या कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

यादव समाजाची मतं मिळवण्याचा याआधी प्रयत्न, पण…

बिहारमधील काही ओबीसी मतदारवर्ग अजूनही भाजपाला मतदान करतो.यादव समाजाची मतं मिळवण्यात मात्र भाजपाल अद्याप तितकेसे यश आलेले नाही. सध्या अनुसूचित जातीच्या मतदारांचाही भाजपाला काही प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. याआधी भाजपाने यादव समाजाची मतं मिळवण्याचा प्रयत्न केला होता. या समाजाचा राष्ट्रीय जनता दल या पक्षाकडे कल आहे. २०२२ साली भाजपाने यादव समाजाचे केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांना भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य उमेदवार असल्याचे सांगत यादव समाजाची मते मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यात भाजपाला अपेक्षित यश मिळाले नव्हते.

प्रादेशिक समतोल राखण्याचा भाजपाकडून प्रयत्न

भाजपाने आपल्या कार्यकारिणीत जातीय यासह प्रादेशिक समतोलदेखील साधण्याचा प्रयत्न केला आहे. बिहार भाजपाच्या नव्या कार्यकारिणीत बक्सर, भोजपूर, दरभंगा, मधुबनी, सिवान, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, वैशाली, रोहतास, पूर्व चंपारण, जेहानाबाद, पाटणा, सहरसा, गया, मडगेउरा, पूर्णिया, खागरिया गोपालगंज या भागांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नेत्यांना कार्यकारिणीत स्थान दिले आहे.