घराणेशाहीच्या मुद्द्य़ावरून भाजपाकडून अनेक वर्षांपासून विरोधकांवर टीका करण्यात येत आहे. याबाबत भाजपानं सातत्यानं काँग्रेससह समाजवादी पक्ष, आरजेडी, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक अशा प्रादेशिक पक्षांना लक्ष्य केलं आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे यंदाच्या निवडणुकीत भाजपानं स्वत:च मोठा राजकीय वारसा लाभलेल्या १० राजघराण्यांतील सदस्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपाच्या कथनी आणि करणीत फरक असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

ओडिशा

ओडिया अस्मितेच्या मुद्द्यावरून बीजेडी दोन दशकांपासून ओडिशात सत्तेत आहे. या राज्यात भाजपानं राजघराण्यातील दोघांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. भाजपानं पूर्वीच्या पटनाग-बोलांगीर आणि कालाहंडी संस्थानातील अनुक्रमे संगीता कुमारी सिंग देव आणि मालविका केशरी देव यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे.

Rajendra Gavit, Palghar Assembly Constituency,
राजेंद्र गावित पालघरसाठी आग्रही
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
jammu Kashmir polls
विश्लेषण: निष्ठावंतांची नाराजी भाजपला जम्मू व काश्मीरमध्ये भोवणार? नव्या चेहऱ्यांना संधी?
Will Kangana Ranaut be a headache for BJP after controversial statement
कंगना रणौत यांना हे सुचतं तरी कसं? त्या भाजपसाठी डोकेदुखी ठरतील का?
Sharad Pawar and Devendra Fadnavis
Harshvardhan Patil : देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांचा धक्का? निवडणुकीच्या तोंडावर ‘हा’ भाजपा नेता तुतारी हाती घेण्याच्या चर्चांना उधाण
Ajit Pawar in trouble again due to controversial statement
वादग्रस्त विधानाने अजित पवार पुन्हा अडचणीत
mira Bhayandar , BJP, Narendra Mehta, assembly elections, Mira Road, internal disputes, Gita Jain, Ravi Vyas, election candidacy, former MLA, BJP workers, mira bhayandar news,
नरेंद्र मेहता आगामी निवडणुकीचे उमेदवार, भाजप कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा; अंतर्गत वाद पेटून उठण्याची शक्यता
Joe Biden praise on kamala harris
कमला हॅरिस इतिहास घडवतील! बायडेन यांच्याकडून विश्वास व्यक्त; लोकशाहीसाठी मतदान करण्याचे आवाहन

दिल्ली विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी राहिलेल्या ६२ वर्षीय संगीता कुमारी सिंग देव यांचा विवाह पटनाग-बोलांगीर राजघराण्याचे कनकवर्धन सिंग देव यांच्याशी झाला होता. ओडिशाच्या राजकारणात देव कुटुंबाला मोठा राजकीय इतिहास राहिला आहे. कनकवर्धन सिंग देव यांचे आजोबा राजेंद्र नारायण सिंह देव हे स्वतंत्र पक्षाचे सदस्य होते. १९६७ मध्ये ते ओडिशाचे मुख्यमंत्री बनले.

संगीता या बोलंगीरमधून भाजपाच्या विद्यमान खासदार आहेत. त्यांनी बोलांगीररमधून १९९८, १९९९ व २००४ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा विजयही झाला. मात्र, २००९ आणि २०१४ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. बीजेडीचे उमेदवार कलिकेश सिंह देव यांनी त्यांचा पराभव केला.

त्याशिवाय भाजपाच्या दुसऱ्या उमेदवार मालविका केशरी देव यांचे पती अर्का केशरी देव हे पूर्वी बीजेडीमध्ये होते. दोघांनी सप्टेंबर २०१३ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. अर्का केशरी देव हे कालाहंडी संस्थानाचे प्रमुख प्रताप केशरी देव यांचे नातू आहेत. तसेच ते २०१४ ते २०१९ दरम्यान कालाहंडी मतदारसंघाचे खासदार होते.

हेही वाचा – आर्थिक सुधारणांचा शिल्पकार ते ‘अपघाती पंतप्रधान’; निवृत्तीनंतर मनमोहन सिंहांना “इतिहास न्याय देईल?”

