पिंपरी : लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला वर्षाचा कालावधी असला तरी महायुतीतील भाजपने पिंपरी-चिंचवडमध्ये आतापासूनच विधानसभेची तयारी सुरू केल्याचे दिसते. मित्र पक्षाचा आमदार असलेल्या मतदारसंघात संघटन मजबूत करत निवडणूक लढविण्याची वेळ आल्यास तयारी केली जात असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे शहरात महायुतीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत.

चिंचवडमध्ये अश्विनी जगताप, भोसरीत महेश लांडगे हे भाजपचे तर पिंपरीत अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे आमदार आहेत. पिंपरी-चिंचवडचा मावळ लोकसभा मतदारसंघात समावेश येतो. भाजप-एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ही महायुती लोकसभा निवडणूक एकत्रित लढविणार आहे. महायुतीत मावळमध्ये शिंदे यांचा विद्यमान खासदार असल्याने त्यांच्या गटाला जागा सुटण्याची शक्यता असतानाही भाजपची तयारी जोरात सुरू आहे. भाजपकडून लोकसभेबरोबरच विधानसभेचीही तयारी सुरू असल्याचे दिसते. कारण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पिंपरीतून कमळावर आमदार निवडून आणण्याचे निर्देश दिल्यानंतर तत्काळ कामाला सुरुवात केली. विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांच्याकडे पिंपरीची जबाबदारी दिली.

Ashok Uike, Vasant Purke
राळेगावमध्ये भाजपचा अतिआत्मविश्वास काँग्रेसच्या पथ्यावर ! दोन माजी मंत्र्यांमध्ये थेट लढत
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न
Bhosari Constituency, Mahesh Landge, Ajit Gavhane,
भोसरीत दुरंगी; पण तुल्यबळ लढत
Shoe necklace to BJP MLA Krishna Gajbe image due to Zendepar iron mine issue
भाजप आमदारांच्या प्रतिमेला चपलांचा हार, झेंडेपार लोह खाणीचा मुद्दा तापला
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
Sharad Pawar, Sudhir Kothari Hinganghat,
वर्धा : अखेर शरद पवार थेट ‘हिंगणघाटच्या शरद पवारां’च्या घरी, म्हणाले…

हेही वाचा – पुणे: शरीरसंबंधास विरोध केल्याने महिलेचा खून; दोघे गजाआड

महायुतीच्या या त्रिकोणात विद्यमान आमदार असलेल्या पक्षांना जागा सुटतील असे सूत्र ठरल्याचे सांगितले गेले. पिंपरी विधानसभा राष्ट्रवादीला तर चिंचवड, भोसरी भाजपला सुटेल असे सांगितले जात होते. मात्र, अजितदादांचा शहरात एकमेव आमदार असलेल्या पिंपरीवरही भाजपचा डोळा दिसत आहे. भाजपने लक्ष घातले असतानाही पवारांच्या गटात शांतता दिसत आहे. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला चिंचवड, भोसरीत उमेदवार मिळाले नव्हते. घड्याळ हद्दपार झाले होते. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर जानेवारीत झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित लढली. बंडखोरी झाली असतानाही राष्ट्रवादीच्या उमेदवाराने पहिल्यांदाच लाखभर मते घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचा आत्मविश्वास वाढला खरा पण, अजितदादा महायुतीत गेल्याने आणि भाजपचा आमदार असल्याने जागा मिळण्याची शक्यता कमी झाली. मात्र, दादांचा गट चिंचवडवर दावा करणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता नाकरता येत नाही. तर, भोसरीत राष्ट्रवादीकडे आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात सक्षम उमेदवार दिसत नाही.

हेही वाचा – तळवडे घटनेत आत्तापर्यंत १४ जणांचा मृत्यू; आरोपी शरद सुतारला पोलिसांनी घेतलं ताब्यात

भाजपची लोकसभेच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. पिंपरीतून कमळाच्या चिन्हावर आमदार असला पाहिजे हे कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नेते बोलले असतील. वरिष्ठ योग्य निर्णय घेतील. ज्यांचे आमदार आहेत, त्यांना मतदारसंघ सुटेल असे अपेक्षित असल्याचे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले.