सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, अकलूज, अक्कलकोट, दुधनी आणि मंगळवेढा या पाच कृषिउत्पन्न बाजार समित्यांमध्ये भाजपने वर्चस्व मिळवून आगामी विधानसभा निवडणुकांची यशस्वीपणे साखर पेरणी केली. माढा आणि मोहोळ या दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता टिकवून ठेवली. शेकापचे दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या पश्चात झालेल्या सांगोला कृषिउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेकापने शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीला सोबत घेऊन वर्चस्व राखले. काँग्रेसच्या ताब्यात असलेली अक्कलकोट तालुक्यातील दुधनी ही एकमेव कृषिउत्पन्न बाजार समिती भाजपने हिसकावून घेत काँग्रेसला विशेषतः माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा अभेद्य गड उद्ध्वस्त केला आहे. अक्कलकोट तालुक्यातील म्हेत्रे गटाला बसलेला फटका हे काँग्रेससाठी धोकादायक मानले जाते.

सोलापूर जिल्ह्यात राज्यात चौथ्या स्थानावर राहिलेल्या सोलापूर या मोठ्या कृषिउत्पन्न बाजार समितीसह बार्शी, पंढरपूर, करमाळा, अकलूज, कुर्डूवाडी, मोहोळ, अक्कलकोट, दुधनी, सांगोला आणि मंगळवेढा अशा अकरा कृषिउत्पन्न बाजार समित्या आहेत. कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या कृषिउत्पन्न बाजार समित्यांचे ग्रामीण भागातील सत्ताकारणात स्थान मोठे आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या कृषिउत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका ज्या त्या भागातील आजी-माजी आमदारांसह सत्ताधारी आणि विरोधकांची ताकद अजमावणाऱ्या ठरल्या आहेत. त्यादृष्टीने सोलापूर जिल्ह्यात भाजपची ताकद आणखी बळकट झाल्याचे दिसून येते.

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Counseling center for victimized women in Thane district
ठाणे जिल्ह्यात पीडित महिलांसाठी समुपदेशन केंद्र
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
Saket Bridge, Mumbai Nashik Traffic, Road Widening,
मुंबई-नाशिक मार्गावर पुढील तीन महिने कोंडीचे, साकेत पुलाजवळील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास सुरूवात
Vinayak Raut, BJP , former MP Vinayak Raut,
भाजपचे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून, माजी खासदार विनायक राऊत यांची टीका
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल

हेही वाचा – Karnataka : “असला नालायक मुलगा…”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलच्या वक्तव्यावरून खरगे पिता-पुत्रांची कोंडी

विशेषतः भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोटची कृषिउत्पन्न बाजार समिती कायम राखत दुसरीकडे सुरुवातीपासून म्हणजे १३ वर्षांपासून काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा अभेद्य गड असलेल्या दुधनी कृषिउत्पन्न बाजार समितीही आश्चर्यकारक खेचून आणली. यात काँग्रेसला विशेषतः म्हेत्रे गटाला मोठा धक्का बसला आहे. तसेच कल्याणशेट्टी यांनी भाजपमधील आपल्या विरोधकांचीही जागा दाखवून दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कल्याणशेट्टी आणि म्हेत्रे यांच्यातच पारंपरिक लढत होण्याची अपेक्षा विचारात घेता कल्याणशेट्टी यांनी म्हेत्रे यांना जोरदार हादरा देत आपली ताकद वाढविल्याचे दिसून आले. कल्याणशेट्टी यांनी दूरदृष्टीचा विचार करून आपल्याच पक्षाचे ८५ वर्षांचे वयोवृद्ध माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्याशी जुळवून घेत श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना अवसायानात जाण्यापासून रोखला आणि पुन्हा पाटील यांच्या ताब्यात मिळवून दिला. त्यासाठी शासनाकडून आर्थिक मदतही उपलब्ध करून दिली.

अकलूज कृषिउत्पन्न बाजार समितीवर प्रस्थापित ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील व त्यांचे पुत्र आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी वर्चस्व राखले तरीही त्यांचे कडवे विरोधक उत्तम जानकर यांचा कृषिउत्पन्न बाजार समितीत झालेला चंचूप्रवेश मोहिते-पाटील यांनी सहजतेने घ्यावा आसा नाही. मंगळवेढ्यात भाजपचे आमदार समाधान अवताडे यांनी आपले चुलते बबनराव अवताडे यांच्याशी जुळवून घेतल्याने तेथील कृषिउत्पन्न बाजार समितीची सत्ता कायम राखता आली. तर पंढरपूर कृषिउत्पन्न बाजार समिती ही भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. यात ते यशस्वी ठरले. तर पंढरपूर-मंगळवेढा भागात साखर कारखानदारीच्या माध्यमातून प्रभावी ठरलेले अभिजित पाटील यांना परिचारक यांनी रोखला आहे. मात्र तरीही आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता परिचारक यांना आणखी लढाई लढावीच लागणार आहे. आमदार समाधान अवताडे यांच्याशी परिचारक यांचे राजकीय गणित कसे जुळते, यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.

हेही वाचा – ब्राह्मण मुख्यमंत्र्याची गुगली टाकून कुमारस्वामींचा लिंगायत समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न

माढ्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू, करमळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी कुर्डूवाडी कृषिउत्पन्न बाजार समितीची सत्ता राखून शिवसेना नेते, आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांचे बंधू तथा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांच्यासह सर्व विरोधकांना धोबीपछाड दिली आहे. यात आमदार बबनराव शिंदे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत धोका दिसत नाही. मात्र आगामी काळात आमदार शिंदे हे राष्ट्रवादीतच कायम राहणार की भाजपमध्ये जाणार, याचे कोडे कायम आहे. हीच गोष्ट मोहोळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील अनगरकर यांची म्हणता येईल. वर्षानुवर्षे त्यांच्या वर्चस्वाखाली असलेली मोहोळ कृषिउत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. राष्ट्रवादी पक्षांतर्गत कुरघोड्यांच्या राजकारणात राजन पाटील अनगरकर हे कंटाळले आहेत. म्हणूनच ते कोणत्याही क्षणी भाजपमध्ये जाऊ शकतात.

सांगोला कृषिउत्पन्न बाजार समितीची निवडणूक शेकापचे दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या पश्चात झाली असून यात शेकापने आपले विरोधक शिवसेनेचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील, राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे, काँग्रेसचे प्रा. पी. सी. झपके, भाजपचे चेतनसिंह यांच्याशी समझोता करून सत्ता टिकवून ठेवली. परंतु याचवेळी शेकापमध्ये फूट पडल्याचे दिसून आले. शेकापच्या फुटीर गटाचे आव्हान संपुष्टात आले तरीही आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता पक्ष अबाधित ठेवणे आणि ताकद वाढविणे शेकापसाठी गरजेचे होणार आहे.

Story img Loader