BJP Jharkhand game plan: झारखंड राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. कदाचित हरियाणा, जम्मू-काश्मीरनंतर महाराष्ट्रासह झारखंडची निवडणूक होण्याची शक्यता आहे. भाजपाने यंदा झारखंडमध्ये विजय मिळविण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. २०१९ रोजी भाजपाने झारखंडची निवडणूक स्वबळावर लढविली होती. मात्र, यावेळी एनडीए म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी भाजपाने केली आहे. याव्यतिरिक्त विद्यमान सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) या पक्षाच्या विरोधातील नाराजीचा लाभ, आदिवासी समुदायाच्या मतांमध्ये विभाजन आणि माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या बरोबरीने झारखंडमध्ये विजय मिळविण्याची रणनीती भाजपाने आखली असल्याचे दिसते.

झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते चंपई सोरेन हे दि. ३० ऑगस्ट रोजी भाजपामध्ये अधिकृतरित्या प्रवेश घेत आहेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपल्याला अपमानित करून मुख्यमंत्रिपदावरून दूर केले, असा आरोप करत चंपई सोरेन भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाची कमान चंपई सोरेन यांच्याकडे दिली होती. मात्र, दोन महिन्यांनी तुरुंगाबाहेर येताच दुसऱ्याच दिवशी चंपई सोरेन यांना राजीनामा देऊन बाजूला होण्यास सांगितले गेले. तसेच हेमंत सोरेन तुरुंगातून सरकार चालविण्याचा प्रयत्न करत होते, असाही आरोप चंपई सोरेन यांनी केला आहे.

bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
haryana politics
Haryana Politics : हरियाणात भाजपा की काँग्रेस? दुष्यंत चौटाला अन् चंद्रशेखर आझाद यांच्या युतीमुळे कुणाचे ‘टेन्शन’ वाढवणार?
What Devendra Fadnavis Said About Uddhav Thackeray?
Devendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंची मला खरंच दया येते, त्यांना लाचारासारखं…”; देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
Hasan Mushrif on Sharad pawar
Hasan Mushrif on Sharad Pawar: “पवार साहेब तुमच्याशी वैर नाही, समरजित आता तुझी…”, हसन मुश्रीफांचे प्रत्युत्तर
jp nadda slams Kangana Ranaut marathi news
जे.पी. नड्डा यांच्याकडून कंगना यांची कानउघाडणी
Ajit Pawar meeting in Katol assembly constituency on 31st August
Maharashtra News : मालवणमधील नव्या पुतळ्याचं काम राम सुतार यांच्याकडे; अजित पवारांची माहिती
Yashomati Thakur in Teosa Assembly Constituency in Vidhan Sabha election 2024 in Marathi
कारण राजकारण: तिवसा मतदारसंघात ‘यशा’साठी भाजपची पराकाष्ठा

चंपई सोरेन यांचा भाजपामध्ये प्रवेश होत असल्यामुळे झारखंडच्या कोल्हन प्रदेशात यश मिळेल, असे भाजपाच्या नेत्यांना वाटते. झारखंडमधील १४ विधानसभा मतदारसंघ असलेला कोल्हन विभाग हा चंपई सोरेन यांचा बालेकिल्ला असल्याचे बोलले जाते. भाजपाच्या एका नेत्याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, मागच्या काळात आम्ही स्वबळावर निवडणूक लढवून चूक केली. मात्र, यावेळी एनडीए म्हणून निवडणूक लढविली जाईल. जनता दल (संयुक्त) आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच अधिकृत घोषणा होईल.

हे वाचा >> झारखंड मुक्ती मोर्चात फुटीची चिन्हे? चंपाई सोरेन भाजपच्या वाटेवर? इंडिया आघाडीचा प्रतिसाद काय?

भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, झारखंडमध्ये मोठ्या कालावधीनंतर आम्ही मित्रपक्षांसह निवडणूक लढविण्यास तयार झालो आहोत. ज्यांनी भाजपाला सोडले होते, ते पुन्हा आता पक्षात येऊ लागले आहेत. तसेच राज्यात तिसरी आघाडीही निर्माण होत असून आदिवासींचे प्रश्न मांडण्याचा ते प्रयत्न करत आहेत, ज्यामुळे आदिवासी समाजाच्या मतांमध्ये फूट होऊ शकते. शिवाय चंपई सोरेन यांच्यासारखे जेएमएमचे वरिष्ठ नेते भाजपात येत आहेत. हेमंत सोरेन यांनी कसे तुरुंगातून सरकार चालविले, हे चंपई सोरेन लोकांना सांगतील.

झारखंड पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आणि झारखंडचे ज्येष्ठ नेते सूर्या सिंह बेस्रा हे विधानसभेसाठी तिसरी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत.

यावर्षी चार राज्यांत विधानसभा निवडणुका

यावर्षी लोकसभेनंतर तीन राज्य आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. हरियाणा आणि जम्मू व काश्मीरमध्ये सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये निवडणुका होत आहेत; तर झारखंड आणि महाराष्ट्रात वर्ष अखेरीस निवडणूक होईल. लोकसभा निवडणुकीत या राज्यात भाजपाला कमी यश मिळाले होते, ते अपयश झाकण्यासाठी विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करून दाखविण्याचे भाजपाचे प्रयत्न असतील.

भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने झारखंडबाबत बोलताना सांगितले की, राज्यात आदिवासी समाजाची मते न मिळणे ही आमच्यासमोरील सर्वात मोठी अडचण आहे. २०१९ च्या आधी बिगर आदिवासी नेते रघुबर दास यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिल्यानंतर २०१९ मध्ये भाजपाला विधानसभा निवडणुकीत पराभव सहन करावा लागला होता, तर झारखंड मुक्ती मोर्चाने काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी केली होती. यावेळीही इंडिया आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढणार आहे.

लोकसभेला काय निकाल लागला?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील १४ जागांपैकी भाजपाने आठ जागी विजय मिळविला. एक जागा ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनला मिळाली, पण भाजपाला पाचही अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागा गमवाव्या लागल्या. या ठिकाणी इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आले. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केल्याचा फटका या जागांवर भाजपाला बसला. इंडिया आघाडीने संविधान बदल आणि आरक्षणावर हल्ला होत असल्याचा प्रचार केल्यामुळे भाजपाला फटका बसला, असे भाजपाच्या नेत्यांना वाटते.

कोल्हन प्रदेशाची भूमिका काय?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला कोल्हन प्रदेशात मोठा फटका बसला. सरयू रॉय यांनी भाजपाशी बंड केल्यानंतर येथील सर्व १४ जागांवर भाजपाचा पराभव झाला. पण, आता गीता कोडा आणि चंपई सोरेनसारख्या नेत्यांना सामावून घेतल्यामुळे भाजपा कोल्हनमधील ८ ते ९ जागा जिंकू शकेल, असे भाजपाच्या नेत्यांना वाटते. सरयू रॉय यांनी याच महिन्यात जनता दल (संयुक्त) या पक्षात प्रवेश केला आहे, जो की एनडीएचा घटक पक्ष आहे.

चंपई सोरेन यांनी आदिवासी समाजाची लोकसंख्या कमी होत असल्याचा मुद्दा पुढे करून भाजपा आदिवासींच्या रक्षणासाठी काम करत असल्याचे सांगितले. भाजपानेही हेमंत सोरेन यांच्या सरकारवर अवैध घुसखोरी आणि आदिवासी तरुणींशी घुसखोर लग्न करत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे संसदेत म्हणाले की, आदिवासी महिला बांगलादेशी घुसखोरांशी लग्न करत असल्यामुळे आदिवासींची लोकसंख्या १० टक्क्यांनी कमी झाली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सर्मा यांनीही याच विषयावरून इंडिया आघाडीच्या सरकारवर टीका केली आहे.

झारखंडमध्ये विधानसभेच्या ८१ जागा असून बहुमताचा आकडा ४१ एवढा आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाने ३०, भाजपा, २५, काँग्रेस १६ आणि इतर पक्ष आणि अपक्षांनी मिळून १० जागा जिंकल्या होत्या. जेएमएम, काँग्रेस आणि आरजेडीने एकत्र येऊन आघाडीचे सरकार स्थापन केले होते.