पीटीआय, किश्तवार
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजपमध्ये स्पष्ट लढत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. ते म्हणाले की एका बाजूने कलम ३७० परत आणायचे आहे, तर दुसरी बाजू ते थांबवण्यासाठी ठाम आहे. भाजपचे उमेदवार शुगन परिहार यांच्या बाजूने मतदान करणे केवळ विकास आणि प्रगतीसाठीच नव्हे तर त्यांच्या वडिलांसह इतर शहीदांना श्रद्धांजली वाहणे आहे. जम्मू आणि काश्मीरमधील ही निवडणूक स्पष्टपणे दोन शक्तींमधील आहे, असे शाह यांनी येथे एका सभेत सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Haryana Election : हरियाणाच्या निवडणुकीत राजकीय घराण्यातील उमेदवारांची संपत्ती जाहीर; कोण आहेत सर्वात श्रीमंत दुष्यंत चौटाला?

भाजप आणि गांधी-अब्दुल्ला घराण्यांमध्ये ही लढत आहे. दोघांचा अजेंडा स्पष्ट आहे. ‘एक कायदा, एक ध्वज आणि एक पंतप्रधान’ या तत्त्वाचा आणि जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, या प्रेमनाथ डोगरा यांच्या विचारसरणीचे अनुसरण भाजप करते. पक्षाचे उमेदवार शुगन परिहार, सुनील शर्मा आणि तारक कीन यांच्या समर्थनार्थ शहा प्रचार करत होते. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने जेव्हाही सरकार स्थापन केले, तेव्हापासून दहशतवाद फोफावला आहे, असा आरोप त्यांनी केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader amit shah says in jammu kashmir elections bjp vs gandhi and abdullah print politics news css