बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपाकडून करण्यात येते आहे. ज्या देवळांत हिंदूएतर व्यक्तिंच्या प्रवेशाला मज्जाव आहे, तिथे  माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री सर्वांसोबत भेटी देत असल्याने हिंदू भावना दुखावल्या आहेत, अल्पसख्यांकांचे तुष्टीकरण होत असल्याची कुजबूज वाढली आहे. राजदचे ४६ वर्षीय मोहम्मद इस्रायल मन्सुरी यांना मात्र अशा वादाची अपेक्षा नव्हती. ते हिंदूबहुल विधानसभा मतदारसंघ कांटी (मुज्जफरपूर)मधून निवडून आले. या भागात मुसलमानांची संख्या २० हजारांहून कमी आहे. मन्सुरी हे या परिसरातील सर्व धार्मिक कार्यक्रम, जागरण किंवा सत्यनारायण कथांना हजर असतात हे विशेष!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गया येथील प्राचीन विष्णूपद देवळात एक हिंदूएतर व्यक्तीने प्रवेश केला म्हणून हरकत घेण्यात आली असून तिथे उपस्थित असणे ही आपल्यादृष्टीने “गौरवाची” बाब असल्याचे मन्सुरी म्हणाले. या भेटीदरम्यान नीतिश देखील हजर होते. आगामी काळात येणाऱ्या ‘पितृपक्ष’ तयारी करिता आपण तिथे गेलो अशी माहिती त्यांनी दिली. जनता दल (संयुक्त)ने याप्रकरणी गप्प राहणे पसंत केले असून राजदचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी “भाजपा नको त्या गोष्टी उकरून काढत आहेत” असे म्हणाले.

सुरुवातीला मन्सुरी जनता दल (संयुक्त)मध्ये होते. माजी जनता दल (संयुक्त) नेता अराजकीय ऑल इंडिया पसमंदा मुस्लिम महाजचे प्रमुख नेते अली अन्वर अंसारी यांच्या सांगण्यावरून पक्षात सामील झाले होते. हा पक्ष सोडण्यापूर्वी कांटीतून तिकीट मिळावे यासाठी आपण सुमारे १५ वर्षापासून वाट पाहिल्याचे मन्सुरी सांगतात. माजी राजद खासदार रघुवंश प्रसाद सिंग यांनी २०२० विधानसभा निवडणुकीपूर्वी मन्सुरी यांचे मन राजदमध्ये येण्यासाठी वळवले होते. कांटी मतदारसंघातून भूमीहार जातीचे दोन उमेदवार उभे होते, ज्यामुळे उच्च जातीची मतं विभागली. मुसलमान आणि यादव मतं मन्सुरी यांना मिळाली. हिंदू जनतेत ते लोकप्रिय असल्याने त्यांना पसंती मिळाली.