केरळ विधासभेचे अध्यक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ए. एन. शमशीर यांनी काही दिवसांपर्वी गणपतीवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याविरोधात आता भाजपा आणि संघ परिवाराशी निगडित संघटना शमशीर यांना लक्ष्य करण्यासाठी मोहीम उघडणार आहेत. हा वाद वाढल्यानंतर केरळमधील प्रतिष्ठित आणि प्रभावशाली असलेल्या नायर सर्विस सोसायटी (NSS) या संस्थेने त्यांच्या सदस्यांना आज (२ ऑगस्ट) शमशीर यांच्या विरोधात होणाऱ्या ‘सेव्ह द फेथ डे’ या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. सत्ताधारी सीपीआय(एम) पक्षाने मात्र ४६ वर्षीय शमशीर यांची पाठराखण केली आहे.

एर्नाकुलम जिल्ह्यातील कुन्नाथुनाड विधासभा मतदारसंघात एका शैक्षणिक संस्थेचे उदघाटन करत असताना २१ जुलै रोजी शमशीर म्हणाले, “वर्तमानातील समस्या सोडविण्यासाठी विज्ञानाचा पुरस्कार केला पाहीजे. माझ्या शालेय जीवनात विमानाचा शोध कुणी लावला? या प्रश्नाचे उत्तर होते राईट बंधू. पण आज राईट बंधू हे चुकीचे उत्तर ठरते. कारण पुराणात पुष्पक विमान आधीच होते. पाठ्यपुस्तकात विज्ञान शिकवण्याऐवजी मिथक शिकवण्याला प्रोत्साहन दिले जात आहे. वैद्यकीय विज्ञानात प्लास्टिक सर्जरी हा नवीन शोध मानला जातो. पण प्लास्टिक सर्जरी प्राचीन काळात अस्तित्त्वात होती, हे आपल्याला शिकवले जाते. गणपतीचे धड मानवाचे आणि डोके हत्तीचे होते. विज्ञानाला प्रोत्साहन देण्याऐवजी अशा भाकड गोष्टी शाळेत शिकवल्या जातात.”

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
Devendra Fadnavis, Sandeep Naik, Khairane MIDC office,
फडणवीस यांचे संदीप नाईकांना आव्हान, खैरणे एमआयडीसी कार्यालयात पत्रकार परिषद
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
nitin gaikwad contesting election Deputy Chief Minister Devendra Fadnavis Nagpur South West Assembly constituency
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात चक्क ‘क्रेन ऑपरेटर’; खात्यात केवळ दोन हजार रुपये, दीड लाखांवर कर्ज…
assembly seats in cities near mumbai important for mahayuti
मुंबईलगतची महानगरे विधानसभेतही  शिंदे-फडणवीसांना साथ देणार का? येथील जागा महायुतीसाठी महत्त्वाच्या का?

शमशीर यांच्या वक्तव्याचा भाजपा आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांनी निषेध केला असून राज्यभरात विविध पोलिस स्थानकात गुन्हे दाखल केले आहेत. भाजपा आणि युवा मोर्चाच्या असंख्य युवक कार्यकर्त्यांनी शमशीर यांच्या घरावर मोर्चा काढला असून त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शमशीर हे कन्नूर जिल्ह्यातील थलासरी विधानसभेचे आमदार आहेत. भाजपाने तिरुअनंतपुरम शहर पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. शमशीर यांनी हिंदू दैवताचा अवमान केला असून धार्मिक तणाव निर्माण केला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

प्रदेश भाजपाचे अध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी शमशीर यांच्यावर हिंदू दैवतांचा अवमान केला असल्याचा आरोप केला आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) या पक्षाचा हिंदू परंपरा आणि श्रद्धांवर विषमतावादी दृष्टीकोन आहे. शमशीर यांच्यासारख्या हिंदूद्वेष्टी व्यक्तीला लोकशाही व्यवस्थेत विधानसभेचे अध्यक्षपद भूषविण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया सुरेंद्रन यांनी दिली.

शमशीर यांची बाजू घेताना सीपीआयएम पक्षाने त्यांचे समर्थन केले आहे. कन्नूर जिल्हाचे सचिव एम. व्ही. जयाराजन यांनी सांगितले, “विधानसभा अध्यक्षांनी कोणत्याही धर्माचा अवमान केलेला नाही. त्यांच्यावर होत असलेले आरोप निराधार आहेत. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर शास्त्रज्ञांच्या सभेत बोलत असताना अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे विधान केले होते. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतात प्राचीन काळात प्लास्टिक सर्जरी होत होती. पंतप्रधान मोदी यांचे ते वक्तव्य तर्कहीन असल्याचा दावा शमशीर यांनी केलेला आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याच्या आम्ही विरोधात आहोत.”

दुसरीकडे नायर सर्विस सोसायटीचे सचिव जी. सुकुमारन नायर म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांचे वक्तव्य वेदनादायी आहे. एकतर त्यांनी त्यांचे वक्तव्य मागे घ्यावे किंवा सरकारने त्यांच्यावर कारवाई तरी करावी. ज्यांनी या विधानाला अतिशय क्षुल्लक ठरविले आहे, त्याची निंदा करावी तेवढी कमी आहे. आमच्या श्रद्धांचा अवमान केल्याच्या विरोधात आम्ही आज निदर्शने केली. एनएसएसच्या सदस्यांनी जवळच्या गणपती मंदिरांना भेटी दिल्या. आमच्या देवावरील श्रद्धेचे रक्षण करण्यासाठी सदस्यांनी विशेष पूजा केली.

शमशीर यांची मागच्यावर्षी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली होती. शमशीर हे थलासरी येथील मुस्लीम कुटुंबातून येतात.