२०२४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाने रणनिती आखण्यास सुरवात केली आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपाची ताकद कमी आहे अशा राज्यांमध्ये पक्षाचा विस्तार करण्याचा प्रयत्न पक्षाने सुरू केला आहे. हैदराबादमध्ये होणार्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा हेतूसुद्धा हाच असल्यामुळे हे अधिवेशन हैदराबाद येथे घेण्यात येत आहे. दक्षिण भारतात हे अधिवेशन घेऊन तेथील राज्यांमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. येणाऱ्या निवडणूका लक्षात घेऊन या अधिवेशनात ‘ घराणेशाही मुक्त भारत’ ही देण्यात येणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनामध्ये शुक्रवारी संध्याकाळी सरचिटणीसांची आणि शनिवारी सकाळी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याशिवाय पक्षाच्या राजकीय आणि आर्थिक अजेंड्यावर या अधिवेशनात चर्चा केली जाणार आहे. शेवटच्या दिवशी सिकंदराबाद येथील परेड ग्राऊंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेने या अधिवेशनाचा समारोप होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा