Premium

Karnataka Election Results 2023 : हिंदुत्त्वाच्या प्रयोगशाळेत भाजपला पुन्हा यश

राज्यातील उर्वरित भागांच्या तुलनेत सर्वात छोटा म्हणजे १९ जागा येथे आहेत. गेल्या वेळी भाजपने येथे १६ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला तीन जागा मिळाल्या होत्या. यंदाही भाजप गेल्या वेळच्या जागा राखेल अशी स्थिती आहे.

BJP, hindutva laboratory, Coastal karnataka, success, election
Karnataka Election Results 2023 : हिंदुत्त्वाच्या प्रयोगशाळेत भाजपला पुन्हा यश ( Image – लोकसत्ता ग्राफिक्स टीम / विकिपीडिया )

हृषिकेश देशपांडे

Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 : उडुपी, दक्षिण कन्नड व उत्तर कन्नड या तीन जिल्ह्यांचा कोस्टल कर्नाटक म्हणजेच किनारपट्टीचा भाग हा भारतीय जनता पक्षाचे प्रभुत्व असलेला विभाग. राज्यातील उर्वरित भागांच्या तुलनेत सर्वात छोटा म्हणजे १९ जागा येथे आहेत. गेल्या वेळी भाजपने येथे १६ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला तीन जागा मिळाल्या होत्या. यंदाही भाजप गेल्या वेळच्या जागा राखेल अशी स्थिती आहे. काँग्रेसने भाजपला येथे चांगली झुंज दिली हे मान्यच करावे लागेल. मात्र बजरंग दलावर बंदी आणण्याची घोषणा जाहीरनाम्यात केली होती. त्याचा परिणाम काही प्रमाणात हिंदुत्त्वाचा विचारांचे प्रभावक्षेत्र असणाऱ्या या भागात झाली. अन्यथा काँग्रेसला आणखी एक-दोन जागा येथे मिळाल्या असत्या.

belapur assembly constituency sandeep naik vs manda mhatre maharashtra vidhan sabha election
लक्षवेधी लढत: भाजपच्या आमदार पुत्राचेच पक्षाला आव्हान
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Kalyan Dombivli assembly election campaign wage rates labour
कल्याण-डोंबिवलीत प्रचार टिपेला, मजुरीचे दर शिगेला; प्रचारासाठी लागणाऱ्या मजुरांचे दर २५० ते १२०० रूपये
maharashtra assembly election 2024, aheri constituency,
भाजप पाठोपाठ काँग्रेसचाही बंडखोरांना छुपा पाठिंबा, अहेरी विधानसभेत युती, आघाडीत अंतर्गत कलह
Bhosari Constituency, Mahesh Landge, Ajit Gavhane,
भोसरीत दुरंगी; पण तुल्यबळ लढत
Easy fight for Vijay Wadettiwar in Bramhapuri assembly election 2024
ब्रम्हपुरीत विजय वडेट्टीवार यांच्यासाठी सोपी लढत!
maharashtra assembly election 2024 amol kolhe allegations bjp for online cash payment to voters
भोसरीत भाजपकडून ‘ऑनलाइन लक्ष्मी दर्शन’?, कोणी केला हा गंभीर आरोप

हेही वाचा… Karnataka Election Results 2023 Live : कर्नाटकमध्ये भाजपाचा पराभव दिसताच मुख्यमंत्री बोम्मईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी…”

हेही वाचा… Karnataka Election Results 2023 : सीमाभागात एकीकरण समितीची पीछेहाट

हिजाबचा मुद्दा या भागात केंद्रस्थानी होता. या भागात भाजपच्या आक्रमक हिंदुत्त्वाचा मुद्दा नेहमीच प्रभावी ठरतो. या पट्ट्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया तसेच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा संघर्षही झाला होता. मात्र एका बाजूने हिंदू मतांचे ध्रुवीकरण होत असताना, दुसरीकडे मुस्लिम मतेही एकगठ्ठा काँग्रेसच्या मागे उभी राहीली. येथे धर्मनिरपेक्ष जनता दलापेक्षा मुस्लिमांनी काँग्रेसला पसंती दिली. त्यामुळेच काँग्रेसने चांगली लढत दिली आहे. हिजाब बंदी आंदोलनातील नेते यशपाल सुराणा यांना भाजपने उडुपीतून उमेदवारी दिली होती.त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली होती. इतर मागासवर्गीय समाजाचे नेते असलेल्या सुराणांना संधी देत भाजपने तीन वेळा आमदार झालेले के. रघुपती भट यांना उमेदवारी नाकारली होती. मात्र हिंदुत्त्वाचे हे प्रभावक्षेत्र असल्याने सुराणा यांनी यश मिळवले. भाजपने या भागात काही जुन्या आमदारांना उमेदवारी नाकारत नव्यांना संधी दिली होती. बहुसंख्य जनमत किंवा मतदानोत्त चाचण्यांनी भाजप किमान १६ जागा येथे जिंकेल असा अंदाज व्यक्त केला होता. या भागात संघ परिरावातील संघटनांचे उत्तम संघटन आहे. मात्र राज्यात बसवराज बोम्मई सरकारविरोधात तीव्र नाराजी होती. काँग्रेस उपस्थित केलेले स्थानिक मुद्दे तसेच भाजपच्या विद्यमान आमदारांविरोधातील रोष असल्याने काँग्रेसला काही प्रमाणात लाभ मिळाला. परंतु उत्तम संघटनेच्या जोरावर भाजपने येथे आपले यश टिकवले. धर्मनिरपेक्ष जनता दलाला येथे फारसा शिरकाव करता आलेल नाही. हिंदुत्त्वाच्या या प्रयोगशाळेत भाजपने आपले यश कायम राखले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp hindutva laboratory coastal karnataka getting success in election print politics news asj

First published on: 13-05-2023 at 13:07 IST

संबंधित बातम्या