Sakoli Assembly Constituency Election 2024 काँग्रेस नेते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघातच घेरण्याचे भाजपचे प्रयत्न असले तरी नानांपुढे तुल्यबळ आव्हान उभे करू शकेल असा उमेदवार नसल्याने भाजपची अडचण झाली आहे.

नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्याने साकोली हा आता व्हीआयपी मतदारसंघात मोडतो. लोकसभा निवडणुकीत पटोले यांनी भंडारा-गोंदिया मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे यांना निवडून आणून राजकीय ताकद दाखवून दिली.

BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Ignoring voter growth led to Assembly elections defeat Vishal Patil admits
मतदार वाढीकडे केलेले दुर्लक्ष विधानसभा निवडणुकीत भोवले; विशाल पाटील यांची कबुली
Sharad Pawar, Ajit Pawar share stage at Baramati event
शरद पवार-अजित पवार पुन्हा एकाच व्यासपीठावर; ‘व्हीएसआय’च्या सर्वसाधारण सभेत उद्या उपस्थिती
Local Government Election Preparations BJP busy in front building but Congress is sluggish
भाजप मोर्चेबांधणीत व्यस्त, काँग्रेस सुस्तच! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पूर्वतयारी
loksatta editorial on devendra fadnavis
अग्रलेख : आजचे बालक; उद्याचे पालक!
Chandrakant Patil will be responsible for party expansion in Sangli
सांगलीत पक्ष विस्ताराची जबाबदारी चंद्रकांत पाटलांवर
guardianship of Akola district is with Adakash Fundkar print politics news
अकोल्याला सलग चौथ्यांदा बाहेरची पालकमंत्री; समन्वय राखून प्रश्न मार्गी लावण्याचे आव्हान

हेही वाचा >>> Haryana Assembly Elections : विधानसभेआधी हरियाणात आयाराम-गयारामांची चर्चा, दलबदलू पक्षांनी सगळ्यांचीच चिंता वाढवली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करून भाजपला सोडचिठ्ठी देणारे पटोले हे भाजपच्या हिटलिस्टवर आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना धडा शिकवण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी केली होती. नागपूरचे परिणय फुके यांच्या माध्यमातून तेथे पक्ष बांधणीवर भर दिला होता. परिणय फुके विरुद्ध पटोले अशी लढत साकोलीत झाली होती. मतदानाला काही दिवस असताना काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांच्या गटात हाणामारी झाली होती. बाहेरचे विरुद्ध स्थानिक असे स्वरूप या घटनेला देऊन नानांनी या घटनेचा राजकीय फायदा करून घेत विजय मिळवला होता. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पटोले यांना त्यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघातच रोखण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. त्यांच्या विरोधात भाजप कोणाला रिंगणात उतरवणार हा चर्चेचा विषय आहे.

हेही वाचा >>> BJP Alliance in UP: उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचं काय चुकलं? मित्रपक्षानंच दाखवला आरसा! संजय निषाद म्हणाले…

फुके यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघावर वर लक्ष केंद्रित केले होते. त्यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती. पण ती संधी ऐनवेळी हुकली. त्यानंतर फुके यांना पक्षानेविधान परिषदेत पाठवले. आता साकोलीत भाजपकडून माजी आमदार राजेश ऊर्फ बाळा काशीकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांची संभावित उमेदवार म्हणून चर्चा आहे.

पटोलेंच्या जमेच्या बाजू

दुसरीकडे नाना पटोले यांचा जनसंपर्क आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद भूषवत असल्याने साकोली मतदारसंघातच नव्हे तर भंडारा जिल्ह्यात सर्वसामान्यांचा त्यांच्याप्रती कल सकारात्मकतेकडे झुकणारा आहे. याचा फायदा काँग्रेसला इतरही मतदारसंघात होण्याची शक्यता आहे, असे कार्यकर्ते सांगतात. भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले यांना पक्षात प्रवेश देऊन पटोले यांनी पोवार समाजाला काँग्रेसकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. पटले यांच्यावर भाजपने अन्याय केला, अशी भावना पोवार समाजात आहे.

जातीय समीकरणाचा प्रभाव

भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखनी आणि लाखांदूर असे तीन तालुके मिळून साकोली मतदारसंघ तयार झाला आहे. या मतदारसंघात जातीय समीकरण निवडणुकीत कायम प्रभावी ठरले आहे. येथे कुणबी, तेली, पोवार आणि कोहळी समाजाची संख्या अधिक आहे. सर्वाधिक मतदार कुणबी समाजाचे आहेत. हे बघता भाजप पटोले विरोधात कुणबी उमेदवार निवडतात की अन्य जातीच्या उमेदवाराला संधी देणार हे बघणे उत्सुकतेचे आहे.

भाजपमध्ये सुंदोपसुंदी

भाजपने या जिल्ह्याची जबाबदारी नागपूरचे परिणय फुके यांच्याकडे दिली. परंतु बाहेरच्या व्यक्तीने जिल्ह्यातील राजकारणात ढवळाढवळ करणे भाजपच्या स्थानिक नेत्यांना पटले नाही. त्यामुळे फुके यांना स्थानिक नेत्यांकडून विरोध पत्करावा लागला. काही नेते पक्षातून बाहेर पडले तर काहींनी असहकार पुरकारला. त्याचा परिणाम भाजपला पटोले यांच्यापुढे आव्हानच उभे करता आले नाही.

Story img Loader