सांगली : कायम दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि तासगावच्या पूर्व भागांतील काही गावे अभूतपूर्व पाणी टंचाईला सामोरे जात असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर मात्र या प्रश्‍नावर शासन दरबारी आवाज उठविण्याऐवजी राजकीय कुरघोड्या करण्यात धन्यता मानत आहेत.

जतमध्ये दसर्‍यापासून २५ गावांची तहान भागविण्यासाठी टँकरवर अवलंबून असून दिवाळीनंतर या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आटपाडीमध्ये डाळिंबाच्या बागा सरपणासाठी वापरल्या जात आहेत. खरीप हंगाम तर गेलाच पण परतीच्या पावसावर अवलंबून असलेल्या रब्बी क्षेत्रावरही पेरण्याच होऊ शकलेल्या नाहीत. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील बहुसंख्य गावांची स्थिती व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडीसारखी होत असताना लोकप्रतिनिधी मात्र राजकीय कुरघोड्या करण्यात मग्न राहत असतील तर सामान्यांना उत्तरदायी कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Nagpur BSP, Vanchit Nagpur, division of votes Nagpur,
नागपूर : बसप, वंचित पुन्हा मैदानात; मतविभाजनामुळे, काँग्रेस, भाजपच्या तोंडचा घास…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
sky lanterns, political parties, Impact on business lanterns, lanterns news,
राजकीय शक्तिप्रदर्शनाच्या आकाशकंदिलांना आचारसंहितेचा अटकाव, राजकीय मंडळींकडून मागणी नसल्याने व्यवसायावर परिणाम
Sharad Pawar Nagpur, Sharad Pawar latest news,
जागांच्या अदलाबदलीत पवारांची यशस्वी खेळी, राष्ट्रवादीला नागपूर शहरात एक जागा
Nana Patole, rebellion in Congress, Nana Patole news,
नाना पटोलेंच्या गृहजिल्ह्यात काँग्रेसमध्ये बंडखोरीचे वारे, नेमके कारण काय?
transposition of leaders frome one party to another party in Palghar
पालघर जिल्ह्यात नेतेमंडळींचे पक्षांतर
Pune people voting, nepotism Pune, voting Pune,
येथे घराणेशाहीला फारशी ‘जागा’ नाही!
Pune district administrations efforts to increase voter turnout
शहरबात : मतदानाचा टक्का वाढणार का ?

हेही वाचा – अकोल्यात पोटनिवडणूक टळणार, पुणे आणि चंद्रपूरमध्ये नियमाला अपवाद

आमदार पडळकर यांनी गेली लोकसभा निवडणूक बहुजन वंचित आघाडीच्यावतीने लढवून लक्षणिय मते घेतली होती. ही राजकीय खेळी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या विजयासाठीच होती हे निवडणुकीवेळीच स्पष्ट दिसत होते. मात्र, भाजपने विधानपरिषदेवर पडळकर यांना संधी देऊन या समजावर शिक्कामोर्तब केले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात टीका करणे आणि राष्ट्रवादीवर पर्यायाने पवार घराण्यावर टीकास्र सोडणे, याच भांडवलावर वलयांकित राहणे एवढेच काम पडळकर यांना होते का, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्‍नावरून जनमत संघटित करणे आणि नेतृत्व अधोरेखित करणे हेच आतापर्यंत झाले. यंदाही दसरा मेळावा आरेवाडी बनात झाला. अपेक्षेप्रमाणे धनगर आरक्षणाचा मुद्दा प्रकर्षाने मांडणे आवश्यक असताना ओबीसी आरक्षणाचा नवीन प्रश्‍न हाती घेतला असल्याचे दिसून आले. मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये मंत्री छगन भुजबळ यांची अप्रत्यक्ष पाठराखण केली. या निमित्ताने ओबीसी नेतृत्व त्यांना आता खुणावू लागल्याचे दिसले. राज्य पातळीवरील प्रश्‍नही सोडविले पाहिजेत, ते हिरिरीने मांडले पाहिजेत, यासाठी असलेल्या वक्तृत्व शैलीचा उपयोगही आमदार पडळकर यांनी घेतला पाहिजे याबद्दल दुमत असण्याचे काहीच कारण नाही. मात्र, हे करीत असताना अन्य समाजालाही सोबत घ्यायला हवे हे मात्र ते विसरतात.

हेही वाचा – गोवर्धन शर्मा यांच्या पश्चात अकोल्यात अधिराज्य कायम राखण्याचे भाजपपुढे आव्हान

भाजपची आमदारकी केवळ पवार घराण्यावर टीका करण्यासाठी मिळालेली नाही, तर सामाजिक प्रश्‍नाबरोबरच सामान्यांच्या प्रश्‍नांचीही तड लावण्यासाठी मिळालेली आहे. आमदार पडळकर यांचा मूळचा मतदारसंघ खानापूर-आटपाडी मात्र, त्यांनी अलिकडच्या काळात आटपाडी सोडून खानापूर आणि जतमध्ये अधिक लक्ष घातल्याचे दिसत आहे. खानापूरचे आमदार अनिल बाबर यांना गतवेळी केलेली मदत ही चूकच होती, आता कोणत्याही स्थितीत आपण निवडणुकीच्या मैदानात उतरणारच अशी घोषणा त्यांनी केली आहे. तर याच दरम्यान, जतमध्येही पेरणी सुरू केली आहे. जतसाठी आमदार फंडातून निधी दिल्याचा डांगोरा पिटत असताना गेल्या दोन वर्षांत पाच कोटींचा निधी दिल्याचे सांगितले जात आहे. तर यापैकी जत शहरातील दोन चौक सुधारणा करण्यासाठी दीड कोटींचा निधी दिला आहे. ज्यापैकी एक चौकच या ठिकाणी अस्तित्वात नाही. तालुक्यात पाण्यापासून वंचित असलेल्या गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत २९ गावांसाठी पाणी योजना प्रस्तावित आहे. या योजनेला गावकर्‍यांनी तीव्र विरोध केला आहे. कारण प्रत्येक गावासाठी स्वतंत्र योजना अपेक्षित आहे. मात्र, या विरोधकांचे म्हणणे ऐकण्याऐवजी संबंधित गावच्या सरपंचांना मुंबईत बोलावून ही योजना पुढे रेटण्याचा प्रयत्न आमदार पडळकर यांनी चालविला आहे. यामागे जनतेला पाणी मिळावे हाच शुद्ध हेतू आहे का अन्य काही हे कळायला मार्ग नाही. मात्र, गावगाड्यातील प्रश्‍न सोडविण्यासाठी मुंबईवारी गावाला आणि सरपंचांना परवडणारी व शक्य आहे का याची खातरजमा मात्र केलेली नाही.

जत मतदारसंघात हस्तक्षेप करीत पक्षाअंतर्गत नेतृत्वाला एकीकडे आव्हान देत असताना आटपाडीमध्येही अमरसिंह देशमुख यांना प्रचार प्रमुख पदावरून बाजूला करून स्वत:कडे हे पद घेतले. देशमुख घराणे आटपाडी तालुक्याच्या राजकारणात मातब्बर समजले जाते. मग त्यांना या पदावरून हटविण्याचे संयुक्तिक कारणही भाजपच्या नेतृत्वाने दिलेले नाही. यामुळे आमदार पडळकर यांचे राजकारण भाजपला पोषक ठरण्याऐवजी कुपोषित करणारे ठरेना म्हणजे बरे. नाही तर आरेवाडीच्या बनात भाजपला पराभूत करण्यासाठी आमदार पडळकर यांनी बिरोबाची आण घेतली होतीच. त्याच दिशेने तर त्यांचा प्रवास नाही ना, अशी चर्चा सुरू झाली.