राजस्थान

राजस्थानमध्येही भाजपानं राजघराण्यातील दोघांना उमेदवारी दिली आहे. भाजपानं दुष्यंत सिंह आणि महिमा सिंह या दोघांनाही लोकसभेचं तिकीट दिलं आहे. दुष्यंत सिंह हे राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री व भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधरा राजे यांचे पुत्र आहेत. तर, महिमा सिंह या ग्वाल्हेरच्या राजघराण्यातील सदस्य आहेत.

दुष्यंत सिंह (वय ५०) हे झालावाड-बारण लोकसभा मतदारसंघातून चार वेळा भाजपाचे खासदार राहिले आहेत. त्यांना भाजपानं पुन्हा एकदा संधी दिली आहे; तर महिमा सिंह यांना भाजपानं राजसमंदमधून उमेदवारी दिली आहे. महिमा सिंह यांचे पती विश्वराज सिंह मेवाड हे राजस्थानमधील नाथद्वार विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी भाजपात प्रवेश केला होता.

मध्य प्रदेश

मध्य प्रदेशमधील गुना लोकसभा मतदारसंघातून भाजपानं सिधिंया घराण्यातील सदस्य जोतिरादित्य सिंधिया यांना उमेदवारी दिली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सिंधिया यांचा पराभव झाला होता. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. आता ते राज्यसभेचे खासदार आहेत.

पंजाब

पंजाबमधील पटियाला लोकसभा मतदारसंघातून भाजपानं प्रणीत कौर यांना उमेदवारी दिली आहे. प्रणीत कौर या पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत. अमरिंदर सिंग हे पटियालाच्या राजघराण्याचे सदस्य आहेत. प्रणीत कौर या १९९९ ते २०१४ दरम्यान पटियालाच्या खासदार राहिल्या आहेत. २०१४ त्यांना परभावाचा सामना करावा होता. मात्र, २०१९ मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजय मिळविला होता.

पश्चिम बंगाल

तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार मोहुआ मोईत्रा यांच्याविरोधात भाजपानं कृष्णनगर राजघराण्यातील अमृता रॉय यांना उमेदवारी दिली आहे. अमृता रॉय या पहिल्यांदाच निवडणूक लढवीत आहेत.

कर्नाटक

म्हैसूर लोकसभा मतदारसंघातून भाजपानं विद्यमान खासदार प्रताप सिम्हा यांचं तिकीट कापत ३२ वर्षीय यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. ते म्हैसूरच्या राजघराण्याचे सदस्य असून, पहिल्यांदाच निवडणूक लढवीत आहेत. त्यांचे काका श्रीकांतदत्त नरसिंहराज वाडियार यांनी १९८४, १९८९, १९९६ व १९९९ मध्ये म्हैसूरमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.

हेही वाचा – “पक्ष चालवणं म्हणजे अर्धवेळ नोकरी नव्हे”; गुजरात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी पक्ष सोडताना दिल्या कानपिचक्या!

उत्तराखंड

उत्तराखंडमधील टिहरी गढवालमधून भाजपानं विद्यमान खासदार माला राज्यलक्ष्मी शाह यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. त्या टिहरी गढवालचे महाराजा मनुजेंद्र शाह साहिब यांच्या पत्नी आहेत. माला राज्यलक्ष्मी शाह या एक दशकापासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांचे दिवंगत सासरे मानवेंद्र शाह १९७५, १९६२ व १९६७ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते. तर १९९१, १९९६, १९९८, १९९९ व २००४ मध्ये भाजपाच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते.

त्रिपुरा

भाजपानं पूर्व त्रिपुरामधून महाराणी कृती सिंह देबबर्मा यांना उमेदवारी दिली आहे. त्या त्रिपुरातील माणिक्य राजघराण्याच्या सदस्या आहेत. त्यांचे पती योगेश्वर राज सिंह हे काँग्रेसचे माजी नेते आहेत. त्यांचे वडील किरीट बिक्रम किशोर देबबर्मा हे १९८९ मध्ये पूर्व त्रिपुराचे खासदार होते. तसेच त्यांच्या आई बिभू कुमारी देवी १९९१ मधून या याच मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या.