Ramesh Bidhuri Comments Against Priyanka Gandhi And Atishi : दोन वर्षांपूर्वी भाजपाचे नेते रमेश बिधुरी यांनी लोकसभेत त्यावेळचे बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर देशभरात वाद निर्माण झाला होता. इतकेच नव्हे, यामुळे गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे तिकिट तर कापले गेलेच पण केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना मिळणारी संधीही हुकली. याबाबत भाजपाच्या सूत्रांनी माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अनेक महिने पडद्यामागे राहिल्यानंतर बिधुरी हळूहळू पुनरागमन करत होते. त्यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात भाजपाने उमेदवारीही दिली होती. अशात त्यांनी आणखी वादग्रस्त विधाने करत वाद निर्माण केला आहे.

प्रियांका गांधी आणि मुख्यमंत्री आतिशी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान

नुकतेच, दिल्लीतील कालकाजी मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल बोलताना, बिधुरी म्हणाले की, “जसे आम्ही ओखला आणि संगम विहारमधील रस्ते केले आहेत, तसेच आम्ही कालकाजीतील सर्व रस्ते प्रियांका गांधी यांच्या गालासारखे गुळगुळीत करू”.

प्रियांका गांधी यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर त्यांनी मुख्यमंत्री आतिशी यांच्याबद्दलही आक्षेपार्ह विधान केले आहे. ते म्हणाले, “मार्लेना आता सिंग बनल्या आहे. त्यांनी वडील बदलले आहेत. त्या आधी मार्लेना होत्या, पण आता सिंग झाल्या आहेत.” बिधुरी यांच्या या विधानानंतर त्यांच्या जागी आता एक महिला उमेदवार देण्याची चर्चा भाजपामध्ये सुरू झाली आहे. ही आक्षेपार्ह विधाने केल्यानंतर आप आणि काँग्रेसने बिधुरी यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळे त्याच दिवशी त्यांनी प्रियांका गांधी आणि मुख्यमंत्री आतिशी यांची माफी मागितले होती.

भाजपामध्ये उमेदावारी रद्द करण्याबाबत चर्चा

या प्रकरणावर बोलताना भाजपाच्या सूत्रांनी सांगितले की, “फक्त आतिशी यांच्या विरोधातच नाही, तर रमेशजींनी प्रियांका गांधी यांच्याविरोधातील वक्तव्यामुळे काही मिनिटांतच त्यांना नड्डाजींनी फटकारले होते.” त्यांनी पुढे सांगितले की, “रविवारपासून दोन वेळा बैठका झाल्या असून, त्यामध्ये त्यांची उमेदवारी रद्द करण्याबाबत किंवा त्यांचा मतदारसंघ बदलण्याबाबत चर्चा झाली आहे.” रमेश बिधुरी हे दोन वेळा खासदार आणि तीन वेळा आमदार होते.

लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य

रमेश बिधुरी लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत. ते आजही स्थानिक शाखांमध्ये नियमित पाहुणे म्हणून जात असतात. महाविद्यालयात असताना त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्येही काम केले आहे. पुढे ते राजनाथ सिंह यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या जवळ आले आणि दिल्ली भाजपाचे सरचिटणीस आणि उपाध्यक्ष यासारख्या महत्त्वाच्या पदांवर विराजमान झाले.

पुढे बिधुरी यांनी १९९३ आणि १९९८ मध्ये त्यांनी भाजपाच्या तिकिटावर दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवली परंतु दोन्ही वेळा ते पराभूत झाले. अखेर २००३ मध्ये ते तुघलकाबादचे आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासून २०१३ पर्यंत ते दिल्लीचे आमदार होते. पुढे २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता.

Live Updates