पुणे : कसब्याने शिकवलेला धडा, आगामी लोकसभेची पोटनिवडणूक आणि महापालिका निवडणुकांमध्ये विजयाचा गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी भाजपने आता ‘मिशन बारामती’ आणि ‘मिशन शिरूर’नंतर ‘मिशन पुणे’ हाती घेतले आहे. वातावरण निर्मितीसाठी भाजपने पुण्यात गुरुवारी (१८ मे) राज्य कार्यकारिणीची बैठक आणि १८ वर्षांनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ठेवली आहे. तसेच कार्यकारिणीच्या बैठकीनंतर २० मेपर्यंत नवीन शहराध्यक्ष आणि दोन जिल्हाध्यक्षांची नेमणूक करून भाजपकडून भाकरी फिरविण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता असल्याने भाजपमध्ये पक्षांतर्गत घडामोडींना वेग आला असून, पुणे महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी फोडाफोडीच्या राजकारणाला राज्य कार्यकारिणीपासून सुरुवात केली जाणार आहे.
हेही वाचा – कोल्हापूरमध्ये सर्वाधिक दर देणाऱ्या साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले
कसब्याच्या निकालानंतर शहर भाजप जागी झाली आहे. आगामी लोकसभेची पोटनिवडणूक आणि महापालिकेच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये, यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. बूथ कमिट्यांच्या बैठका गेल्या आठवड्यात घेण्यात आल्या. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत या बैठका घेऊन महापालिका निवडणुकांच्या तयारीचे प्राथमिक नियोजन करण्यात आले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध विकासकामांचे एकाच दिवशी उद्घाटन करून वातावरण निर्मितीचा आरंभ केला. आता गुरुवारी राज्य कार्यकारिणीची बैठक घेण्यात येणार आहे, या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री फडणवीस हे मार्गदर्शन करणार आहेत. त्याद्वारे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांबरोबरच महापालिका निवडणुकांच्या तयारीची व्यूहरचना आखण्यात येणार आहे.
या बैठकीसाठी राज्यभरातून सुमारे १२०० लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये मंत्री, खासदार, आमदार यांचा समावेश आहे. नड्डा हे मंत्री, खासदार आणि आमदार यांच्या स्वतंत्र बैठका घेणार आहेत. संबंधित माननीयांची शाही बडदास्त ठेवण्यात आली आहे. शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्याबराेबरच स्वागताची फलकबाजी शहर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे.
फोडाफोडीच्या राजकारणाला प्रारंभ
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अन्य पक्षांतील पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्याचा प्रारंभ राज्य कार्यकारिणीच्या बैठकीपासून केला जाणार आहे. प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.
हेही वाचा – अकोल्यातील हिंसाचाराला राजकीय रंग
भाजप भाकरी फिरवणार
भाजपच्या शहर आणि जिल्ह्यातील कार्यकारिणीमध्ये बदल केले जाणार आहेत. शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक आणि जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांना पायउतार व्हावे लागणार आहे. जिल्ह्यामध्ये दोन जिल्हाध्यक्ष केले जाणार आहेत. शहराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार मेधा कुलकर्णी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी सभागृह नेते गणेश बीडकर आणि धीरज घाटे यांची नावे आहेत. जिल्हाध्यक्ष पदासाठी आमदार राहुल कूल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, शरद बुट्टे पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. नवीन शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया २० मेपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.
‘अभाविप’चीही राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक
भाजपच्या राज्य कार्यकारिणीबरोबरच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक २५ ते २८ मे दरम्यान पुण्यात होणार आहे. १८ वर्षांनंतर ही बैठक पुण्यात होत आहे. यापूर्वी २००६ मध्ये पुण्यात बैठक झाली होती. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये तरुण कार्यकर्त्यांचा सहभाग वाढवून घेण्यासाठी नियोजन केले जाणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.