BJP to appoint new national president : महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपात संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. येत्या १५ जानेवारीपर्यंत भाजपाकडून निम्म्या राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या सुरुवातीला पक्षाला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. जानेवारी २०२० पासून जे.पी नड्डा यांच्याकडे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद आहे. २०२३ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला होता, त्यानंतर त्यानंतर त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.

संघटनात्मक निवडणुकांच्या तयारीला लागलेल्या भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, “ज्या राज्यांमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या ते राज्य वगळता सदस्यता अभियानानंतर संघटनात्मक निवडणुका घेतल्या जातील. जानेवारी २०२५च्या मध्यापर्यंत निम्म्या राज्यांतील निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यानंतरच्या पुढील टप्प्यात भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड केली जाईल.

Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Sadabhau Khot On Maharashtra Cabinet Expansion
Sadabhau Khot : “मोठ्या पक्षांची मंत्रिपदे नंतर निश्चित करा, आधी…”, सदाभाऊ खोत यांनी महायुतीच्या नेत्यांकडे केली ‘ही’ मागणी
Tanaji Sawant ON Mahayuti Government
Cabinet Expansion : मंत्रिमंडळात जुन्या नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार? शिवसेना नेत्याचं मोठं विधान
no final decision on how many ministerial posts will be distributed to BJP Shiv Sena and NCP print politics news
मंत्र्यांच्या संख्येवरून महायुतीत चर्चा सुरूच
CM Devendra Fadnavis
Devendra Fadnavis on Next 5 Year Plan: मंत्रिमंडळ विस्तार, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची घोषणा
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला, “२०१९ ला जनतेने जो कौल दिला होता त्याच्याशी बेईमानी…”
Devendra Fadnavis new Chief Minister of Maharashtra
Maharashtra New CM : देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार; विधीमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड

हेही वाचा : Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?

कोण होणार भाजपाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष?

भाजपाच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, “सध्या अनेक राज्यांमध्ये बुथ पातळीवरील निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. येत्या ५ ते १० दिवसांत विभाग स्तरावरील निवडणुका पूर्ण होण्याची शक्यता आहे. यानंतर वर्षाच्या अखेरीस किंवा ५ जानेवारीपर्यंत जिल्हा पातळीवरील निवडणुका घेतल्या जातील.” भाजपाचे पुढील अध्यक्ष कोण होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे की, पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच नवीन अध्यक्षांचे नाव जाहीर केले जाईल. भाजपाचे नेतृत्व आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेमक्या कोणत्या नावावर शिक्कामोर्तब करणार यावर ही निवडणूक अवलंबून असेल.

लोकसभा २०२४ निवडणुकीनंतर भाजपाचे केंद्रीय नेतृत्व थोडे कमकुवत झाल्याची चर्चा होती. मात्र, हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकालांमुळे पक्षाचा आत्मविश्वास वाढला. त्याचबरोबर उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या पोटनिवडणुकांनी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला नवी ताकद दिली. त्यामुळे लोकसभेत स्वबळावर बहुमत नसतानाही पक्षाला पुन्हा गती मिळाली.

भाजपच्या घटनेनुसार, प्रत्येक स्तरावर निवडून आलेले अध्यक्ष हे विभाग, जिल्हा आणि राज्य स्तरावर जाऊन पदाधिकाऱ्यांची एक टीम उभी करतात. अर्ध्या राज्यांच्या कार्यकारणीच्या निवडणुका झाल्यानंतर पूर्णवेळ राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेतली जाते. त्यानंतर नवे राष्ट्रीय अध्यक्ष पदाधिकाऱ्यांची टीम नियुक्त करतात. राष्ट्रीय अध्यक्षाची निवड इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाते. अशा पद्धतीने उमेदवाराची सर्वसहमतीने निवड केली जाते. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी जो नेता उमेदवारी अर्ज करतो त्याची निवड बिनविरोध केली जाते.

हेही वाचा : Ajit Pawar vs Sharad Pawar : अजित पवार निवडणूक निकालांसह शरद पवारांच्या छायेतून कसे बाहेर पडले? 

निवडणुकीसाठी एकापेक्षा जास्त अर्ज आले तर?

भाजपाच्या घटनेत राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची देखील तरतूद आहे. जर नामांकन मागे घेण्याच्या तारखेनंतर एकापेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असेल, तर अखिल भारतीय निवडणूक अधिकाऱ्याने नियुक्त केलेल्या मतदान अधिकाऱ्यांद्वारे निवडलेल्या दिवशी सर्व राज्यांच्या राजधानीत मतदान घेण्यात येते. त्यानंतर सीलबंद मतपेट्या दिल्लीत आणून मतांची मोजणी केली जाते. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा कार्यकाळ हा जास्तीत जास्त ३ वर्षांचा सलग दोन टर्म असतो.

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आतापर्यंत कोणाकोणाची वर्णी?

विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांनी सलग दुसऱ्यांदा पक्षाचे नेतृत्व करावे, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इच्छा होती. मात्र, २०१२ मध्ये या संदर्भातील दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी नितीन गडकरी यांच्या जागी राजनाथ सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राजनाथ सिंह हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. यानंतर त्यांच्या जागी अमित शहा यांची निवड करण्यात आली. चार वर्षांपूर्वी म्हणजेच २०२० पासून जे.पी. नड्डा यांनी भाजपाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.

Story img Loader