नरेंद्र मोदी यांनी रविवारी (९ जून) सलग तिसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींबरोबर ७२ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात ३० केंद्रीय मंत्री, ५ स्वतंत्र प्रभारी आणि ३६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. या मंत्रिमंडळात जुन्या चेहर्‍यांसह नवीन चेहर्‍यांचाही समावेश आहे. यात अनेकांना आश्चर्यचकित करणारे एक नाव म्हणजे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा. त्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली असून ते मोदींच्या मंत्रिमंडळात परतले आहेत. भाजपाच्या अध्यक्षपदाचा त्यांचा कार्यकाळ जूनमध्ये संपणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, केंद्रीय मंत्रिमंडळात हिमाचल प्रदेशचे प्रतिनिधित्व करणारे ते एकमेव मंत्री आहेत. कोण आहेत जे. पी नड्डा? त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिला? नड्डा यांच्यानंतर अध्यक्षपदाची जबाबदारी कोणाला सोपवली जाणार? याविषयी जाणून घ्या.

कोण आहेत जे. पी. नड्डा?

भाजपाच्या राष्ट्रीय राजकारणात जे. पी. नड्डा यांचा मोलाचा वाटा आहे. बिहारच्या पाटणामध्ये १९६० साली त्यांचा जन्म झाला. त्यांनी आपले प्रारंभिक शालेय शिक्षण पाटणा येथील सेंट झेवियर्स शाळेतून पूर्ण केले. पाटणा येथील महाविद्यालयातूनच त्यांनी कला शाखेची पदवी प्राप्त केली. मूळचे हिमाचल प्रदेशचे नड्डा यांनी शिमला येथील हिमाचल प्रदेश विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि कायद्याची पदवी प्राप्त केली. त्यांच्या पत्नी मल्लिका नड्डा या शिमलातील हिमाचल प्रदेश युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षणतज्ज्ञ आहेत.

PM Narendra Modi interaction with Chief Secretaries across country for two days
पंतप्रधान मोदी देशभरातील मुख्य सचिवांशी साधणार दोन दिवस संवाद
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
Maval MLA Sunil Shelke , Sunil Shelke, Paragliders,
मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

हेही वाचा : इंडिया आघडीने संसदेत विरोधी बाकावर बसणे का निवडले? विरोधकांचं पुढचं पाऊल काय असेल?

राजकीय वाटचाल

विद्यार्थीदशेत असतानाच नड्डा यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. ‘द प्रिंट’नुसार १९७७ मध्ये त्यांची पाटणा विद्यापीठाच्या सचिवपदी निवड झाली. १९७८ साली नड्डा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ची विद्यार्थी शाखा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) चे सदस्य झाले. १९८६ ते १९८९ या कलावधीत नड्डा यांनी अभाविपचे राष्ट्रीय सरचिटणीस पद भूषवले. १९९१ मध्ये ते भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष झाले.

“अभाविपचे सरचिटणीस आणि भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून नड्डा यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांना खूप मदत झाली. ते के. एन. गोविंदाचार्य यांच्या संपर्कात आले. के. एन. गोविंदाचार्य संघ विचारवंत होते. त्यावेळी ते अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर तिसरे सर्वात शक्तिशाली पुरुष होते”, असे भाजपाचे सुरेश भारद्वाज यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले. हिमाचल प्रदेश विद्यापीठात शिक्षणासाठी गेल्यावरही नड्डा विद्यार्थी राजकारणात सक्रिय राहिले. १९८५ ते १९८९ दरम्यान त्यांनी दिल्लीत अभाविपचे संघटनात्मक सरचिटणीस म्हणूनही काम केले.

राज्यापासून राष्ट्रीय राजकारणापर्यंत

नड्डा यांनी १९९३ मध्ये निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला. त्यांना भाजपाने बिलासपूर (सदर) येथून हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले. त्यांनी निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. १९९८ आणि २००७ या दोन्ही वर्षातही त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली आणि तत्कालीन प्रेमकुमार धुमल सरकारमध्ये त्यांची आरोग्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. २००३ मध्ये त्यांचा पराभव झाला, मात्र २००७ च्या हिमाचल विधानसभा निवडणुकीत नड्डा पुन्हा विजयी झाले. २००७ मध्ये धुमल सरकारमध्ये त्यांंना वनखाते मिळाले.

हिमाचल प्रदेश भाजपाचे प्रभारी असताना त्यांचे तत्कालीन मुख्यमंत्री धुमल यांच्याशी मतभेद झाले आणि नड्डा २०१० मध्ये राज्यातून राष्ट्रीय राजकारणात आले. १९९० च्या दशकात नितीन गडकरींबरोबर भारतीय युवा मोर्चामध्ये काम करणार्‍या नड्डा यांना गडकरींनी दिल्लीत बोलावले होते, तेव्हा गडकरी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. गडकरींनी नड्डा यांची भाजपाचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली, तेव्हापासून नड्डा यांच्या कारकिर्दीने नवीन उंची गाठली आहे.

२०१२ मध्ये त्यांना राज्यसभेचे तिकीट मिळाले आणि २०१४ मध्ये पहिल्या मोदी सरकारमध्ये त्यांना केंद्रीय आरोग्य मंत्री करण्यात आले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी, नड्डा यांना गुजरातचे ज्येष्ठ नेते गोरधन झडाफिया यांच्यासह भाजपाचे उत्तर प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले. त्या निवडणुकीत नड्डांनी पक्ष संघटना बळकट केल्यामुळे भाजपाने राज्यातील ८० पैकी ६२ लोकसभेच्या जागा जिंकल्या. एका अंतर्गत सूत्राने ‘द प्रिंट’ला सांगितल्याप्रमाणे, “याचे सर्व श्रेय नड्डा यांना दिले गेले.” मोदींच्या दुसर्‍या कार्यकाळातील मंत्रिमंडळात नड्डा यांचा समावेश नव्हता, तेव्हा त्यांना विशिष्ट जबाबदारी दिली जाईल, असे बोलले जात होते.

मोडींकडून नड्डांच्या नेतृत्वाची प्रशंसा

जून २०१९ मध्ये त्यांना भाजपाचे पहिले कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. नड्डा यांना जानेवारी २०२० मध्ये भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. २०२० मध्ये त्यांचा कार्यकाळ संपणार होता, परंतु त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये या पदावर त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली. भाजपाच्या सूत्रांनी ‘पीटीआय’ला सांगितले की, १८ व्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर नड्डा यांनी देशभरात १४० ठिकाणी प्रचार केले. पक्षाचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या ७० संघटनात्मक बैठकाही घेतल्या.

हेही वाचा : सत्तास्थापनेसाठी चंद्राबाबूंनी केली राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी? विशेष दर्जा मिळणे म्हणजे काय?

नड्डा यांनी भाजपाचा आणखी एक मोठा विजय सुनिश्चित करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले, परंतु यावेळी भाजपाला स्वबळावर बहुमताचा आकडा मिळवता आला नाही. तिसर्‍यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला आपल्या मित्रपक्षांची मदत घ्यावी लागली. असे असले तरी निकालानंतर पंतप्रधान मोदींनी भाजपा मुख्यालयात केलेल्या भाषणात नड्डा यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. नड्डा पुन्हा मोदी मंत्रिमंडळात गेल्याने भाजपाचे अध्यक्षपद कोणाकडे जाईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Story img Loader